Join us

मुलांची उंची जोमानं वाढावी असं वाटतं? मग डॉक्टरांचा ‘हा’ खास सल्ला वाचा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2025 18:06 IST

Children's Health: पीडियाट्रिशिअन डॉ. पार्थ सोनी यांनी लहान मुलांची उंची वाढवण्यासाठी काय करावं याबाबत माहिती दिली आहे. पालकांनी डॉक्टरांचा हा सल्ला नक्की फॉलो केला पाहिजे.

Children's Health: मुलांची उंची त्यांच्या वाढीवर आणि विकासावर अवलंबून असते. तसेच यात आनुवांशिकता, फॅमिली हिस्ट्री, वातावरण, आहार आणि चांगल्या-वाईट सवयी यांचाही तेवढाच वाटा असतो. मुलं काय खातात आणि काय अॅक्टिविटी करतात याचा प्रभाव त्यांच्या उंचीवर पडतो. पालकांना नेहमीच चिंता असते की, मुलांच्या वयानुसार त्यांची उंचीही वाढावी. अशा पीडियाट्रिशिअन डॉ. पार्थ सोनी यांनी मुलांची उंची वाढवण्यासाठी काय करावं याबाबत माहिती दिली आहे. पालकांनी डॉक्टरांचा हा सल्ला नक्की फॉलो केला पाहिजे.

कशी वाढवाल मुलांची उंची?

डॉक्टर सांगतात की, मुलांची उंची वाढवण्यासाठी त्यांना खेळू द्या. लहान मुलांनी बाहेर मैदानात जाऊन खेळणं त्यांच्या वाढीसाठी आणि विकासासाठी खूप गरजेचं असतं. नियमितपणे फिजिकल अॅक्टिविटी केल्यास त्यांची उंची तर वाढेलच, सोबतच त्यांचं आरोग्यही चांगलं राहतं. तसेच यानं त्यांची हाडं मजबूत होतात आणि त्यांचा मूडही चांगला राहतो. त्यामुळे पालकांनी या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे की, लहान मुलांनी दिवसभर घरात टीव्ही किंवा मोबाइलमध्ये वेळ घालवू नये. बाहेर इतरांसोबत वेगवेगळे खेळ खेळावे.

या टिप्स येतील कामी

डॉक्टरांनी पोस्टमध्ये खाण्या-पिण्याच्या काही गोष्टींबाबतही सांगितलं आहे. डॉक्टर म्हणाले की, लहान मुलांच्या मेंदुसाठी सगळ्यात वाईट गोष्ट म्हणजे कॅंडीज आणि सगळ्यात चांगलं फूड म्हणजे ब्लूबेरीज.

फ्रेंच फ्राइज सतत खाल्ल्यास लहान मुलांच्या हृदयाचं आरोग्य बिघडतं. तर सगळ्यात चांगलं फूड ब्राउन राइस आहे.

उंचीसाठी सगळ्यात वाईट फूड म्हणजे नूडल्स आणि सगळ्यात चांगला पर्याय म्हणजे मुलांना बाहेर खेळावं.

लहान मुलांच्या फुप्फुसांसाठी सगळ्यात घालत फूड म्हणजे पॅकेटमधील फूड आणि सगळ्यात चांगलं फळ सफरचंद आहे.

कोल्ड ड्रिंकमुळे लहान मुलांची हाडं कमजोर होतात. तर दह्यानं हाडं मजबूत होतात. 

टॅग्स :पालकत्वहेल्थ टिप्स