हल्ली परफ्यूम मारणं किंवा अंगावर डिओ मारणं खूप कॉमन झालं आहे. अगदी शाळकरी मुलांपासून ते वयस्कर लोकांपर्यंत सगळेच अंगावर परफ्यूम मारतात. अंगावर दरवळणारा परफ्यूमचा मंद सुगंध आपल्याला फ्रेश ठेवतो. तसेच परफ्यूममुळे अंगाला येणारी घामाची दुर्गंधीही कमी होते. काही वर्षांपुर्वी फक्त उन्हाळ्याच्या दिवसांत किंवा कधी तरी एखाद्या कार्यक्रमाला जातानाच फक्त परफ्यूम मारण्याची, अत्तर लावण्याची सवय होती. पण आता मात्र रोजच ते मारलं जातं. पण याचा आरोग्यावर परिणाम होत असून ज्या आईंची मुलं लहान आहेत, त्यांनी तर परफ्यूम मारणं टाळायलाच हवं असं तज्ज्ञ सांगत आहेत. बघा त्याचे आरोग्यावर नेमके काय परिणाम होतात...(can perfume of a mother dangerous for her baby's health?)
आईने मारलेल्या परफ्यूमचा मुलांवर काय परिणाम होतो?
जी मुलं ३ ते ४ वर्षांच्या आतली असतात ती आईच्या अंगावर जास्त असतात. अशा मुलांना आईने मारलेल्या परफ्यूमचा जास्त त्रास होण्याची शक्यता असते. त्यापैकी सगळ्याच मुलांना त्रास होईल असं नाही. पण ज्यांना काही केमिकल्सची ॲलर्जी असते, त्यांना मात्र आईने मारलेल्या परफ्यूमचा नक्कीच त्रास होऊ शकतो. आपल्या आसपास आपण पाहातो की धूप, उदबत्ती, डांबर गोळ्या यांचा वासही अनेक जणांना सहन होत नाही. लगेच त्यांना शिंका येतात किंवा नाक गळायला सुरुवात होते. कारण त्या लाेकांना या वस्तूंमध्ये असणाऱ्या विशिष्ट केमिकल्सची ॲलर्जी असते. तसंच काहीसं मुलांच्या बाबतीतही होतं.
अशीच एक घटना नुकतीच उघडकीस आली आहे. काही वाहिन्यांनी दिलेल्या वृत्तानुसार एका लहान मुलाला मागच्या काही महिन्यांपासून सतत खोकला येत होता. त्याचा हा त्रास कित्येक औषधी देऊनही कमी झाला नाही. अशातच त्या बाळाच्या आईने मारलेला स्ट्राँग परफ्यूम खोकल्यासाठी कारणीभूत असेल का अशी शंका डॉक्टरांना आली आणि त्यांनी काही दिवस परफ्यूम न मारण्याचे आईला सुचवून पाहिले. त्यानंतर काही दिवसांत बाळाचा खोकला कमी झाल्याचे लक्षात आले. त्यामुळे परफ्यूम वापरताना थोडी काळजी घेणं गरजेचं आहे. बाजारात परफ्यूम, अत्तर किंवा डिओचे कित्येक वेगवेगळे प्रकार मिळतात. त्यातले काही स्वस्तातले असतात पण त्यांचा वास खूप जास्त स्ट्राँग असतो. या परफ्यूममध्ये असणारे केमिकल्स जास्त घातक ठरू शकतात. त्यामुळे परफ्यूमची निवडही योग्य होणं गरजेचं आहे.
Web Summary : Perfumes, common now, can harm young children. Chemicals in strong perfumes may cause allergies and breathing problems. Doctors advise caution, suggesting milder scents or avoiding perfume use around infants to prevent health issues like persistent coughs.
Web Summary : आजकल आम परफ्यूम छोटे बच्चों को नुकसान पहुंचा सकते हैं। तेज परफ्यूम में मौजूद रसायन एलर्जी और सांस की समस्या पैदा कर सकते हैं। डॉक्टर सावधानी बरतने की सलाह देते हैं, शिशुओं के आसपास हल्के सुगंधों का सुझाव देते हैं।