Join us
Daily Top 2Weekly Top 5

घरभर फिरता पण काय शोधतोय आठवत नाही, कपाट कशासाठी उघडलं कळत नाही? पाहा ‘असं’ कशानं होतं..

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2026 16:50 IST

Doorway Effect : असं कशामुळे होतं, याचा फारसा कुणी विचार करत नाहीत आणि पुन्हा कामाला लागतात. आज आपण अशी समस्या का होते, त्याला काय म्हणतात हे समजून घेणार आहोत.   

Doorway Effect : घरात मोकळ्या वेळेत वेगवेगळी कामं करणं, उचलखाचल करणं या गोष्टी अनेकांना आवडतात. अशाने घर स्वच्छही राहतं, पसाराही होत नाही. पण आपण पाहिलं असेल की, घरातील काहीतरी काम करत असताना किंवा ऑफिसमध्ये काहीतरी काम करत असताना एका जागेहून दुसऱ्या जागी गेल्यावर किंवा एका रूममधून दुसऱ्या रूममध्ये पोहोचतो तेव्हा आपण तिथे कशासाठी आलोय हे विसरून जातो. अनेकांसोबत असं होतं. पण असं कशामुळे होतं, याचा फारसा कुणी विचार करत नाहीत आणि पुन्हा कामाला लागतात. आज आपण अशी समस्या का होते, त्याला काय म्हणतात हे समजून घेणार आहोत.   

खरंतर या स्थितीला विज्ञानाच्या भाषेत 'डोरवे इफेक्ट' म्हटलं जातं. जेव्हा आपण एका जागेहून दुसऱ्या जागी जातो, तेव्हा आपला मेंदू नव्या जागेच्या हिशेबाने बदलतो आणि जुनी माहिती मागे सोडतो. त्यामुळे अचानक आठवत नाही की, आपण काय घेण्यासाठी आलो होतो. हा काही कोणता आजार नाही किंवा कमजोरी नाही. मेंदूची एक सामान्य प्रक्रिया आहे. जेव्हा आपण थकलेले असतो, तणावात असतो किंवा एकत्र अनेक कामे करतो तेव्हा ही समस्या जास्त जाणवते.   

मानसोपचार तज्ज्ञ सांगतात की, जेव्हा मन स्थिर नसतं, कशात लक्ष लागत नाही तेव्हा आपण एखाद्या दुसऱ्या रूममध्ये जातो आणि अचानक तिथे कशासाठी आलो हे विसरून जातो. बऱ्याच वेळानंतर मग ते काम आठवतं. म्हणजे याला असं म्हणता येईल की, मेंदू रीसेट होतो.  

एक्सपर्टनुसार, नव्या ठिकाणी आल्यावर मेंदू जुन्या गोष्टी हटवून नव्या गोष्टींवर लक्ष देऊ लागतो. त्यामुळेच आपण अचानक विसरतो की, आपण काय घेण्यासाठी त्या ठिकाणी आलो होतो.   

असं जास्त कधी होतं?  

मेंदू जेव्हा जास्त थकलेला असतो तेव्हा ही समस्या अधिक बघायला मिळते. दिवसभर काम केल्यावर फोकस करण्याची क्षमता कमी होते. अशात जेव्हा आपण एका रूममधून दुसऱ्या रूममध्ये जातो तेव्हा मेंदू नवीन माहिती सांभाळू शकत नाही आणि जुनी गोष्टी लवकर विसरतो. जेव्हा आपण एखाद्या चिंतेत असतो तेव्हा मेंदू एकाच वेळी अनेक गोष्टी सुरू असतात. तेव्हा फोकस हलतो आणि छोट्या छोट्या गोष्टी आपण विसरू लागतो.  

लक्षात कसं ठेवाल?   

जी वस्तू घेण्यासाठी किंवा कामासाठी आपण जातोय, त्याचा फोटोचा मेंदू विचार करा.   

रस्त्यात स्वत:शी बोलत रहा की काय काम आहे.  

रूममध्ये शिरण्याआधी एक सेकंद थांबून काम आठवा.  

हातात एखादी छोटी वस्तू ठेवा, जेणेकरून आपल्याला काम लक्षात राहणार.

English
हिंदी सारांश
Web Title : Doorway Effect: Why do we forget why we entered a room?

Web Summary : The 'Doorway Effect' causes forgetfulness when moving between rooms. It's a normal brain process, worsened by stress or multitasking. Mental reminders and focus techniques can help combat this phenomenon.
टॅग्स :मानसिक आरोग्यहेल्थ टिप्स