Join us
Daily Top 2Weekly Top 5

जुन्या वाड्यात किंवा मंदिरात पाय ठेवताच मन अचानक शांत होतं, पण असं होण्यामागचं नेमकं कारण काय असतं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2026 12:21 IST

Mental Peace : जुन्या वाड्यात किंवा मंदिरात आपल्याला अचानक थकवा आणि ताण कमी झाल्यासारखं का वाटतं? नक्कीच वाटत असेल. पण असं का होतं? जाणून घेऊ यामागचं कारण...

Mental Peace : कुठेतरी फिरायला जाण्याचा विचार मनात आला तर सगळ्यात आधी जास्तीत जास्त लोकांच्या मनात एखादा जुना वाडा, हवेली, किल्ला किंवा मग जुनं मंदिर या ठिकाणांचा विचार येतो. अनेकांना जिथे ते फिरायला जात आहे तिथे शांत वाटलं पाहिजे असं वाटत असतं. आपणही अनेक ठिकाणे फिरले असाल कधी एखाद्या जुन्या वाड्यात किंवा किल्ल्यात गेले असाल किंवा एखाद्या जुन्या मंदिरात गेले असाल. तेव्हा आपल्याला अचानक थकवा आणि ताण कमी झाल्यासारखं का वाटतं? नक्कीच वाटत असेल. पण असं का होतं? जाणून घेऊ यामागचं कारण...

नर्वस सिस्टीम रिलॅक्स होतं

जुन्या हवेल्या आणि मंदिरांची रचना आजच्या आधुनिक इमारतींपेक्षा वेगळी असते. जाड भिंती, मोठे मोकळे अंगण, नैसर्गिक प्रकाश आणि मोकळी शुद्ध हवा यामुळे वातावरण शांत आणि थंड राहते. बाहेरील आवाज कमी होतो आणि आतमध्ये स्थिरता निर्माण होते. त्यामुळे शरीरातील नर्वस सिस्टीम रिलॅक्स होतं.

संस्कृतीशी जोड आणि भावनिक स्थिरता

या इमारती आपल्याला आपल्या इतिहासाशी आणि संस्कृतीशी जोडतात. त्यामुळे मनात आपलेपणाची भावना निर्माण होते. ही भावना आपल्याला भावनिकदृष्ट्या अधिक मजबूत आणि स्थिर बनवते.

मंदिरांचे वातावरण ध्यानात नेते

मंदिरांची रचना अत्यंत वैज्ञानिक पद्धतीने केलेली असते. तिथली शांतता, मोकळी जागा आणि ध्वनीची प्रतिध्वनी (echo) यामुळे मन आपोआप ध्यानाच्या अवस्थेत जाते. यामुळे ताण, चिंता आणि मानसिक थकवा कमी होतो.

नैसर्गिक उपचार

आजच्या धावपळीच्या जीवनात, अशा शांत आणि ऐतिहासिक जागा नैसर्गिक हीलिंग स्पेस म्हणून काम करतात. तिथे गेल्यावर मन ताजेतवाने होतं आणि मानसिक आरोग्य सुधारतं.

English
हिंदी सारांश
Web Title : Why old buildings and temples offer sudden mental peace?

Web Summary : Old structures provide mental peace due to their unique architecture, connection to history, and calming environment. Natural light, open spaces, and echoes facilitate relaxation, reduce stress, and promote overall well-being, creating a healing experience.
टॅग्स :मानसिक आरोग्यहेल्थ टिप्स