Panic Buying : हल्ली शॉपिंग करण्याचं फॅड खूपच वाढलेलं दिसतं, मग ती ऑनलाइन असो वा ऑफलाइन...म्हणजे बरेच लोक असे असतात जे केवळ गरजेच्या वस्तुंसोबतच अनावश्यक वस्तुंची देखील मोठी खरेदी करतात. यामागे त्यांचा असा विचार असतो की, ती वस्तू लवकर बाजारातून किंवा दुकानातून संपेल किंवा त्यावर पुन्हा ऑफर नाही मिळाली तर काय करणार...ही अवस्था लोकांमध्ये तेव्हा बघायला मिळते जेव्हा लोक कमतरता किंवा संधी निघून जाण्याच्या भीतीने अचानक आणि गरजेपेक्षा जास्त खरेदी करू लागतात. बरं ही सवय काही फक्त किराण्यापुरती मर्यादित नाही तर इलेक्ट्रिक वस्तू, ट्रेंडिंग प्रॉडक्ट्स आणि ऑनलाइनमध्येही मोठ्या प्रमाणात बघायला मिळते. जे दिसेल ते घेण्याचा हा अट्टाहास असतो. आपणही आपल्या आजूबाजूला अशी लोकं पाहिली असतील. अशात जाणून घेऊया की, पॅनिग बाइंग कोणत्या लोकांमध्ये अधिक बघायले मिळते आणि काही खरेदी करण्याचं वेड इतकं का वाढतं?
काय आहे पॅनिक बाइंग?
पॅनिक बाइंग अशा स्थितीला म्हटलं जातं, ज्यात एखादी वस्तू कमी होण्याचा धोका किंवा दुसरे लोक ती खरेदी करतात म्हणून आपणही खरेदी करावी असा अट्टाहास असतो. अनेकदा हे वागणं काहीतरी राहून जाण्याची भीती किंवा फोमोशी संबंधित असतं. हेच कारण आहे की, हेच कारण आहे की काही लोक स्मार्टफोन, गॅजेट्स, शूज कलेक्शन किंवा ट्रेंडिंग वस्तू खरेदी करण्यासाठी हापापलेले असतात.
पॅनिक बाइंगमध्ये मेंदू कसा निर्णय घेतो?
सायकॉजीनुसार, जेव्हा एखाद्या वस्तुबाबत मोजकेच आयटम शिल्लक आहेत किंवा ऑफर लवकर संपणार आहे, असे मेसेज समोर येतात, तेव्हा मेंदूचा अमिगडाला भाग सक्रिय होतो. हा तोच भाग असतो जो धोका आणि नुकसानाचा संकेत देतो. इथे धोका एखादी वस्तू गमावण्याचा असतो. जसेही व्यक्ती ती वस्तू खरेदी करतो, मेंदूमध्ये डोपामाइन नावाचं केमिकल रिलीज होतं, ज्यामुळे संतु्ष्टी मिळते किंवा जिंकल्याचा आनंद जाणवतो.
कुणामध्ये जास्त दिसतो असा हापापलेपणा?
सायकॉलॉजीनुसार, ज्या लोकांमध्ये असुरक्षेची भावना असते किंवा जे समाजातील तुलनेचा फार विचार करतात, त्यांच्यात पॅनिक बाइंगची समस्या अधिक दिसते. एक्सपर्टनुसार, जेव्हा लोकांना वाटतं की, एखाद्या वस्तुची मागणी जास्त आहे आणि सप्लाय कमी आहे तेव्हा त्यांचा मेंदू सर्व्हायवल मोडमध्ये जातो. अशात माणूस विचार करायला लागतो की, जर समजा त्यांच्याकडे ती वस्तू नसेल तर दुसऱ्या कुणाकडे तरी जाईल आणि ते मागे राहतील. हल्ली तर सोशल मीडियामुळे तर असे विचार आणि वागणं अधिकच वाढलं आहे. जे दुसऱ्यांकडे आहे ते आपल्याकडेही असावं, ते तसं करतात म्हणून आपण तसंच करावं अशा भावना वाढल्या आहेत.
यापासून बचाव करण्याचे उपाय
एक्सपर्ट सांगतात की, ही सवय टाळण्यासाठी काही सोपे उपाय फॉलो करू शकता. कोणतीही महागडी किंवा ट्रेंडिंग वस्तू खरेदी करण्याआधी स्वत:ला थोडा वेळ द्या, जेणेकरून अचानक निर्माण झालेली उत्सुकता कमी होईल. खरेदीआधी गरजेच्या वस्तुंची एक यादी तयार करणंही फायदेशीर ठरू शकतं. त्याशिवाय सेल, डिस्काउंटचे येणारे नोटिफिकेशन बंद करा. कारण अनेकदा अशा मेसेजमुळेही पॅनिक बाइंग ट्रिगर होते.
Web Summary : Panic buying stems from fear of missing out, triggering brain activity and dopamine release. Insecurity and social comparison fuel this urge. Experts advise delaying purchases, listing needs, and muting sale alerts to curb impulsive shopping.
Web Summary : पैनिक बाइंग में कमी होने का डर होता है, जिससे दिमाग सक्रिय होता है। असुरक्षा और सामाजिक तुलना से यह बढ़ता है। विशेषज्ञ खरीदारी में देरी करने, ज़रूरतों की सूची बनाने और सेल अलर्ट बंद करने की सलाह देते हैं।