Tap to Read ➤

फ्रिजमध्ये चुकूनही ठेवू नयेत ही ६ फळं

फळं, भाज्या फ्रिजमध्ये ठेवल्या की त्या ताज्या राहतात, हे अगदी खरं. पण काही फळं मात्र फ्रिजमध्ये ठेवणं आपल्या आरोग्यासाठी अजिबात चांगलं नाही.
त्यापैकी पहिलं फळ आहे केळी. केळी कधीही फ्रिजमध्ये ठेवू नये. त्यामुळे त्यांची पिकण्याची प्रक्रिया अतिशय मंद होते. केळीला आंबट चव येऊन ती काळी पडते.
टरबूज चिरलं की ते बऱ्याचदा उरतं. म्हणून आपण ते फ्रिजमध्ये ठेवून देतो. पण असं केल्याने त्यातले ॲण्टीऑक्सिडंट्स आणि पोषण मुल्ये कमी होत जातात.
फ्रिजमधील इथिलीन ऑक्साईड गॅसमुळे आंबे काळे पडतात. तसेच त्यांचा गोडवाही कमी होतो. आंबा तर फ्रिजमध्ये ठेवू नयेच. पण आंब्याचा रसही जास्त काळ फ्रिजमध्ये असू नये.
काकडीमध्ये आधीच खूप थंडावा आणि पाणी असते. त्यात ती जास्त दिवस फ्रिजमध्ये ठेवली तर खराब होते. त्यामुळे फ्रिजमध्ये जास्तीतजास्त ३ दिवस काकडी ठेवावी.
किवी हे फळ आर्द्रता लवकर शोषून घेतं. त्यामुळे ते फार फार तर एखादा दिवस फ्रिजमध्ये ठेवावं.
टोमॅटो जास्त दिवस फ्रिजमध्ये ठेवल्याने त्यांचा फ्लेवर कमी होतो. त्यामुळे २- ३ दिवसांपेक्षा जास्त दिवस टोमॅटो फ्रिजमध्ये ठेवू नयेत.
क्लिक करा