Lokmat Sakhi >Parenting > मुलांच्या बौद्धिक- शारिरीक विकासासाठी ३ फळं अतिशय महत्त्वाची, रोज खाऊ घाला- मुलं होतील धडधाकट

मुलांच्या बौद्धिक- शारिरीक विकासासाठी ३ फळं अतिशय महत्त्वाची, रोज खाऊ घाला- मुलं होतील धडधाकट

3 Fruits For The Intellectual And Physical Development Of Children: मुलांनी नियमितपणे ३ फळं खाणं अतिशय गरजेचं आहे. ती फळं नेमकी कोणती याविषयी बालरोगतज्ज्ञांनी दिलेली माहिती.. 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2025 09:30 IST2025-08-05T09:25:17+5:302025-08-05T09:30:02+5:30

3 Fruits For The Intellectual And Physical Development Of Children: मुलांनी नियमितपणे ३ फळं खाणं अतिशय गरजेचं आहे. ती फळं नेमकी कोणती याविषयी बालरोगतज्ज्ञांनी दिलेली माहिती.. 

3 fruits are very important for the intellectual and physical development of children, eat them every day - children will become strong | मुलांच्या बौद्धिक- शारिरीक विकासासाठी ३ फळं अतिशय महत्त्वाची, रोज खाऊ घाला- मुलं होतील धडधाकट

मुलांच्या बौद्धिक- शारिरीक विकासासाठी ३ फळं अतिशय महत्त्वाची, रोज खाऊ घाला- मुलं होतील धडधाकट

Highlightsमुलांच्या वाढीच्या दृष्टीने त्यांनी नियमितपणे काही फळं खाणंही खूप गरजेचं आहे.

मुलांचा बौद्धिक आणि शारिरीक विकास उत्तम होण्यासाठी मुलांच्या आहाराकडे पालकांचं बारकाईने लक्ष असणं गरजेचं आहे. अन्यथा अपुऱ्या पोषणाचा परिणाम मुलांच्या तब्येतीवर आणि अभ्यासावरही होतो. मुलांना पौष्टिक पदार्थ खायला द्यायचे म्हणजे खूप काही वेगळं करायचं असं मुळीच नाही. आपले पारंपरिक पदार्थच जर वेळच्यावेळी योग्य पद्धतीने मुलांना खायला दिले तरी त्यांच्या वाढीसाठी ते पुरेसे ठरते. मुलांच्या वाढीच्या दृष्टीने त्यांनी नियमितपणे काही फळं खाणंही खूप गरजेचं आहे. ती फळं नेमकी कोणती याविषयी बालरोग तज्ज्ञांनी दिलेली ही खास माहिती...(3 Fruits For The Intellectual And Physical Development Of Children)

मुलांच्या बौद्धिक- शारिरीक विकासासाठी उपयुक्त असणारी फळं..

 

१. केळी

केळीमध्ये पोटॅशियम भरपूर प्रमाणात असते. त्यामुळे स्नायूंच्या मजबुतीसाठी आणि हृदयाच्या आरोग्यासाठी केळी खाणे फायदेशीर ठरते.

ऐश्वर्या नारकर सांगतात अळूवडी करण्याची खास रेसिपी, बेसनाऐवजी 'हा' पदार्थ घाला; वड्या जास्त चवदार होतील

नॅचरल शुगर असते त्यामुळे इंस्टंट एनर्जी मिळते. केळीमध्ये प्रीबायोटिक फायबर असतात. त्यामुळे पचनक्रिया सुधारण्यासाठी मदत होते. केळीमध्ये असणारे व्हिटॅमिन बी ६ मूड डेव्हलपमेंट आणि मेंदूच्या विकासासाठी फायदेशीर ठरतात.

 

२. पपई

मुलांना नियमितपणे पपई देण्याचे कित्येक फायदे आहेत. पपईमधून व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन सी मिळते. त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढून मुलांचे डोळ्यांचे आरोग्यही सुधारते.

बेलाच्या पानाचे ५ जबरदस्त फायदे- श्रावणात बेलाच्या पानांना अतिशय महत्त्व आहे कारण....

पॅपेन हे एन्झाईम मुलांची पचनक्रिया चांगली होण्यास मदत करते. त्यामुळे मुलांना कॉन्स्टिपेशनचा त्रास होत नाही. अशक्तपणा कमी करण्यासाठी मुलांना नियमितपणे पपई द्यायला हवी.

 

३. सफरचंद

सफरचंदामध्ये ॲण्टीऑक्सिडंट्स, फायबर न्युट्रियंट्स, आणि सोल्युबल फायबर असतात. त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते.

राखीपौर्णिमेला १ हजार रुपयांपेक्षा कमी किमतीत घ्या पार्टीवेअर डिझायनर साडी, पाहा २ आकर्षक पर्याय

त्यामुळे या ३ फळांपैकी एखादं फळ मुलांना रोज द्यायला हवं, अशी माहिती डॉक्टरांनी dr_kiranphadtare_gharge या इंस्टाग्राम पेजवर शेअर केली आहे. 


 

Web Title: 3 fruits are very important for the intellectual and physical development of children, eat them every day - children will become strong

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.