आदर्श पालक होण्याच्या प्रयत्नात आजकाल सर्वच पालक असतात पण नकळतपणे काही चुका केल्यानं पालक मुलांपासून दुरावतात आणि मुलं पालकांना आपल्याबद्दल काही गोष्टी शेअर करणं बंद करतात. तर कधी चुकीचे निर्णयही घेतात. अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या आपल्या मुलांबद्दल काही गोष्टी कधीच कोणालाही सांगू नयेत ते पाहू. जरी तुमची कितीही खास मैत्रिण असेल किंवा जवळचे नातेवाईक असतील तरी तुम्ही या गोष्टी सांगू नयेत. (4 Things You Should Never Reveal About Your Children To Others)
१) मुलांच्या चुका
चुकांमधून मुलं शिकत असतात. जर तुम्ही मुलांच्या चुका इतरांसमोर सांगितल्या तर मुलं घाबरून कोणतीही नवीन गोष्ट शिकण्यास किंवा नवीन अनुभव घेण्यास तयार होणार नाही. चुकणं हा नवीन काहीतरी शिकण्याचा एक महत्वाचा भाग असतो. मुलांच्या चुका जेव्हा तुम्ही चारचौघात सांगता तेव्हा मुलांचा आत्मविश्वास कमी होतो आणि मुलं आतून घाबरट होतात.
२) अभ्यासातील कमकुवतपणा
आमच्या मुलाला ना काहीच येत नाही.अभ्यासात फार ढ आहे, अभ्यासात फार कच्चा आहे. नेहमी अभ्यालाला टाळाटाळ करतो. पालकांनी असं बोलणं म्हणजे आपल्याच मुलांवर विशिष्ट शिक्का मारल्यासारखे आहे.कारण तुम्ही तुमच्या लेकरांविषयी जे काही बोलता मुलं तशीच वागतात.
३) मुलांच्या वैयक्तीक किंवा खासगी गोष्टी
मुलांनी तुम्हाला अत्यंत विश्वासानं सांगितलेल्या गोष्टी तुम्ही जेव्हा इतरांना सांगता तेव्हा तुमच्यावरचा मुलांचा विश्वास उडू शकतो. पालक म्हणून तुमच्यासाठी या गोष्टी शुल्लक असतील पण लेकरांच्या मनावर याचा सखोल परिणाम होतो. आपल्या मुलाला जर एखादी व्यक्ती आवडत असेल किंवा आवडत नसेल, मुलांना कोणत्या गोष्टींची भिती असेल तर ते सर्वांसमोर सांगू नका.
४) तुलना
पालकांनी आपल्या मुलांची तुलना इतरांसोबत कधीच करू नये. ती बघ तुझ्यापेक्षा चांगला अभ्यास करते, तो तुझ्यापेक्षा हूशार आहे किंवा अमूक अमूक मुलाला तुझ्यापेक्षा चांगल्या सवयी आहेत असं म्हणणं म्हणजे आपल्याच लेकराला कमीपणाची भावना देण्यासारखं आहे. मुलांची सतत तुलना केल्यानं त्यांच्या मनात न्युनगंड तयार होतो. त्यामुळे मुलं पालकांपासून आतून डिस्कनेक्ट व्हायला लागतात, तुटायला लागतात आणि पालकांपासून मनाने दुरावतात.
Web Summary : Avoid sharing children's mistakes, academic weaknesses, personal matters, or making comparisons. Such actions erode trust, lower self-esteem, and emotionally disconnect children from their parents, hindering open communication and creating distance.
Web Summary : बच्चों की गलतियाँ, शैक्षणिक कमज़ोरी, निजी बातें या तुलना करने से बचें। ऐसे कार्य विश्वास को कम करते हैं, आत्मविश्वास को कम करते हैं, और बच्चों को भावनात्मक रूप से माता-पिता से अलग करते हैं, जिससे खुला संचार बाधित होता है और दूरी बनती है।