Join us  

उपाशीपोटीच ध्यान का करावे? ध्यान सकाळी लवकर करावे की रात्री? वेळ बदलली तर काय फरक पडतो..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2023 12:25 PM

When Is the Best Time of Day to Meditate? कामाच्या व्यापातून फक्त १० मिनिटे काढा, व नियमित मेडीटेशन करा - स्ट्रेस कमी करण्याची गुरुकिल्ली

आयुष्याच्या प्रत्येक स्तरावर स्पर्धा वाढली आहे. शाळा असो किंवा ऑफिसचं काम, पहिले येण्याच्या नादात आपण स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करत आहोत. बिघडलेली जीवनशैली, खाण्यापिण्याकडे लक्ष न देणं, उशिरा उठणे, रात्रभर जागणे. या सगळ्या गोष्टींमुळे शारीरिकसह मानसिक आरोग्य देखील बिघडते.

ताण - तणाव कमी करण्यासाठी अनेक लोकं मेडीटेशन करतात. जेव्हा आपली इंद्रिये सुस्त किंवा कंटाळवाणी होतात, तेव्हा ध्यान आपल्याला आपली जागरूकता वाढवण्याची संधी देते. नियमित ध्यान केल्याने तात्पुरत्या स्वरूपातील तणाव दूर होतो. पण मेडीटेशन करण्याची योग्य वेळ कोणती? उपाशीपोटी मेडीटेशन करावे की खाऊनही मेडीटेशन केले तर चालते? मेडीटेशनमुळे शरीराला कोणते फायदे होतात? पाहूयात(When Is the Best Time of Day to Meditate?).

मेडीटेशन म्हणजे काय?

ध्यान हा एक मानसिक व्यायाम आहे, ज्यामध्ये विश्रांती, एकाग्रता आणि जागरुकता यांचा समावेश होतो. शारीरिक व्यायाम आरोग्यासाठी उत्तम मानले जाते. पण ध्यान केल्यामुळे मन शांत होते. यासह मेंदूला देखील नवी चालना मिळते. हा व्यायाम सहसा वैयक्तिकरित्या शांत स्थितीत बसून आणि डोळे मिटून केला जातो.

करवटे बदलते रहे सारी रात..? सायंकाळी ४ चुका टाळा, तरच रात्री लागेल शांत झोप

रिकाम्या पोटी ध्यान करावे का?

रिकाम्या पोटी ध्यान करणे आपल्या आरोग्यासाठी अधिक फायदेशीर ठरू शकते. जेवल्यानंतर ध्यान केल्यास, झोप लागण्याची शक्यता जास्त असते. म्हणूनचं सकाळी फ्रेश वातावरणात, रिकाम्या पोटी ध्यान करावे. 

ध्यान कोणत्या वेळी करावे?

आपण ध्यान केव्हाही करू शकतो. परंतु, सकाळी केलेल्या मेडीटेशनमुळे मन प्रसन्न राहते. ज्यामुळे दिवसभर काम करण्याची उर्जा मिळते. व ताण देखील कमी होतो.

उपवास असेल तर दिवसभरात ७ गोष्टी करा आणि उपवास सोडतानाही ५ गोष्टी लक्षात ठेवा, तर उपवास होईल सोपा

ध्यान किती वेळ करावे?

दररोज आपण सकाळी २० ते ३० मिनिटे ध्यान करू शकता. असे केल्याने एकाग्रता वाढते, व मन शांत राहते. अनेकदा स्ट्रेसमुळे आपली चीड - चीड होते. मेडीटेशनमुळे मन शांततेने विचार करायला लागेल. आपण दिवसाच्या ३ सत्रांमध्ये १० मिनिटे मेडीटेशन करू शकता.

टॅग्स :मानसिक आरोग्यसाधनाहेल्थ टिप्स