Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Mental Health > कुणी गुदगुल्या केल्यावर आपण खळखळून हसतो, पण मेंदूत नेमकं होतं तरी काय? वाचून व्हाल अवाक्

कुणी गुदगुल्या केल्यावर आपण खळखळून हसतो, पण मेंदूत नेमकं होतं तरी काय? वाचून व्हाल अवाक्

Tickle Interesting Facts : गुदगुल्या केल्यावर मेंदूत नेमकं काय होतं, इतकंच नाही जर तुम्ही स्वत:च स्वत:ला गुदगुल्या केल्या तर तुम्हाला अजिबात हसू येत नाही. याचं कारण काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2025 12:33 IST2025-12-20T12:21:12+5:302025-12-20T12:33:13+5:30

Tickle Interesting Facts : गुदगुल्या केल्यावर मेंदूत नेमकं काय होतं, इतकंच नाही जर तुम्ही स्वत:च स्वत:ला गुदगुल्या केल्या तर तुम्हाला अजिबात हसू येत नाही. याचं कारण काय?

Tickling Facts : Why does tickling make us laugh, know its science | कुणी गुदगुल्या केल्यावर आपण खळखळून हसतो, पण मेंदूत नेमकं होतं तरी काय? वाचून व्हाल अवाक्

कुणी गुदगुल्या केल्यावर आपण खळखळून हसतो, पण मेंदूत नेमकं होतं तरी काय? वाचून व्हाल अवाक्

Tickle Interesting Facts : गुदगुल्या म्हटलं की, हसणं, खचकन दचकणं असा हा विषय आहे. ज्याबाबत बरेच लोक खूप जास्त सेन्सिटीव्ह असतात. गंमत करण्यासाठी लोक एकमेकांना गुदगुल्या करतात. लहान मुलांसोबत मोठ्यांनाही कधी कधी गुदगुल्या करणं आवडतं. मित्रांनी किंवा घरातील एखाद्या व्यक्तीनं किंवा कोणत्याही दुसऱ्या व्यक्तीनं गुदगुल्या केल्या तर कुणीही खळखळून हसेल. काही लोकांना तर इतक्या गुदगुल्या होतात की, ते हसत हसत जमिनीवर लोळू लागतात. पण गुदगुल्या केल्यावर मेंदूत नेमकं काय होतं, इतकंच नाही जर तुम्ही स्वत:च स्वत:ला गुदगुल्या केल्या तर तुम्हाला अजिबात हसू येत नाही. याचं कारण काय? असा तुम्हालाही प्रश्न पडला असेल तर त्याचं कारण जाणून घेऊया.

मेंदू आणि गुदगुल्या

आपला मेंदू इतका हुशार असतो की, त्याला आपल्या सगळ्या हालचाली, भावना माहीत असतात. तुम्ही जर स्वत:ला गुदगुल्या करण्याचा विचार केला तर मेंदुला आधीच हे माहीत असतं की, तुम्ही काय करणार आहात. त्यामुळे असं काही करताना वेगळं काही जाणवत नाही. तेच जर दुसऱ्यांनी कुणी गुदगुल्या केल्या तर तुमच्या मेंदूला हे माहीत नसतं की, तुम्हाला कुणी गुदगुल्या करणार आहे. ही एक अचानक घडणारी बाब असते. ज्यामुळे शरीर लगेच रिअॅक्शन देतं आणि तुम्ही लोटपोट होऊ हसता किंवा तुम्ही लगेच जागेवर उडी घेता.

मेंदूला कोणं कंट्रोल करतं

आपल्या मेंदुमध्ये एक खास भाग असतो ज्याला सेरिबेलम म्हटलं जातं. हा भाग शरीराच्या हालचाली कंट्रोल करतो. जेव्हा आपण स्वत:ला गुदगुल्या करतो तेव्हा सेरिबेलमला माहीत असतं की, हा तुमचाच स्पर्श आहे. पण तेच जर दुसरं कुणी गुदगुल्या केल्या तर ही अचानक घडलेली बाब असते. ज्यामुळे शरीर लगेच रिअ‍ॅक्शन देतं.

ही केवळ हसू नाही, तर जिव्हाळ्याचं नातं आहे

दीर्घकाळ गुदगुल्या देणं ही फक्त हलक्याफुलक्या हशासाठीची प्रतिक्रिया मानली जात होती. मात्र, वैज्ञानिक संशोधनातून असं समोर आलं आहे की ही सवय आयुष्याच्या अगदी सुरुवातीच्या टप्प्यातच विकसित होते आणि ती फक्त माणसांपुरती मर्यादित नाही. ‘PLOS One’ या वैज्ञानिक जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासानुसार, जेव्हा उंदरांना हळुवारपणे गुदगुल्या केल्या गेल्या, तेव्हा त्यांनी आनंद आणि सामाजिक खेळाशी संबंधित खास आवाज काढले. विशेष म्हणजे, ज्या संशोधकांनी त्यांना गुदगुल्या केल्या, त्यांच्याकडे ते उंदीर पुन्हा-पुन्हा येत होते. यावरून हे स्पष्ट होतं की गुदगुल्या देणं केवळ हसवण्यासाठी नसून, परस्पर जिव्हाळा, विश्वास आणि सामाजिक नातं मजबूत करण्यासाठी विकसित झालेलं वर्तन आहे.

गुदगुल्यांचं वेगळं महत्व

सामान्यपणे जास्तीत जास्त लोक गंमत करण्यासाठी दुसऱ्यांना गुदगुल्या करतात. पण मुळात ही बाब केवळ गंमतीसाठी नाहीय. गुदगुल्या ही जाणीव आपल्या शरीराच्या सिक्युरिटी सिस्टीमचा भाग आहे. आपले पूर्वज आधी जेव्हा जंगलांमध्ये राहत होते, तेव्हा शरीराच्या सेन्सिटीव्ह भागांना वाचवण्यासाठी ही नॅचरल रिअ‍ॅक्शन विकसित झाली. जेव्हा कुणी आपल्याला गुदगुल्या करतं तेव्हा मान, पोट आणि काख हे भाग मेंदुला संकेत पाठवतात की, हे भाग सुरक्षित नाहीत. तेव्हा आपला मेंदू आपल्या तिथून बाजूला होण्यासाठी आणि हलण्यासाठी भाग पाडतो.

Web Title : गुदगुदी: हम क्यों हंसते हैं, लेकिन जब हम खुद करते हैं तो नहीं?

Web Summary : गुदगुदी मस्तिष्क की आश्चर्य प्रतिक्रिया के कारण हंसी को ट्रिगर करती है। सेरिबैलम आत्म-गुदगुदी की भविष्यवाणी करता है, जिससे प्रतिक्रिया नहीं होती है। यह सुरक्षा में निहित बंधन को बढ़ावा देता है, कमजोर क्षेत्रों की रक्षा करता है।

Web Title : Tickling: Why We Laugh, But Not When We Do It Ourselves?

Web Summary : Tickling triggers laughter due to the brain's surprise response. The cerebellum predicts self-tickling, preventing the reaction. It fosters bonding, rooted in security, protecting vulnerable areas.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.