lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Parenting > मुलांना वाचनाची आवड लागण्यासाठी ट्विंकल खन्ना सांगतेय १ उपाय- मोबाईल, टीव्ही बघणं होईल कमी 

मुलांना वाचनाची आवड लागण्यासाठी ट्विंकल खन्ना सांगतेय १ उपाय- मोबाईल, टीव्ही बघणं होईल कमी 

How To Develop Reading Habits In Children: मुलांना वाचनाची आवड लागण्यासाठी काय उपाय करावा, याविषयी बघा ट्विंकल खन्ना हिने सांगितलेली ही खास माहिती.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2024 12:17 PM2024-04-24T12:17:32+5:302024-04-24T12:19:07+5:30

How To Develop Reading Habits In Children: मुलांना वाचनाची आवड लागण्यासाठी काय उपाय करावा, याविषयी बघा ट्विंकल खन्ना हिने सांगितलेली ही खास माहिती.

actress twinkle khanna suggests How to get your child to read more, how to develop reading habits in children | मुलांना वाचनाची आवड लागण्यासाठी ट्विंकल खन्ना सांगतेय १ उपाय- मोबाईल, टीव्ही बघणं होईल कमी 

मुलांना वाचनाची आवड लागण्यासाठी ट्विंकल खन्ना सांगतेय १ उपाय- मोबाईल, टीव्ही बघणं होईल कमी 

Highlightsती नेहमीच वेगवेगळी पुस्तके वाचते. तिची ही आवड तिच्या मुलांमध्येही यावी यासाठी ट्विंकल खन्नाने एक छान उपाय शोधून काढला.

सध्या मुलांच्या उन्हाळी सुट्ट्या आहेत. त्यामुळे बच्चे कंपनी सध्या अतिशय आनंदात आहे. कारण आता घड्याळ्याच्या काट्यावर उठणंही नको आणि अभ्यासही नको... धिंगाणा, मस्ती आणि दिवसभर गोंधळ, दंगा असं वातावरण सध्या बहुसंख्य घरांमध्ये दिसून येत आहे. या दिवसातली पालकांची सगळ्यात मोठी डोकेदुखी म्हणजे मुलं दिवसभर टीव्ही आणि मोबाईलसमोर बसलेली असतात. उन्हामुळे दिवसभर त्यांना बाहेरही पाठवता येत नाही. बैठे खेळ खेळायला कुणाची सोबत नसते. त्यामुळे मग मुलांचं सुट्ट्यांमध्ये टीव्ही- मोबाईल पाहणं खूप वाढतं. त्यांचं गॅझेट्ससोबत रमण्याचं प्रमाण कमी व्हावं आणि त्यांना वाचनाची आवड कशी लावावी (how to develop reading habits in children), हा प्रश्नही अनेक पालकांसमोर असताेच. त्याच प्रश्नाचं एक सोपं सोल्यूशन ट्विंकल खन्ना सांगते आहे. (actress Twinkle Khanna suggests How to get your child to read more)

 

आपल्याला माहितीच आहे की ट्विंकल खन्ना ही एक उत्तम लेखिका आणि उत्कृष्ट वाचक आहे. ती नेहमीच वेगवेगळी पुस्तके वाचते. तिची ही आवड तिच्या मुलांमध्येही यावी यासाठी ट्विंकल खन्नाने एक छान उपाय शोधून काढला.

फ्रिजमध्ये चुकूनही ठेवू नयेत ही ६ फळं

तो उपाय तुम्हीही करून बघायला हरकत नाही. तिने याविषयीचा एक व्हिडिओ इनस्टाग्रामवर शेअर केला आहे. यामध्ये ती म्हणते की ती तिच्या ११ वर्षाच्या मुलीला घेऊन जवळच्या पुस्तकांच्या दुकानात गेली. तिथून तिने मुलीच्या इंटरेस्टनुसार अशी काही पुस्तकं घेतली की मुलांप्रमाणेच त्यांच्या पालकांनाही वाचता येतील. नंतर तिने आणि तिच्या मुलीने एकच पुस्तक वाचायला घेतलं. 

 

त्या पुस्तकातले जे मुद्दे आवडले किंवा जे मुद्दे समजले नाही, त्यांच्यावर काहीतरी खूण करायची आणि नंतर दोघींनी मिळून त्यावर चर्चा करायची. यामुळे मुलं वाचायला लागतील शिवाय त्या पुस्तकांमध्ये वाचताना ते जे मार्किंग करतात, त्याद्वारे त्यांच्यासाठी अनेक छान आठवणी तयार होतील, असा तिला विश्वास वाटतो.

हिरव्याकंच कैरीचा चटक-मटक तक्कू, अवघ्या ५ मिनिटांत तयार होणारी अतिशय सोपी रेसिपी

हा उपाय करून पाहायला हरकत नाही. मुळातच पालक जर मुलांना नेहमी वाचताना दिसत असतील, तर बऱ्याचदा मुलं त्यांचं अनुकरण करतात आणि काहीतरी वाचायला बघतात. तुमच्या मुलांची जी आवड आहे, त्यानुसार काही पुस्तकं आणा आणि घरात अगदी सोफ्यावर, बेडवर, टिपॉयवर ठेवा. जेणेकरून ती त्यांना अगदी  सहज दिसतील आणि हातात घेऊन ते सुरुवातीला त्यांना चाळायला सुरुवात करतील. यातूनही त्यांची वाचनाची आवड विकसित होऊ शकते. 


 

Web Title: actress twinkle khanna suggests How to get your child to read more, how to develop reading habits in children

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.