बऱ्याचदा मुलांच्या बाबतीत आपण असं पाहातो की साधारण ती थोडी कळत्या वयाची झाली की आपोआपच ते शांत, अबोल होऊ लागतात. डोक्यावर कसला तरी ताण आहे अशा ओझ्याखाली राहू लागतात. पालकांशीही त्यांचा संवाद कमी कमी होत जातो आणि चारचौघांत बोलण्याची, काही तरी करून दाखविण्याची सवय कमी कमी होत जाते. आत्मविश्वास कमी व्हायला लागतो. याचा परिणाम त्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासावर तर होतोच, पण अभ्यासावरही दिसून येतो (2 things that killed your child's confidence). याविषयी तज्ज्ञ असं सांगतात की मुलांच्या स्वभावात असा बदल होण्यासाठी अनेक गोष्टी कारणीभूत असू शकतात. त्यापैकीच घरगुती स्तरावर होणाऱ्या २ गोष्टी त्यांनी पुढे नमूद केल्या आहेत.(how to make your child focused and confidant?)
मुलांचा आत्मविश्वास कमी करणाऱ्या २ गोष्टी...
आपल्या घरातल्या कोणत्या गोष्टी कारणीभूत असू शकतात.
१. मुलांच्या भावना दाबून टाकणे
काही काही घरांमध्ये असं वातावरण असतं की जिथे पालक सांगतील ते आणि तसंच मुलांना करावं लागतं.
मुंग्यांनाही लावा थोडीशी टाल्कम पावडर! घरातून मुंग्यांना घालवून टाकण्यासाठी भन्नाट देसी जुगाड...
काही काही गोष्टींमध्ये मुलांना शिस्त लागण्यासाठी पालकांनी अशा पद्धतीने मुलांना सक्ती करणं गरजेचंच असतं. पण वारंवार अशी सक्ती होत असेल तर त्यामुळे मुलांच्या भावना दबून जातात. आपण काही केलं तरी ते पालकांना आवडणार नाही, अशी त्यांची ठाम समजूत होत जाते आणि त्यामुळे ते हळूहळू व्यक्त होणं, बोलणं टाळतात. आपण नेहमीच चुकतो, ही भावना त्यांच्या मनात बळावते आणि त्यातूनच त्यांचा कॉन्फिडन्स कमी व्हायला सुरुवात होते.
२. पालकांचे वाद
काही काही घरांमध्ये पालकांमध्ये टोकाचे वाद असतात. दोन्ही पालकांचे नेहमीच मतभेद होत असतील किंवा त्यांचे विचार कधीच जुळत नसतील, घरात नेहमीच तणावाचे वातावरण असेल तर त्याचाही वाईट परिणाम मुलांवर होत जातो.
सणासुदीला मॅचिंग ब्लाऊजची पंचाईत होते? फक्त ४ रंगाचे ब्लाऊज शिवा, सगळ्या साड्यांवर सूट होतील
मुलं पालकांनी भावनिक दृष्ट्या कनेक्ट होत नाहीत. पालकांच्या या स्वभावामुळे ते दोन्ही पालकांपासून दुरावू लागतात. काही काही मुलांना घरातल्या या परिस्थितीमुळे असुरक्षित वाटतं आणि त्याचाही परिणाम त्यांच्या आत्मविश्वासावर होतो.