प्रत्येकालाच प्रिय अशी गोष्ट म्हणजे झोप. 'धावपळीच्या जीवनात झोपेची फार वाट लागली आहे'. हे वाक्य सर्वांच्या तोंडी ऐकायला मिळते. आपण व्यवस्थित झोप घेणार्या माणसाला आळशी समजतो. ( Your mental balance will deteriorate, read the effects of lack of sleep) खरं बघायला गेलं तर, तो माणूस आपल्यापेक्षा जास्त आनंदी आणि उत्साही असतो. अति झोप वाईटच, पण योग्य झोप अत्यंत महत्त्वाची. आपण म्हणू झोपेसारख्या विषयाबद्दल कशाला करायचा विचार. पण तुम्हाला माहिती आहे का? ( Your mental balance will deteriorate, read the effects of lack of sleep) नवीन पिढीतील मुलांची स्लिप-सायकल हलल्याने किती वाईट परिणाम होत आहेत. मानसोपचारतज्ज्ञ 'जीम होर्न' यांच्या एका अभ्यासात 'महिलांसाठी मध्यंतरी पुरूषांपेक्षा तासभर जास्त झोप गरजेची असते.' असे त्यांनी सांगितले होते. पण भारतातील महिला जास्त सोडाच, पुरूषांएवढी ही झोप घेत नाहीत.
रात्रीची आठ तासांची झोप अत्यंत महत्त्वाची असते. दुपारची झोप वगैरे धरून आठ तास नाही. ( Your mental balance will deteriorate, read the effects of lack of sleep)सलग रात्रीचे आठ तास. आजकालची पिढी पहाटेपर्यंत जागते. त्यामुळे त्यांच्यात आजाराचे प्रमाण वाढले आहे. शरीराला दिवसभर काम केल्यावर थकवा येतो. हे आपल्याला माहितीच आहे. त्यामुळे आपण झोप घेतो. पण आपल्याकडे आजही ही मानसिकता आहे की, ज्या दिवशी काम केलं नाही, सुट्टी घेतली त्या दिवशी थकवा येत नाही. झोपेची जास्त गरज मेंदूला असते. शारीरिक काम करताना असो किंवा नुसते बसून राहीलात, तरीही मेंदू कार्यक्षम असतो. आपण झोपल्यावरही तो कार्यरत असतो. मात्र त्यावर ताण येत नाही. झोपेनंतर शरीर, मेंदू यांची कार्यक्षमता वाढते.
आपण बघतो की रात्रभर जागण्याची सवय काहींना असते. त्यांना झोपच येत नाही. अशांना वाटते आपण जास्त कार्यक्षम आहोत. आळशी नाही. पण तसे नसून, ही समस्या फार गंभीर आहे. झोप न लागणं हा एक मानसिक आजार आहे. त्याचे परिणाम फार भयानक ठरू शकतात. अनेक उदाहरणे आहेत, ज्यात झोप न झाल्याने लोकांना भास व्हायला लागतात. जर तुम्हाला झोप लागत नसेल तर डॉक्टरांकडे तातडीने जा. वेळीच उपाय करून घ्या.
आणि उगाच झोपेची टाळाटाळ करणाऱ्या महिलांनी झोपेला महत्त्व द्या.