What Is Monday Blues : सामान्यपणे ऑफिसमध्ये सहकाऱ्यांसोबत किंवा मित्र-मैत्रिणींसोबत नेहमीच ही चर्चा होत असते की, शनिवार आणि रविवारी दोन दिवसांच्या किंवा फक्त रविवारच्या सुट्टीनंतर सोमवारी ऑफिसला जायला खूप कंटाळा येतो. हे जवळपास जास्तीत जास्त नोकरदारांसोबत होत असेल. पण असं का होतं आणि याला काय म्हणतात हे अनेकांना माहीत नसतं. हे काही असंच होत नाही. यामागे सायन्टिफीक कारण आहे. ज्याला म्हणतात मंडे ब्लूज (Monday Blues). चला तर पाहुयात काय आहे हे मेंड ब्लूज.
मंडे ब्लूज म्हणजे काय?
मंडे ब्लूज हा शब्द तुम्ही कधीना कधी ऐकला असेल किंवा नसेलही. याचा अर्थ असा होतो की, काम किंवा शाळेच्या रूटीनमध्ये परत येणं कधी कधी काही लोकांसाठी कंटाळवाणं ठरतं. आठवड्याच्या सुरूवातीला ऑफिसचा तणाव अधिक जाणवतो. वीकेंडला लोक आराम करतात आणि त्यांची खाजगी आणि घरगुती कामे करतात. या दिवशी त्यांच्यावर कोणताही दबाव नसतो. पण सोमवारी पुन्हा त्याच दडपणाच्या रूटीनमध्ये परत येणं अवघड असतं.
सोमवारी काय होतं?
सामान्यपणे सोमवारी ऑफिसमध्ये नवीन कामे आणि जबाबदाऱ्या मिळतात. त्यामुळे आठवड्याच्या पहिल्या दिवशीच व्यक्तीला जास्त दबाव आणि तणावाचा सामना करावा लागतो. आठवड्याच्या पहिल्या दिवशी ऑफिसमध्ये मीटिंग आणि पूर्ण आठवड्याचा प्लान तयार करायचा असतो. याचं टेंशन रविवारच्या रात्रीपासूनच सुरू होतं. कारण वीकेंड संपलेला असतो आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उठून ऑफिसला जायचं असतं. हे अशा लोकांसोबत जास्त होतं जे त्यांच्या मनासारखं काम करत नाहीत किंवा आपलं काम एन्जॉय करत नाहीत.
एक्सपर्ट काय सांगतात?
मेडिकल न्यूज टुडेनुसार, मंडे ब्लूज अशा लोकांना जास्त प्रभावित करतं ज्यांना ऑफिसमध्ये पाच दिवस काम केल्यावर दोन दिवसांची सुट्टी मिळते. एक्सपर्ट असा सल्ला देतात की, नोकरीचा तणाव मंडे ब्लूजचं कारण होऊ शकत नाही. पण मंडे ब्लूज या गोष्टीला प्रभावित करतं की, व्यक्ती तणावाबाबत कशी प्रतिक्रिया देतं. एक्सपर्ट सांगतात की, मंडे ब्लूज असलेले लोक आठवड्याच्या सुरूवातीला तणावाप्रती वेगवेगळ्या प्रतिक्रिया देतात. आपल्या शेड्यूलवर नियंत्रण कमी असल्याने आठवड्याच्या सुरूवातीला आळस जाणवतो.
मंडे ब्लूज कसा टाळाल?
फोर्ब्सनुसार, मंडे ब्लूजपासून बचाव करण्यासाठी सगळ्यात आधी स्वत:ला विचारायला हवं की, तुम्हाला काय चुकीचं वाटत आहे. जर तुम्हाला जास्तीत जास्त आठवड्यांमध्ये मंडे ब्लूजची फीलिंग येत असेल, तर तुम्ही याकडे दुर्लक्ष करू नये. हा तुम्ही कामाबाबत नाखूश आहात याचा एक महत्वाचा संकेत आहे आणि यावर उपाय म्हणून तुम्ही पुढे जाऊन दुसरी नोकरी शोधली पाहिजे.
फ्लेक्सजॉबचे सीईओ आणि संस्थापक सारा सटन फेल सांगतात की, कर्मचाऱ्यांनी काही गोष्टींची एक लिस्ट बनवली पाहिजे. त्यात त्यांनी त्यांना नोकरी कशामुळे निराश करत आहे हे लिहिलं पाहिजे. जर तुम्हाला मूळ अडचण समजली तर ती दूर करण्यास मदत मिळेल. त्यासोबतच अशा गोष्टींचीही लिस्ट बनवा ज्यामुळे तुम्हाला ऑफिसला जाण्याचं मन होतं. त्यानंतर तुम्हाला ज्यात जास्त आनंद मिळतो त्यावर लक्ष केंद्रीत करा.
जर सोमवारी ऑफिसला जाण्याचा कंटाळा, आळस किंवा तणाव दूर करायचा असेल तर शुक्रवारी दुपारीपर्यंत स्वत:ला यासाठी तयार करा. आठवड्याच्या शेवटी अशा कामांवर लक्ष केंद्रीत करा जे तुम्हाला कमी पसंत आहेत. याने तुम्ही सोमवारी कोणत्याही तणावाशिवाय दिवसाची सुरूवात करू शकाल.