आजकाल मुलं मोबाईन फोन किवा दुसऱ्या इतर उपकरांना चिकटून असतात. याचा परीणाम त्यांच्या मेंदूवर होतो आणि ते स्लो होतात. काही उपाय केल्यास तुम्ही मुलांचा मेंदू घोड्याप्रमाणे पळवू शकता. बाबा रामदेव यांनी काही टिप्स सांगितल्या आहेत. याचा वापर करून तुम्ही मुलांना लहानपणापासूनच हूशार बनवू शकता. रोज काही खास योगासनं केल्यास मुलांचा मेंदू तल्लख होण्यास मदत होईल. (Baba Ramdev Told Easy Way To Make Children Genius Sharp Brain Tips)
रामदेव बाबांनी आपल्या युट्यूब चॅनेलवर याबाबत व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओत ते मुलांसोबत योगा करताना दिसून येत आहेत. त्यांनी सांगितले की मुलं योगानं स्वत:ला तयार करू शकतात. योगा केल्यानं शरीर मजबूत होण्यासही मदत होते. त्यांच्या जीवनात बुद्धीमत्ता आणि क्षमतेचा विकास होतो. बाबा रामदेव यांनी मुलांच्या खाण्यापिण्याबाबत पालकांना सल्ला दिला आहे. त्यांनी सांगितले की मुलं योगा करण्याबरोबरच जर हेल्दी खातील तर त्यांचा मेंदू वेगानं काम करेल.
आर. माधवननं फक्त २१ दिवसांत वजन घटवलं ना व्यायाम ना डाएट; पाहा खास वेट लॉस सिक्रेट
या आधीसुद्धा रामदेव बाबांनी मुलांचा मेंदू वेगानं चालावा यासाठी काही उपाय सांगितले आहेत. त्यांनी सांगितले की टेक्निकल विषयांचा अभ्यास केल्यानं मुलांचा मेंदू तल्लख होतो. गणित, विज्ञान, संस्कृत व्याकरणाचा अभ्यास केल्यानं मेंदू वेगानं चालतो. बाबा रामदेव सांगतात की वेगवेगळ्या भाषा शिकल्यानंही मुलांचा मेंदू तल्लख होतो. मुलांना कमीत कमी तीन भाषांचे ज्ञान असायला हवे.
रामदेव बाबांनी पालकांना सल्ला दिला आहे की गुगलवर काहीही सर्च करून त्याचा अवलंब मुलांना शिकवण्यासाठी करू नका. असं करणं नुकसानकारक ठरू सकतं. मुलांना तेच शिकवा, तेच खाऊ घाला जे त्यांच्यासाठी, त्यांच्या मेंदूसाठी योग्य आहे.
कोणत्याही प्रकारच्या सप्लिमेंट्स त्यांच्यासाठी धोकादायक ठरू शकतात. मुलांनी दररोज ३० मिनिटं का होईना व्यायाम करणं गरजेचं आहे. मुलांच्या आहारात हेल्दी पदार्थांचा समावेश जसं की ड्राय फ्रुट्स, आवळा, गाईचे दूध यांचा समावेश असावा. मुलांनी केवळ पुस्तकी ज्ञान मिळवू नये. त्यांच्यात चांगले संस्कार आणि सकारात्मक विचार असायला हवेत.