दहावी-बारावीच्या बोर्डाच्या परीक्षा म्हणजे विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा टप्पा. या काळात मुलांचा पूर्ण वेळ अभ्यासात जातो, पण सततचा अभ्यास आणि ताणामुळे अनेकदा मुलांना सुस्ती किंवा अशक्तपणा जाणवू लागतो. परीक्षेच्या दिवसात केवळ किती तास अभ्यास केला यापेक्षा, तो अभ्यास करताना शरीर आणि मन किती अॅक्टिव्ह आहे, याला अधिक महत्त्व असते. अनेकदा मुले अभ्यासाच्या नादात जेवणाकडे दुर्लक्ष करतात किंवा ताण घालवण्यासाठी जंक फूडचा आधार घेतात. परंतु, चुकीच्या आहारामुळे येणारी मरगळ विद्यार्थ्यांची एकाग्रता कमी करू शकते(healthy diet during exams).
अभ्यासाचा वाढलेला ताण, झोपेची अनियमित वेळ आणि सतत बसून अभ्यास केल्यामुळे अनेक मुलांना थकवा, सुस्ती, एकाग्रतेचा अभाव आणि चिडचिड जाणवू लागते. अशा वेळी केवळ अभ्यासच नाही तर योग्य आहार देखील तितकाच महत्त्वाचा ठरतो. कारण योग्य वेळी घेतलेला संतुलित आणि पौष्टिक आहार मुलांची ऊर्जा टिकवून ठेवतो, मेंदू सक्रिय ठेवण्यास मदत करतो आणि स्मरणशक्ती तसेच एकाग्रता वाढवतो. परीक्षेदरम्यान मुलांनी काय खावे, कोणते पदार्थ टाळावेत आणि दिवसभर अॅक्टिव्ह राहण्यासाठी आहाराची योग्य नियोजन कशी असावी याबद्दल पालकांनी विशेष लक्ष देणे गरजेचे असते. बोर्ड परीक्षांच्या काळात (best diet for students during exams) मुलांचा आहार नेमका कसा असावा आणि कोणत्या छोट्या-छोट्या टिप्समुळे मुलं दिवसभर उत्साही व एकाग्र राहू शकतात ते पाहूयात. परीक्षेच्या काळात मुलांचा आहार नेमका कसा असावा, कोणत्या पदार्थांमुळे स्मरणशक्ती (what to eat during exams to stay active) वाढते आणि सुस्ती टाळण्यासाठी पालकांनी कोणत्या टिप्स फॉलो कराव्यात ते पाहूयात...
परीक्षांच्या काळात मुलांचा आहार कसा असावा ?
डाएटिशियन आणि न्यूट्रिशनिस्ट अर्चना जैन यांच्या मते, परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आहारात अशा पदार्थांचा समावेश असावा जे मेंदूची कार्यक्षमता सुधारतील, स्मरणशक्ती वाढवतील आणि दीर्घकाळ ऊर्जा टिकवून ठेवतील. डाएटिशियन अर्चना जैन सांगतात की, परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांनी असा आहार घ्यावा जो मेंदूच्या आरोग्याला चालना देईल, स्मरणशक्ती वाढवेल आणि शरीरातील ऊर्जाही टिकवून ठेवेल. चुकीच्या खाण्यापिण्याच्या सवयींमुळे विद्यार्थ्यांमध्ये थकवा, डोकेदुखी, सुस्ती आणि एकाग्रतेचा अभाव यांसारख्या समस्या उद्भवू शकतात. म्हणूनच, संतुलित आणि पौष्टिक जेवणाला प्राधान्य देणे अत्यंत आवश्यक आहे.
दिवसाची सुरुवात हेल्दी नाश्त्याने करा...
डाएटिशियन अर्चना जैन यांच्या मते, परीक्षेच्या दिवसात नाश्ता कधीही वगळू नये. रात्रभरच्या उपवासानंतर शरीर आणि मेंदूला ग्लुकोजची गरज असते. अशा वेळी विद्यार्थ्यांनी नाश्त्यामध्ये ओट्स, दलिया, पोहे, उपमा, दूध आणि फळांचा समावेश करावा. केळी, सफरचंद आणि संत्री यांसारखी फळे त्वरित ऊर्जा देतात. याव्यतिरिक्त, प्रथिनांनी भरपूर नाश्ता जसे की पनीर किंवा मूग डाळ चिला मेंदूला दीर्घकाळ अॅक्टिव्ह ठेवतो. यामुळे रक्तातील साखरेची पातळी स्थिर राहते आणि परीक्षेदरम्यान एकाग्रता वाढवण्यास मदत मिळते.
मेंदूच्या आरोग्यासाठी सर्वोत्तम आहार...
विद्यार्थ्यांनी आपल्या आहारात अक्रोड आणि बदामाचा समावेश करावा; यामध्ये ओमेगा-३ फॅटी ॲसिड आणि अँटीऑक्सिडंट्स असतात, जे स्मरणशक्ती आणि एकाग्रता वाढवण्यास मदत करतात. भोपळा, सूर्यफूल आणि चिया सीड्सचा आहारात समावेश करा, कारण या बिया मॅग्नेशियम आणि लोहयुक्त असतात. विद्यार्थी मर्यादित (brain boosting foods for students) प्रमाणात डार्क चॉकलेट देखील खाऊ शकतात, डार्क चॉकलेटमुळे मूड सुधारतो आणि अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्यास मदत होते. पालकांनी मुलांच्या आहारात हिरव्या पालेभाज्यांचा समावेश करावा. पालक, मेथी आणि ब्रोकोलीमध्ये फोलेट आणि व्हिटॅमिन K असते, जे मेंदूच्या कार्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. रोज एक मूठभर मिक्स ड्रायफ्रूट्स आणि बिया खाणे विद्यार्थ्यांसाठी अत्यंत फायदेशीर ठरू शकते.
परीक्षेच्या अगदी आधी नेमकं काय खाव ?
डाएटिशियन अर्चना जैन यांच्या मते, परीक्षेच्या दिवशी हलका पण इन्स्टंट एनर्जी देणारा आहार घ्यावा. जास्त तळलेले किंवा हेव्ही जेवण घेतल्याने सुस्ती येऊ शकते. सकाळच्या नाश्त्यामध्ये दलिया, दूध आणि फळं खाणं फायदेशीर ठरते. परीक्षेला जाण्यापूर्वी तुम्ही केळे खाऊ शकता आणि सोबत पाण्याची बाटली नक्की ठेवा.जर परीक्षा दुपारी असेल, तर दुपारच्या जेवणात वरण-भात, पोळी आणि हिरव्या पालेभाज्या घ्याव्यात. जास्त मसालेदार अन्न आणि जंक फूड खाणे टाळावे.
Web Summary : Exams demand active minds. Prioritize nutritious foods like fruits, nuts, and greens. Avoid junk food for better concentration. Start the day with a healthy breakfast and stay hydrated. A balanced diet boosts energy and memory during exams.
Web Summary : परीक्षाओं में सक्रिय दिमाग जरूरी है। फल, नट्स और हरी सब्जियों जैसे पौष्टिक भोजन को प्राथमिकता दें। बेहतर एकाग्रता के लिए जंक फूड से बचें। स्वस्थ नाश्ते से दिन की शुरुआत करें और हाइड्रेटेड रहें। संतुलित आहार परीक्षा के दौरान ऊर्जा और स्मृति को बढ़ाता है।