Lokmat Sakhi >Parenting > कामाचा ताण वाढला की मुलांवर चिडचिड करता- राग काढता? मुलं दुरावण्यापूर्वी ३ गोष्टी करा..

कामाचा ताण वाढला की मुलांवर चिडचिड करता- राग काढता? मुलं दुरावण्यापूर्वी ३ गोष्टी करा..

Parenting Tips: बऱ्याच महिलांचं असं होतं की कामाचा ताण वाढतो आणि मग त्याचा सगळा ताण, राग, चिडचिड मुलांवर निघते (as a mother how to keep ourself cool and calm). असं होऊ नये म्हणून काय करावं?(3 tips to control anger)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2024 16:30 IST2024-12-23T12:49:54+5:302024-12-23T16:30:46+5:30

Parenting Tips: बऱ्याच महिलांचं असं होतं की कामाचा ताण वाढतो आणि मग त्याचा सगळा ताण, राग, चिडचिड मुलांवर निघते (as a mother how to keep ourself cool and calm). असं होऊ नये म्हणून काय करावं?(3 tips to control anger)

as a mother how to keep ourself cool and calm, 3 tips to control anger, how to handle work load and work stress | कामाचा ताण वाढला की मुलांवर चिडचिड करता- राग काढता? मुलं दुरावण्यापूर्वी ३ गोष्टी करा..

कामाचा ताण वाढला की मुलांवर चिडचिड करता- राग काढता? मुलं दुरावण्यापूर्वी ३ गोष्टी करा..

Highlightsयामुळे मग मुलं एकतर खूप बुजरे होतात. आईला घाबरू लागतात. काही मुलांच्या बाबतीत उलट होतं. ते आई- वडिलांच्या धाकाने त्यांच्याशी मनमोकळं बोलणं बंद करतात.

लग्न झाल्यावर तर प्रत्येक महिलेच्या आयुष्यात खूप मोठा बदल होत असतोच. पण जेव्हा मुलं होतात आणि मुलांच्या संगोपनाची, घराची सगळी जबाबदारी त्यांच्या अंगावर येते तेव्हा तर पुर्ण आयुष्यच बदलून जातं. मुलांचं करताना, घरातली कामं उरकताना अतिशय तारांबळ उडते. त्यात जर ती वर्किंग वुमन असेल तर मग तिच्यामागची धावपळ, गडबड तर विचारायलाच नको. हे सगळं करताना मन, शरीर थकून जातं (how to handle work load and work stress?). एका पॉईंटला त्याचा ताण सहन होत नाही आणि मग सगळा ताण, राग, चिडचिड मुलांवर निघते (as a mother how to keep ourself cool and calm). कारण मुलं याबाबतीत अगदी सॉफ्ट टार्गेट ठरतात.(3 tips to control anger)

 

रागाच्याभरात तर मुलांना ओरडून आपण मोकळं होऊन जातो, पण नंतर मात्र मन स्वत:ला खात राहातं. मनात भयंकर अपराधी भावना येते. यानंतर काही दिवस चांगले गेले की पुन्हा तेच सगळं होतं. पुन्हा रोजचा सगळा ताण असह्य होतो आणि मग मुलांवर आपण विनाकारण चिडचिड करतो.

गार-गरम खाल्लं की दात ठणकतात? दात किडू नये म्हणून ‘हे’ ५ पदार्थ नियमित खा 

यामुळे मग मुलं एकतर खूप बुजरे होतात. आईला घाबरू लागतात. काही मुलांच्या बाबतीत उलट होतं. ते आई- वडिलांच्या धाकाने त्यांच्याशी मनमोकळं बोलणं बंद करतात. मित्रांमध्ये जास्त रमतात. थोडक्यात काय तर अशा चिडक्या पालकांपासून दूर जाऊ लागतात. अशा पद्धतीने तुमच्या मुलांना तुमच्यापासून दूर जाऊ द्यायचं नसेल आणि त्यांच्यावर विनाकारण होणारी चिडचिड थांबवायची असेल तर या काही साध्यासोप्या गोष्टी करून पाहा...

 

अतिताणामुळे मुलांवर होणारी चिडचिड कशी थांबवावी?

१. बऱ्याच महिलांच्या बाबतीत असं होतं की घरातलं सगळं आपणच करावं, कोणत्याही कामात कोणाचीही मदत घेऊ नये अशी त्यांची इच्छा असते.

हृदयविकाराचा धोका टाळण्यासाठी 'या' पद्धतीने करा वॉकिंग, आरोग्याला होतील भरपूर फायदे

दुसऱ्यांकडून मदत घेणं एकतर त्यांना पटत नाही किंवा मग आपल्याला दुसऱ्या कोणाची मदत लागते आहे म्हणजे आपल्यात काहीतरी कमी आहे, असं त्यांना वाटतं. असं समजणं बंद करा आणि जिथे शक्य असेल तिथे दुसऱ्यांची मदत घ्या.

२. प्रत्येक गोष्ट परफेक्टच असावी, असा काही महिलांचा अट्टहास असतो. काही काही बाबतीत परफेक्शन सोडून द्या आणि थोडं रिलॅक्स राहा..

 

३. रोजच्या कामातून थोडा वेळ का असेना पण स्वत:साठी ब्रेक घ्या. तो ब्रेक १०- १५ मिनिटांचा असेल तरी चालेल. पण तो वेळ स्वत:साठी ठेवा.

ट्रायग्लिसराईड्स खूप वाढलं? फक्त तेल कमी करून उपयोग नाही, ५ गोष्टीही करा- हृदय राहील मजबूत

त्या वेळात घरातली, ऑफिसची किती कामं होतील, असा विचार करू नका. त्यावेळेत रिलॅक्स राहा. मन शांत करण्याचा प्रयत्न करा. मेडिटेशन करा, गाणी ऐका किंवा तुमच्या आवडीची इतर कोणतीही कामं करा. 

 

Web Title: as a mother how to keep ourself cool and calm, 3 tips to control anger, how to handle work load and work stress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.