Interesting Facts About Memory : आपल्याला अनेकदा लक्षात येत असेल की, रोजच्या अनेक गोष्टी किंवा घटना सहजपणे आपल्या मेंदूत फिक्स होतात. पण अशाही काही गोष्टी असतात ज्या खूप महत्वाच्या असूनही आपण विसरतो. मग असा सहज प्रश्न पडू शकतो की, आपला मेंदू हे कसं ठरवतो की, कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत आणि कोणत्या विसरायच्या आहे? या अजब प्रश्नाच उत्तर आपण पाहणार आहोत.
हा महत्वाचा आणि इंटरेस्टींग मुद्दा समजून घेण्यासाठी बोस्टन यूनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी एक अभ्यास केला. जो सायन्स अॅडव्हान्स जर्नलमध्ये प्रकाशित झाला आहे. या अभ्यासातून समोर आलं की, मेंदू काही गोष्टी सहजपणे स्मरणात ठेवतो आणि काही गोष्टी आपली इच्छा असूनही लक्षात ठेवत नाही.
काही गोष्टीच का लक्षात राहतात?
या संशोधनात सहभागी झालेल्या अभ्यासकांचं मत आहे की, आपली स्मरणशक्ती ही काही एखादा कॅमेरा नाही, जी प्रत्येक गोष्टीला एकसारखी लक्षात ठेवेल. उलट मेंदू हे ठरवतो की, कोणत्या गोष्टी जास्त काळ लक्षात ठेवायच्या आहेत आणि कोणत्या विसरायच्या आहेत. खास बाब म्हणजे साध्या साध्या घटना तेव्हाच स्मरणात राहतात, जेव्हा त्यांच्याशी काही भावनिक संबंध असेल किंवा धक्कादायक काही घडलं असेल.
मेंदू ठरवतो मेमरीचं काम
प्रोफेसर रॉबर्ट एम. जी. रायनहार्ट सांगतात की, आठवणी तयार करणं एक अॅक्विट प्रोसेस आहे, ज्यात आपला मेंदू हे ठरवतो की, कोणत्या घटना किंवा माहिती महत्वाची आहे. जेव्हा काही भावनिक घडतं किंवा महत्वाचं घडतं, तेव्हा या गोष्टी आपल्या मेंदूला स्मरणात ठेवण्यास मदत करतात.
आठवणी कसा निवडतो मेंदू?
संशोधनातून असंही समोर आलं आहे की, मेंदू आठवणींना 'ग्रेडिंग स्केल' वर निवडतो. जर एखादी महत्वाची घटना घडली असेल आणि त्याचा काय प्रभाव पडतो त्यावर त्यांना लक्षात ठेवायचं की नाही हे ठरवलं जातं. तेच घटनेच्या आधीच्या गोष्टी तेव्हा स्मरणात राहतात, जेव्हा त्यांचा त्या घटनेशी संबंध असतो.
इंटरेस्टींग बाब म्हणजे जर दुसऱ्या आठवणी स्वतः खूप भावनिक असतील, तर मेंदू त्यांना तेवढं महत्त्व देत नाही. म्हणजेच मेंदू त्या कमकुवत आठवणी जपतो, ज्या सहज विसरल्या जाऊ शकतात.
आता आपल्या लक्षात आलं असेल की का किरकोळ वाटणाऱ्या अनेक छोट्या गोष्टी आपल्याला आठवत राहतात, पण महत्त्वाच्या गोष्टी आपण विसरतो. आपला मेंदू त्याच आठवणी सुरक्षित ठेवतो ज्या भावनिक, महत्त्वाच्या किंवा एखाद्या खास क्षणाशी जोडलेल्या असतात. साध्यासुध्या गोष्टीही तेव्हाच मेंदूत साठवल्या जातात, जेव्हा त्या मोठ्या अनुभवांशी जोडल्या जातात. हाच कारण आहे की काही आठवणी नेहमी मनात जिवंत राहतात, तर उरलेल्या वेळेसोबत मिटून जातात.