Panic Attack Treatment: कामाचा वाढता ताण, कुटुंबाच्या जबाबदाऱ्या, सोशल मीडिया, आर्थिक अडचणी या सगळ्याच गोष्टींचा प्रभाव आपल्या मानसिक आरोग्यावर पडतो. सतत होणाऱ्या या गोष्टींमुळे भरपूर लोक तणावात राहतात. अशात बरेच लोक पॅनिक अॅटॅकसारख्या मानसिक समस्येचे शिकार होतात. गंभीर बाब म्हणजे पॅनिक अॅटॅक अनेकदा जीवघेणाची ठरू शकतो. त्यामुळे वेळीच याची ओळख पटवणे आणि योग्य उपाय करून तो कंट्रोल केला जाऊ शकतो. अशात पॅनिक अॅटॅक काय असतो आणि त्यावर काय उपाय करता येतात हे समजून घेऊया.
पॅनिक अॅटॅकची लक्षणे
पॅनिक अॅटॅक हा अचानक येणारा भीती किंवा चिंतेचा झटका असतो. यात व्यक्तीला असं वाटतं असतं की, काहीतरी भयानक होणार आहे. त्यामुळे हृदयाची धडधड वाढते, श्वास घेण्यास त्रास होतो, थंड घाम येतो, हाय-पाय सुन्न होतात किंवा झिणझिण्या येतात. पॅनिक अॅटॅकच्या मुख्य लक्षणांमध्ये घाम येणे किंवा थरथरी सुटणे, छातीत वेदना किंवा अस्वस्थता, चक्कर येणे किंवा बेशुद्ध पडणे, मरण्याची किंवा कंट्रोल होण्याची भिती यांचा समावेश आहे.
पॅनिक अॅटॅकची कारणे
पॅनिक अॅटॅकची कारणे वेगवेगळी असू शकतात. जसे की, तणाव, मानसिक समस्या जसे की, फोबिया किंवा PTSD, थायरॉइड, हृदयरोग किंवा हार्मोन असंतुलन, कॅफीन, दारू, ड्रग्स आणि परिवारात कुणीला पॅनिक डिसऑर्डर असणे.
पॅनिक अॅटॅक कंट्रोल करण्याचे उपाय
अचानक आलेला पॅनिक अॅटॅक कंट्रोल करण्यासाठी काही गोष्टी करता येतील. जसे की, 4-4-4-4 बॉक्स ब्रीदिंग एक्सरसाईज म्हणजे श्वास घेण्याचा व्यायाम. 4 सेकंद खोल श्वास घ्या, 4 सेकंद रोखून ठेवा, 4 सेकंद बाहेर सोडा आणि पुन्हा 4 सेकं रोखा. दुसरा उपाय म्हणजे घरातील 5 गोष्टींकडे बघा, 4 वस्तूंना स्पर्श करा, 3 आवाज ऐका, 2 सुंगध घ्या. सोबतच स्वत:ला सांगा की, हा केवळ एक पॅनिक अॅटॅक आहे, जो लवकरच जाणार आहे. कॅफीन आणि दारू टाळा. नियमित मेडिटेशन करा.
पॅनिक अॅटॅक पुन्हा पुन्हा येत असेल तर तो रोखण्यासाठी मानसिक आरोग्य मजबूत करा. त्यासाठी रोज किमान ३० मिनिटे व्यायाम करा. रोज ७ ते ८ तासांची झोप घ्या. सोशल मीडिया बघणं आणि स्क्रीन टाइम कमी करा. हेल्दी डाएट घ्या. स्ट्रेस मॅनेजमेंटसाठी आवडीच्या गोष्टी करा. जसे की, पेंटिंग करा, आवडीचं संगीत ऐका किंवा आवडीची पुस्तकं वाचा.
Web Summary : Panic attacks stem from stress, anxiety, or underlying conditions. Symptoms include rapid heartbeat and shortness of breath. Control it by breathing exercises and meditation. Seek help if attacks recur; prioritize mental health with exercise, sleep, and a healthy lifestyle.
Web Summary : पैनिक अटैक तनाव, चिंता या अंतर्निहित स्थितियों से उत्पन्न होते हैं। लक्षणों में दिल की धड़कन तेज होना और सांस फूलना शामिल हैं। श्वास व्यायाम और ध्यान से इसे नियंत्रित करें। यदि अटैक बार-बार होते हैं तो मदद लें; व्यायाम, नींद और स्वस्थ जीवनशैली के साथ मानसिक स्वास्थ्य को प्राथमिकता दें।