अलीकडे सोशल मिडियावर 'women who engage in traditional grandma hobbies tend to live healthier and longer' हे वाक्य अनेक ठिकाणी वाचायला मिळते. याचा अर्थ असा की, ज्या महिला पारंपारिक असे छंद जोपासतात जे आई - आजी आवडीने करायच्या, त्या जास्त निरोगी आयुष्य जगतात आणि त्यांच्या आयुष्याचा कालावधीही वाढतो. (Weaving or embroidery, which hobby your grandmother had? Find out, unbelievable research claims - if a granddaughter keeps up her grandmother's hobby then she will live longer )हे विधान यूनिवर्सिटी ऑफ हेलसिंकी फिनलँड यांच्या अभ्यासातून पुढे आले आहे.
या अभ्यासात वेगवेगळ्या देशांतील प्रौढ आणि वृद्ध महिलांच्या जीवनशैलीचा अभ्यास करण्यात आला. संशोधकांनी पाहिले की ज्या महिला काही ना काही छंद जोपासतात त्यांचे आयुष्य आनंदी, निरोगी आणि दीर्घकालीन असते. छंद जसे की वीणकाम, शिवणकाम, बागकाम, स्वयंपाक, वाचन, चित्रकला किंवा कोडी सोडवणे आदी. अगदी सामान्य छंद असले तरी जोपासणाऱ्या महिलांचे मानसिक आरोग्य अधिक चांगले होते. संशोधकांना अभ्यासादरम्यान तुलनेत छंद नसलेल्या महिलांमध्ये तणाव, एकटेपणा आणि नैराश्य जास्त दिसून आले.
या संशोधनाचा मुख्य मुद्दा असा आहे की हे छंद फार खर्चिक किंवा कठीण नसतात, पण ते मनाला शांतता देतात. हाताने काहीतरी करणं, निसर्गाशी संपर्क ठेवणं किंवा एखाद्या गोष्टीवर शांतपणे लक्ष केंद्रित करणं यामुळे मनावरील ताण कमी होतो. तणाव कमी झाला की शरीरावरही त्याचा चांगला परिणाम होतो. मन एखाद्या गोष्टीत गुंतवण्याची सवय मानसिक आणि शारीरिक दोन्ही गोष्टींसाठी फायद्याचीच. महत्त्वाचं म्हणजे, या अभ्यासात किती जगतात किंवा नक्की काय फरक पडतो याचा असा ठराविक आकडा दिलेला नाही. पण छंद असलेल्या महिलांचे आयुष्य अधिक आनंदी, सक्रिय आणि संतुलित राहते, हे स्पष्टपणे दिसून आले. अशा महिलांना झोप चांगली लागते, सामाजिक संपर्क टिकून राहतो आणि एकंदर आरोग्य सुधारते. या छंदांना ग्रॅण्डमा हॉबिज म्हटले जाते. ते जोपासण्याची ओढ महिलांमध्ये जास्त दिसून येते.
एखादा छंद हे केवळ वेळ घालवण्याचे साधन नाही, तर ते मानसिक आणि शारीरिक आरोग्य जपण्याचा एक सोपा मार्ग आहे. आधुनिक आयुष्यात सतत मोबाइल, स्क्रीन आणि धावपळीत अडकलेल्या महिलांसाठी हे छंद एक प्रकारचा विरंगुळा आणि मनाची विश्रांती देतात. छंद जोपासता येणे ही एक थेरेपी आहे. वेळ घालवता येणं ही फक्त प्रक्रिया नाही तर एक कला आहे. सोप्या शब्दांत सांगायचं झालं तर, आनंद देणारे छंद आयुष्याची गुणवत्ता वाढवतात. ते थेट आयुष्य वाढवतात असं नाही, पण निरोगी, तणावमुक्त आणि समाधानकारक जीवन जगण्यास नक्कीच मदत करतात. हेच या अभ्यासातून सिद्ध झालं.
Web Summary : Traditional hobbies like knitting benefit women's health, says a Finnish study. These stress-reducing activities promote mental well-being, social connection, and a balanced, active lifestyle, improving overall life quality.
Web Summary : एक फिनिश अध्ययन के अनुसार, बुनाई जैसे पारंपरिक शौक महिलाओं के स्वास्थ्य के लिए फायदेमंद हैं। तनाव कम करने वाली ये गतिविधियाँ मानसिक कल्याण, सामाजिक संबंध और एक संतुलित, सक्रिय जीवनशैली को बढ़ावा देती हैं, जिससे जीवन की गुणवत्ता में सुधार होता है।