येत्या रविवारी ८ मार्च रोजी आपण 'जागतिक महिला दिन(Women's Day 2026) साजरा करणार आहोत. हा दिवस केवळ शुभेच्छांचा किंवा कौतुकाचा नसून, स्वतःच्या प्रगल्भतेचा (Maturity) आढावा घेण्याचा आहे. स्त्रिया अनेकदा इतरांच्या सुखात स्वतःला इतकं झोकून देतात की, स्वतःचा आनंद शोधणं त्यांना कठीण होऊन बसतं. पण, खरंच तुम्हाला आज स्वतःचा आनंद स्वतःमध्ये शोधता येतोय का? इतरांना खुश करण्याच्या नादात स्वतःची ओढाताण न करता, योग्य ठिकाणी ठामपणे 'नाही' म्हणण्याची हिंमत तुम्ही कमावली आहे का? वय वाढण्यासोबतच तुमच्या विचारांत ती परिपक्वता आणि समंजसपणा आला आहे का, याचा विचार करण्याची हीच योग्य वेळ आहे. आपण खरंच 'मॅच्युअर' झालो आहोत की फक्त वयाने मोठे, हे तपासणारे ७ महत्त्वाचे मुद्दे खालीलप्रमाणे आहेत.
१. 'नाही' म्हणण्याची कला आणि मर्यादा (Setting Boundaries)
प्रगल्भतेचे पहिले लक्षण म्हणजे स्वतःच्या मानसिक शांततेसाठी 'नाही' म्हणायला शिकणे. इतरांना दुखवू नये म्हणून स्वतःची ओढाताण करणे तुम्ही थांबवले असेल आणि स्वतःच्या मर्यादा निश्चित केल्या असतील, तर तुम्ही खऱ्या अर्थाने मॅच्युअर झाला आहात.
२. स्वतःचा आनंद स्वतःमध्ये शोधणे
जेव्हा तुम्ही तुमच्या आनंदासाठी जोडीदार, मुले किंवा मित्रमैत्रिणींवर अवलंबून राहणे थांबवता, तेव्हा तुमची खरी प्रगती सुरू होते. स्वतःचे छंद जोपासणे आणि एकटे असतानाही आनंदी राहता येणे, ही एक मोठी मानसिक उपलब्धी आहे.
३. चुकांची जबाबदारी स्वीकारणे
अपयशाचे खापर नशिबावर किंवा इतरांवर फोडण्यापेक्षा, "माझी चूक झाली आणि मी ती सुधारेन," ही वृत्ती बाळगणे म्हणजे प्रगल्भता. स्वतःच्या वागण्याची जबाबदारी घेणे हे एका खंबीर स्त्रीचे लक्षण आहे.
४. 'लढवय्यी वृत्ती' आणि सावरण्याची क्षमता (Resilience)
मागच्या काही वर्षांत तुम्ही अनेक संकटांचा सामना केला असेल. पण त्यातून खचून न जाता तुम्ही पुन्हा उभे राहिलात आणि आज इथे खंबीरपणे उभे आहात, हेच तुमची आंतरिक शक्ती आणि मॅच्युरिटी सिद्ध करते.
५. तुलना करण्याच्या शर्यतीतून बाहेर पडणे
दुसरी स्त्री काय करतेय, तिच्याकडे काय आहे, यापेक्षा माझा कालचा दिवस कसा होता आणि आज मी काय सुधारणा केली, याकडे तुमचे लक्ष असेल तर तुम्ही योग्य मार्गावर आहात. स्वतःची तुलना स्वतःशी करणे, हाच प्रगल्भतेचा मार्ग आहे.
६. मोजकी पण प्रामाणिक माणसे सोबतीला असणे
खूप मोठी ओळख असण्यापेक्षा, जे दोन-तीन लोक तुमच्या कठीण काळात तुमच्या पाठीशी उभे राहतात, त्यांची किंमत तुम्हाला कळली असेल, तर तुम्ही जगाचे गणित समजून घेतले आहे. दिखाव्यापेक्षा विश्वासाला महत्त्व देणे म्हणजे मॅच्युरिटी.
७. मूलभूत गोष्टींबद्दल कृतज्ञता
राहायला घर, खायला अन्न आणि सुरक्षित आयुष्य या गोष्टी आजही अनेकांसाठी स्वप्न आहेत. या गोष्टी आपल्याकडे आहेत याबद्दल जर तुम्हाला मनापासून कृतज्ञता (Gratitude) वाटत असेल, तर तुमचं मन खरंच प्रगल्भ झालं आहे.
Web Summary : This Women's Day, assess your maturity. True growth involves self-love, setting boundaries, owning mistakes, resilience, avoiding comparisons, valuing genuine relationships, and gratitude for life's basics. Are you truly mature, or just older?
Web Summary : इस महिला दिवस पर, अपनी परिपक्वता का आकलन करें। सच्चे विकास में आत्म-प्रेम, सीमाएँ निर्धारित करना, गलतियों को स्वीकार करना, लचीलापन, तुलना से बचना, सच्चे रिश्तों को महत्व देना और जीवन की बुनियादी बातों के लिए कृतज्ञता शामिल है। क्या आप वास्तव में परिपक्व हैं, या सिर्फ बूढ़े?