Baby Sleeping Position: घरात लहान बाळ आलं की पालक प्रत्येक छोट्या-मोठ्या गोष्टीकडे जास्त लक्ष देऊ लागतात. खासकरून बाळाच्या झोपेबाबत जरा जरी दुर्लक्ष केलं तरी त्याचा धोका वाढू शकतो. चुकीच्या पद्धतीने झोपवल्यास SIDS (Sudden Infant Death Syndrome) म्हणजेच अचानक शिशु मृत्यु सिंड्रोम चा धोका वाढतो. त्यामुळेच पेडियाट्रिशियन डॉ. रवि मलिक यांनी दिलेल्या महत्त्वाच्या सल्ल्यानुसार बाळाला कसे झोपवावे ते जाणून घ्या.
नेहमी 'पाठीवर' झोपवा – ही सर्वात सुरक्षित पोजिशन
डॉ. मलिक यांच्या मते, नवजात आणि लहान बाळांना नेहमी पाठीवर झोपवणे सर्वात सुरक्षित राहतं. या पोजिशनमध्ये बाळाचा श्वासोच्छ्वास मोकळा राहतो. श्वास घेण्यामध्ये अडथळा येत नाही. तसेच बाळाला सर्वात आरामदायक आणि सुरक्षित झोप मिळते. SIDS चा धोका खूप कमी होतो.
कधीही 'पोटावर' झोपवू नका – सर्वात धोकादायक पद्धत
बाळाला पोटावर झोपवणं खूप धोकादायक ठरू शकतं. पोटावर झोपल्यास श्वास घेण्यास अडथळा येऊ शकतो. नाक किंवा तोंड गादीला लागल्याने श्वास अडकण्याची शक्यता असते. यामुळे SIDS चा धोका वाढतो. म्हणून बाळाला पोटावर झोपवणे टाळावे.
बाळाला कसे झोपवावे?
फक्त झोपेची पोजिशन बरोबर असली तरी पुरेसे नाही. बाळ झोपत असलेलं वातावरणही सुरक्षित असायला हवे. बाळाच्या जवळ उशा, सॉफ्ट टॉय किंवा जाड रजई ठेवू नका. बाळाची मान आणि मानेशी संबंधित स्नायू नाजूक असतात. उशी, सॉफ्ट टॉय किंवा जाड रजई चेहऱ्यावर येऊन श्वास रोखण्याचा धोका असतो.
गादी योग्य असावी
गादी ना खूप मऊ असावी, ना खूप कडक. मध्यम कडक गादी बाळासाठी सुरक्षित राहते.
बाळाची झोपेची जागा स्वच्छ व सुरक्षित ठेवा
चादर, खेळणी किंवा कोणतीही वस्तू बाळाच्या चेहऱ्याजवळ येणार नाही याची काळजी घ्या.
