Lokmat Sakhi >Mental Health > मेंदू गंजून निकामी होतोय तुमचा, अनेकांना झालाय ब्रेन रॉटिंग नावाचा आजार! शरीर होतेय लोळागोळा

मेंदू गंजून निकामी होतोय तुमचा, अनेकांना झालाय ब्रेन रॉटिंग नावाचा आजार! शरीर होतेय लोळागोळा

Your brain is rusting, many people have a disease called brain rotting! The body is becoming a mess : तुम्हीही दिवसभर बेडवर पडून असता का? मग हे वाचायलाच हवे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2025 16:37 IST2025-05-16T14:23:31+5:302025-05-16T16:37:58+5:30

Your brain is rusting, many people have a disease called brain rotting! The body is becoming a mess : तुम्हीही दिवसभर बेडवर पडून असता का? मग हे वाचायलाच हवे.

Your brain is rusting, many people have a disease called brain rotting! The body is becoming a mess | मेंदू गंजून निकामी होतोय तुमचा, अनेकांना झालाय ब्रेन रॉटिंग नावाचा आजार! शरीर होतेय लोळागोळा

मेंदू गंजून निकामी होतोय तुमचा, अनेकांना झालाय ब्रेन रॉटिंग नावाचा आजार! शरीर होतेय लोळागोळा

आपण रोज मोबाइल वापरतो. मोबाइलमध्ये एक फिचर आहे जे आपण कधी पाहतही नाही. (Your brain is rusting, many people have a disease called brain rotting! The body is becoming a mess)मात्र खरं तर ते रोज चेक करायला हवं. ते म्हणजे स्क्रिनटायमिंग. दिवसभरात किती मोबाइल वापरला गेला, कोणता अॅप जास्त वारला, हे जाणून घेण्यासाठी हे फिचर आहे. काहींचे स्क्रिन टाइमिंग अगदी २ ते ३ तास असते, तर काहींचे १० ही असू शकते. दिवसभर मोबाइल वापरण्याची वाईट सवय सगळ्यांनाच लागली आहे. त्याला कोणी अपवाद नाही. तासंतास इंस्टाग्रामवर रिल्स पाहत बेडवर पडून राहणे याला आपण आळस म्हणतो. मात्र सध्या एक नवीन संकल्पना फार चर्चेत आहे. ती म्हणजे  बेड रॉटिंग. रॉटिंग या शब्दाचा अर्थ सडणे असा आहे. दिवसभर पलंगावर पडून राहिल्यावर रॉटिंगच होणार असा या संकल्पनेचा मतित अर्थ आहे. ऐकताना फार साधी समस्या वाटली तरी परिणाम गंभीर असू शकतात. 

सगळी कामे बेडवरच करायची. मग जेवणही बेडवरच करायचे. पडल्यापडल्या मोबाइल पाहायचा. पुस्तक वाचायचे. दिवसातला अर्धा वेळ बेडवर घालवायचा. (Your brain is rusting, many people have a disease called brain rotting! The body is becoming a mess)काही कारणास्तव बेड सोडायला लागला तर मग चिडचिड होते. यालाच बेड रॉटिंग म्हणतात. जर तुम्हीही असे वागता तर त्या मागे दोन कारणे असू शकता. वेळीच ही सवय बदलणे फार गरजेचे आहे. दिवसभर असे पडून राहिल्याने आळस तर वाढतोच, मात्र त्याचा आरोग्यावर फार वाईट परिणाम होतो. वजन वाढते. बौद्धिक व शारीरिक क्षमता कमी होते. आजकाल इंस्टाग्रावरील मिम्स पाहिल्यावर असे लक्षात येते की, लोक या सवयी बिनधास्त आत्मसात करत आहेत. त्यांना असे वागण्यात काही चुकीचे वाटत नाही. कम्फर्ट झोन सोडणे फार गरजेचे असते. त्याशिवाय आयुष्यात यश मिळत नाही. तसेच आजकाल कामही घरुन करता येते. अनेक जण बेडमध्ये पडल्यापडल्याच काम करतात.      

हा आळसाचा एक भाग झाला मात्र दुसरी बाजू आहे ती म्हणजे मानसिक स्थितीची. काही वेळा मनाने थकलेली माणसे असे वागतात. त्यांना ते जाणवत नाही मात्र अति ताणामुळे तसेच भावनांचा कल्लोळ उडाला असल्यामुळे मग पलंग माणसांपेक्षा जवळचा वाटतो. आणि त्यावर पडून राहिल्यावरच बरे वाटते. मात्र सतत पलंगावर पडून राहिल्याने अशी मानसिक स्थिती आणखी गंभीर होऊ शकते. त्यामुळे रोजचे वेळापत्रक तयार करुन सगळी कामे वेळेवरच करा. जास्त वेळ पलंगावर राहू नका. बैठे काम असेल तर खुर्चीत बसा किंवा सोफ्यावर बसा सतत बेडवर राहू नका. 

Web Title: Your brain is rusting, many people have a disease called brain rotting! The body is becoming a mess

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.