Struggling To Sleep Without A Blanket: दिवसभराच्या थकव्यानंतर अनेकांना बेडवर पडताच लगेच झोप लागते. पण काही लोक असे असतात की, चादर किंवा ब्लँकेट घेतल्याशिवाय त्यांना झोपच येत नाही. मग हवामान कितीही गरम असो किंवा थंड, अंगावर काहीतरी घेतल्याशिवाय त्यांची रात्र पूर्ण होत नाही. अनेकांना ही फक्त सवय वाटते, पण यामागे सायकॉलीजीनुसार भावनिक कारणंही असू शकतात.
ब्लँकेट-चादरीशिवाय झोप का लागत नाही?
एक्सपर्ट सांगतात की, काही लोकांना चादर किंवा ब्लँकेटमुळे सुरक्षिततेची भावना मिळते. खासकरून ज्यांनी लहानपणी तणाव, भीती किंवा एकटेपणा अनुभवला असेल, त्यांना झोपताना स्वतःला सुरक्षित वाटण्यासाठी ब्लँकेटची गरज भासू शकते.
मानसशास्त्र काय सांगतं?
सायकोलॉजीनुसार, जास्त भावनिक आणि संवेदनशील लोकांना प्रेम, आधार आणि सुरक्षिततेची गरज अधिक असते. अशावेळी ब्लँकेट त्यांच्यासाठी एक प्रकारचा कम्फर्ट झोन बनतो. त्यामुळे अंगावर चादर घेतल्यावर मन शांत होतं आणि झोप पटकन लागते.
यामागे शरीराचंही कारण असू शकतं
ब्लँकेटमुळे शरीराला हलकासा दाब मिळतो. त्यामुळे मेंदूमध्ये रिलॅक्स वाटण्यास मदत करणारे हार्मोन्स सक्रिय होतात. यामुळे ताण कमी होऊन झोप अधिक आरामदायी वाटू शकते.
प्रत्येकासाठी वेगळं कारण
काही लोकांसाठी ही केवळ सवय असते, तर काहींसाठी मानसिक सुरक्षिततेशी जोडलेली भावना असू शकते. त्यामुळे कोणालाही ब्लँकेटशिवाय झोप येत नसेल तर ते नेहमीच विचित्र मानण्याची गरज नाही.
Web Summary : Needing a blanket, even in warm weather, can stem from a need for security, often linked to childhood experiences. Blankets provide comfort, reduce stress, and promote relaxation by stimulating hormones. It's a coping mechanism for some, not always just a habit.
Web Summary : गर्म मौसम में भी कंबल की आवश्यकता सुरक्षा की भावना से जुड़ी हो सकती है, जो अक्सर बचपन के अनुभवों से संबंधित होती है। कंबल आराम प्रदान करते हैं, तनाव कम करते हैं और हार्मोन को उत्तेजित करके विश्राम को बढ़ावा देते हैं। यह कुछ लोगों के लिए एक मुकाबला तंत्र है, हमेशा सिर्फ एक आदत नहीं।