lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Mental Health > १० ते १९ वयोगटातील मुलं मानसिक आजाराने त्रस्त, झोप न येण्यापासून डिप्रेशनपर्यंत मुलांचं जगणं कशानं पोखरलं?

१० ते १९ वयोगटातील मुलं मानसिक आजाराने त्रस्त, झोप न येण्यापासून डिप्रेशनपर्यंत मुलांचं जगणं कशानं पोखरलं?

World Mental Health Day : जागतिक मानसिक आरोग्य दिन : १० ते १९ वयोगटातील १० पैकी ६ मुलं मानसिक आजारांचा सामना करत आहेत.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2023 06:11 PM2023-10-10T18:11:16+5:302023-10-10T18:25:31+5:30

World Mental Health Day : जागतिक मानसिक आरोग्य दिन : १० ते १९ वयोगटातील १० पैकी ६ मुलं मानसिक आजारांचा सामना करत आहेत.

World Mental Health Day : Children aged 10 to 19 are suffering from mental illness, from sleeplessness to depression. how to deal with it? | १० ते १९ वयोगटातील मुलं मानसिक आजाराने त्रस्त, झोप न येण्यापासून डिप्रेशनपर्यंत मुलांचं जगणं कशानं पोखरलं?

१० ते १९ वयोगटातील मुलं मानसिक आजाराने त्रस्त, झोप न येण्यापासून डिप्रेशनपर्यंत मुलांचं जगणं कशानं पोखरलं?

Highlightsमुलांना स्वतःला, त्यांच्या सोबत काम करणाऱ्या पालक व शिक्षकांना 'मानसिक आरोग्य' ही संकल्पना समजून घेण्याची गरज आहे.

सायली कुलकर्णी, (सायकॉलॉजिस्ट, पुणे)

जागतिक आरोग्य संस्था अर्थात वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या 'की फॅक्टस्' नुसार, जागतिक पातळीवर १० ते १९ वयोगटातील १० पैकी ६ मुले मानसिक आजारांचा सामना करत आहेत. यामध्ये डिप्रेशन, अँन्झायटी, ॲग्रेशन, झोपेच्या तक्रारी, कुटुंबापासून पळ काढणे इत्यादी समस्या तर, ADHD सारखे बिहेवियरल डिसऑर्डर्स, अनोरेकसिया - बुलेमिया यांसारखे इटिंग डिसऑर्डरस्, सायकोसिस, सुसाईड, स्वतःला दुखापत करून घेण्याची वृत्ती आणि रिस्क टेकिंग बिहेवियर अशा मानसिक आजारांचा समावेश होतो.
सायकॉलॉजिस्ट म्हणून काम करत असताना असे जाणवते की, या वयोगटातील बरीचशी मुले ही एकतर हाय लेव्हलची एक्साइटमेंट नाहीतर लो फिलिंग- डिप्रेशन याच टोकांवर रहायला शिकलेली आहेत. या अवस्थांचा बॅलेन्स अर्थातच सुवर्णमध्य लक्षात घेऊन त्याचा सराव करण्याची गरज या पिढीला आहे. आणि यासाठीच या वयोगटातील मुलांना स्वतःला, त्यांच्या सोबत काम करणाऱ्या पालक व शिक्षकांना 'मानसिक आरोग्य' ही संकल्पना समजून घेण्याची गरज आहे असे वाटते.


(Image : google)

मानसिक आरोग्य म्हणजे काय?

