शाळा नुकत्याच सुरू झालेल्या आहेत. जी मुलं यंदा पहिल्यांदाच शाळेत गेली त्या मुलांच्या घरी संमिश्र वातावरण असतं. आपलं मुल एक पाऊल पुढे गेलं म्हणून आनंदही होतो आणि ते शाळेत जर रडत रडत जात असेल तर त्याला पाहून जरा वाईटही वाटतं. हल्ली बऱ्याच पालकांचं असं झालं आहे की मुलं घरी खूप त्रास देतात किंवा घरी त्यांच्यासोबत खेळायला कोणी नसतं म्हणून पालक मुलांना थोडं लवकरच शाळेत पाठवतात. मुलं शाळेत गेलं की तेवढेच २ ते ३ तास पालकांनाही हुश्श वाटतं.. एकच तर वर्ष किंवा काही महिनेच तर लवकर टाकलंय, त्यात काय एवढं असा पालकांचा दृष्टीकोन असतो. पण तेच मुलांच्या भविष्याविषयी अतिशय धोकादायक ठरू शकतं, असं तज्ज्ञ सांगत आहेत..
मुलांना लवकर शाळेत घालण्याचे तोटे..
याविषयी माहिती सांगणारा व्हिडिओ amuktamuk या इंस्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये बाल मानसोपचारतज्ज्ञ असं सांगत आहेत की १ वर्षाचा कालावधी हा एखाद्या ४ ते ५ वर्षांच्या मुलांच्या दृष्टीने खूप मोठा असतो.
साखर खाऊनही वजन कमी होऊ शकतं! घ्या खास टिप्स, लवकरच व्हाल चवळीची शेंग..
मुल ज्या मुलांसोबत वर्गात बसतं ती त्याच्यापेक्षा मोठी असतात. त्यामुळे साहजिकच त्यांच्या क्षमता याच्यापेक्षा जास्त असतात. अशावेळी त्या मुलाच्या मनावर या गोष्टींचा नकारात्मक परिणाम होतो. जे मुल खूप बुद्धिमान असतं, ते हा बदल चटकन स्विकारून पुढे जाऊ शकतं. पण प्रत्येक मुलालाच हे शक्य होईल असं नाही.
त्यातूनच एडीएचडी म्हणजेच हायपर ॲक्टिव्हिटी डिसऑर्डर हा आजार मुलांमध्ये वाढू शकतो. याचं कारण म्हणजे जी गोष्ट सोबतच्या मुलाला जमते आहे ती आपल्याला जमत नाही, हे पाहून मुल आतल्या आत अस्वस्थ होत जातं. त्यातून त्याची धडपड वाढत जाते.
ओठांवर खूप भेगा दिसतात- कोरडे पडून काळवंडले? घ्या उपाय- ओठ होतील मऊ, गुलाबी
त्यामुळे पालकांनी मुलांना वेळेत शाळेत घालावं. वेळ जात नाही, मुलं घरी रमत नाहीत किंवा घरी खूप त्रास देतात या कोणत्याही कारणामुळे त्याला योग्य वय येण्याच्या आधीच शाळेत पाठविण्याची घाई करू नये.