Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Mental Health > तुम्हाला एनहेडोनिया तर झालेला नाही? सगळं काही असूनही आनंदी वाटत नाही, सारखं काय होईल-कसं होईल..

तुम्हाला एनहेडोनिया तर झालेला नाही? सगळं काही असूनही आनंदी वाटत नाही, सारखं काय होईल-कसं होईल..

What is anhedonia : असे कितीतरी महिला किंवा पुरूष आहेत, ज्यांच्या परिवार, मित्र, पैसा आणि सोयी सुविधा आहेत. पण आतल्या आत त्यांना काहीतरी कमी जाणवत असते.

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2026 17:21 IST2026-01-29T11:56:38+5:302026-01-29T17:21:33+5:30

What is anhedonia : असे कितीतरी महिला किंवा पुरूष आहेत, ज्यांच्या परिवार, मित्र, पैसा आणि सोयी सुविधा आहेत. पण आतल्या आत त्यांना काहीतरी कमी जाणवत असते.

What is Anhedonia? people inability to feel pleasure anhedonia depression | तुम्हाला एनहेडोनिया तर झालेला नाही? सगळं काही असूनही आनंदी वाटत नाही, सारखं काय होईल-कसं होईल..

तुम्हाला एनहेडोनिया तर झालेला नाही? सगळं काही असूनही आनंदी वाटत नाही, सारखं काय होईल-कसं होईल..

What is anhedonia : धावपळीचं जीवन, वाढत्या जबाबदाऱ्या, कामाचा वाढता ताण आणि पर्सनल लाइफ यात लोक गुरफटली गेली आहेत. अशात लोकांना आपल्या मानसिक आरोग्याकडे हवं तसं लक्ष देण्यासाठी वेळच उरत नाही. लोक या गोष्टींमध्ये इतके काही गुंततात की, आपल्या आवडीनिवडीच्या गोष्टींनी देखील आनंदी होऊ शकत नाही. असे कितीतरी महिला किंवा पुरूष आहेत, ज्यांच्या परिवार, मित्र, पैसा आणि सोयी सुविधा आहेत. पण आतल्या आत त्यांना काहीतरी कमी जाणवत असते. अशात चिडचिड खूप वाढते आणि लोक एनहेडोनियाचे शिकार होतात. हा एनहेडोनिया म्हणजे काय? हेच आपण समजून घेणार आहोत, जेणेकरून आपणही याचे शिकार होऊ नये.

काय आहे एनहेडोनिया?

एनहेडोनिया ही एक मानसिक स्थिती आहे. ही केवळ निराशा नाही. एक अशी मानसिक स्थिती आहे ज्यात व्यक्तीला अशा गोष्टीही चांगल्या वाटत नाही, ज्यामुळे त्यांना आधी आनंद मिळत होता. बरेच लोक आवडीचे पदार्थ, संगीत, फिरणं किंवा आपल्यांसोबत वेळ घालवणं एन्जॉय करू शकत नाहीत. एनहेडोनिया नेहमी हळूहळू प्रभाव करतो. त्यामुळे बरेच लोक त्याची ओळख पटवू शकत नाही. याला थकवा किंवा मूड चांगला नसणे समजून दुर्लक्ष करतात. याकडे जास्त काळ दुर्लक्ष केलं तर मानसिक आरोग्यासाठी घातक ठरू शकतं आणि आजूबाजूच्या लोकांसाठी देखील.

एनहेडोनियाची लक्षणं

एनहेडोनियाची लक्षणं अनेक असू शकतात. जसे की, आवडीच्या गोष्टीतील इंटरेस्ट कमी होणं, एखाद्या आनंदाच्या बातमीचा आनंद न वाटणं, नात्यातील जवळीकता कमी होणं, प्रत्येक गोष्टीचं ओझं वाटणं, दिवसभर मन सु्न्न राहणं इत्यादी. एनहेडोनियाचे शिकार झालेल्या अनेक लोकांना ना दु:खं होत, ना आनंद. सतत एक वेगळीच निराशा जाणवत राहते. ज्याचं कारण त्यांनाही समजत नाही.

चिडचिड वाढते

अनेक रिसर्चनुसार, एनहेडोनिया नेहमीच डिप्रेशनशी संबंधित असतो. पण हे गरजेचं नाही की, प्रत्येक व्यक्ती डिप्रेशनमध्येच असावी. अनेकदा जास्त काळ तणावात राहिल्याने, झोप कमी घेतल्याने, इमोशनल ब्रेकडाउन किंवा सतत दबावात राहिल्याने सुद्धा ही समस्या निर्माण होते. अशात वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्यायला हवा. कारण वेळीच उपचार घेतले नाही तर एनहेडोनियामुळे चिडचिड अधिक वाढू शकते.

Web Title : एन्हेडोनिया: आनंद की हानि को समझना और इससे कैसे बचें

Web Summary : एन्हेडोनिया एक मानसिक स्थिति है जहाँ व्यक्ति उन गतिविधियों में रुचि खो देते हैं जो पहले आनंददायक थीं। यह अक्सर तनाव, नींद की कमी या भावनात्मक तनाव से जुड़ा होता है। रुचि में कमी जैसे लक्षणों को पहचानें और बढ़ी हुई चिड़चिड़ापन को रोकने के लिए समय पर चिकित्सा सलाह लें।

Web Title : Anhedonia: Understanding the Loss of Joy and How to Prevent It

Web Summary : Anhedonia is a mental state where individuals lose interest in previously enjoyable activities. It's often linked to stress, lack of sleep, or emotional strain. Recognize symptoms like decreased interest and seek timely medical advice to prevent increased irritability.