'मेंटल हेल्थ' अर्थातच मानसिक आरोग्य समजून घेत असताना मेंटल इलनेस (मानसिक आजारपण), डिस्ट्रेस (मानसिक त्रास) आणि वेल- बिईंग (मानसिक स्वास्थ्य) या संकल्पना आणि त्यातील नेमका फरक लक्षात घेणे आवश्यक आहे. या संकल्पना समजून घेण्यासाठी आपण राघव, रमा आणि स्वरा यांची उदाहरणे लक्षात घेऊ. राघवच्या नियंत्रणाबाहेर परिस्थिती जाऊन तो जेंव्हा चिंताग्रस्त होतो तेंव्हा तो नेहमीच स्वतःला शारीरिक इजा पोहोचवतो. रमाच्या नियंत्रणाबाहेर परिस्थिती जाऊन ती काळजीत पडते तेंव्हा काही काळासाठी नेमके काय करावे हे तिला सुचत नाही, तिला रडू कोसळते. स्वराच्या नियंत्रणाबाहेर जेंव्हा परिस्थिती जाते तेंव्हा ती स्वतःच्या मर्यादा व क्षमता यांचा विचार करून त्या परिस्थितीला सामोरी जाते.
वरील उदाहरणांमध्ये राघवचे उदाहरण हे मेंटल इलनेस दर्शवते. कारण या अवस्थेत सातत्याने निर्माण होणारी, सेल्फ हार्म सारखी विशिष्ट लक्षणे आहेत. साधारणता दोन आठवड्यापेक्षा जास्त काळ अशी लक्षणे जाणवत असतील तर नक्कीच तज्ज्ञांची मदत घेणे आवश्यक असते. अशी लक्षणे व्यक्तीच्या दैनंदिन व्यवहारावर प्रतिकूल परिणाम करतात.
रमाची अवस्था ही डिस्ट्रेस दर्शवते. ही अवस्था काही काळासाठी निर्माण झालेली आहे. रडू कोसळणे यासारखी लक्षणे ताणाच्या परिस्थितीशी सामना करताना, तात्पुरत्या स्वरूपात निर्माण झालेली आहेत. सध्याच्या काळात छोट्या-छोट्या ताणजन्य परिस्थिती या आयुष्याचा अविभाज्य भाग होऊन बसल्या आहेत. अशा परिस्थितीशी डील करत असताना, त्यांना हाताळत असताना व्यक्ती आपणहून काही मार्ग शोधत असते. कधी कधी मित्र, नातलग यांच्याशी संवाद साधून मार्ग शोधले जातात आणि ही अवस्था हाताळली जाते. एवढे करूनही जर अशी अवस्था हाताळता येत नसेल तर मात्र प्रोफेशनल हेल्प घेणे गरजेचे असते. यानिमित्ताने आपण हे लक्षात घेऊयात की प्री- टिनेज व टीनेज मधील काही मुलांना डिस्ट्रेस हाताळण्यासाठी त्या- त्या वेळी मदत व आधाराची गरज भासते. काही मुले स्वतः बाउन्स बॅक होऊ शकतात. काही मुले मित्र आई-बाबा यांच्या मदतीने तर काही प्रोफेशनल एक्सपर्टच्या मदतीने अशा आव्हानात्मक परिस्थितीतून बाहेर पडतात.अशी मदत भासणार्‍यांनी नक्कीच संकोच करू नये आणि मदत घेणाऱ्यांची इतरांनी टिंगल करू नये. कारण जसा पायात बोचणारा छोटासा खडा देखील वेळीच काढला नाही तर तोच पुढे जाऊन पायाला मोठी जखम करू शकतो तसेच काहीसे या मानसिक आजारांचेही असते.
वरील उदाहरणांपैकी स्वराचे उदाहरण हे 'मेंटल वेल-बिईंग' दर्शवते. स्वराला तिच्या क्षमता आणि मर्यादा यांची पूर्णपणे जाणीव आहे. चॅलेंजिंग इमोशन्स आणि सिच्युएशन्स हाताळत असताना स्वरा आपल्या क्षमतांचा वापर करत आपल्या ध्येयपूर्तीकडे वाटचाल करते. मेंटल वेल - बिईंग ही एक प्रक्रिया आहे. यामध्ये विवेकी विचार, भावनांची योग्य प्रकारे हाताळणी, सुदृढ नातेसंबंध आणि सुयोग्य कृती या सगळ्या घटकांचा एकत्रित समावेश होतो.


(Image : google)

मुलांसाठी काय करता येईल?

 प्री-टीन आणि टीनेजर्सची मेंटल हेल्थ समजून घेत असताना त्यांच्या 'मेंटल वेल - बिईंग' साठी स्वतः मुलांनी आणि त्यांच्या पालकांनी काय करावे?

१. स्वतःमधील क्षमता व कमतरता समजून घ्या.
२.आव्हानात्मक अर्थातच चॅलेंजिंग सिच्युएशन्स मध्ये स्वतःच्या क्षमता वापरून परिस्थिती हाताळण्याचे कौशल्य आत्मसात करा.
३. स्वतःमधील क्षमता व उपलब्ध संसाधने यांची परिणामकारक सांगड घालण्याचे कौशल्य आत्मसात करा.
४. वेगवेगळ्या परिस्थितीत निर्माण होणाऱ्या भावना समजून घ्याव्यात.
५.आव्हानात्मक परिस्थितीत निर्माण होणाऱ्या भावना व त्या हाताळण्याची हेल्दी पद्धत याचा सराव करा.
६.मेंटल हेल्थ चेकलिस्टचा उपयोग करा.
७. ब्रीदिंग टेक्निक्स, मेडिटेशन,योगा, एक्सरसाइज, छंद इ कोपिंग स्ट्रेटजीजचा सराव करा.
८. दैनंदिन जीवनात शिस्त व चांगल्या सवयी जोपासण्यावर भर द्या.
१०. रिल लाईफ पेक्षा रियल लाईफ मधल्या मित्र-मैत्रिणींशी संवाद साधा.
११. टॉक्सिक रिलेशनशिप आणि हेल्दी रिलेशनशिप यांमधला नेमका फरक लक्षात घ्या.
१२. हेल्दी रिलेशनशिप अर्थातच सुदृढ नातेसंबंध निर्माण करण्यावर भर द्या.
१३. सोशल मीडियाच्या आहारी जाऊ नका.
१४. आपल्या आई बाबा, शिक्षक, मित्र यांचा गायडन्स -मदत- आधार घेण्यामध्ये कमीपणा समजू नका.
१५. आवश्यकता भासल्यास संकोचपणे तज्ञांची मदत घ्या.

(लेखिका पुणे स्थित सायकॉलॉजिस्ट आहेत.)

Web Title: World Mental Health Day : Children aged 10 to 19 are suffering from mental illness, from sleeplessness to depression. how to deal with it?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.