प्रत्येकाला समाजात मान, आदर आणि लोकांच्या मनात चांगलं स्थान मिळावं असं वाटत असतं. पण हे फक्त पैसा, पद किंवा बाह्य व्यक्तिमत्वामुळे मिळत नाही. आपल्या बोलण्याची पद्धत, वागणूक आणि छोट्या सवयी यावरून लोक आपल्याबद्दल मत तयार करत असतात. (No one will dare to insult you, make 6 changes in yourself; no one will take you for granted.)काही साधे बदल आयुष्यात केले तर व्यक्तिमत्त्व अधिक प्रभावी बनू शकतं आणि लोकही आपल्याकडे आदराने पाहू लागतात.
सर्वात महत्त्वाची सवय म्हणजे इतरांशी आदराने बोलणं. समोरची व्यक्ती लहान असो किंवा मोठी, प्रत्येकाशी नम्रतेने आणि शांतपणे बोलणारी व्यक्ती लोकांना नेहमी आवडते. उगाच टोमणे मारणे, सतत इतरांना कमी लेखणे किंवा उद्धटपणे बोलणे यामुळे लोक दूर जातात. गोड आणि स्पष्ट संवाद माणसाला वेगळं स्थान मिळवून देतो.
दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे दिलेला शब्द पाळण्याची सवय. एखादं काम करण्याचं आश्वासन दिलं आणि ते वेळेत पूर्ण केलं तर लोकांचा विश्वास वाढतो. सतत कारणं सांगणाऱ्या व्यक्तीपेक्षा जबाबदारीने वागणाऱ्या व्यक्तीला जास्त मान मिळतो.
तिसरी सवय म्हणजे इतरांचं बोलणं लक्ष देऊन ऐकणं. अनेक जण फक्त स्वतःचं मत मांडण्यात व्यस्त असतात, पण समोरच्याचं नीट ऐकणारी व्यक्ती लोकांच्या मनात पटकन जागा बनवते. प्रत्येकाला आपलं बोलणं कुणीतरी समजून घ्यावं असं वाटत असतं. त्यामुळे मध्येच तोडणं किंवा दुर्लक्ष करणं टाळणं गरजेचं आहे.
चौथी महत्त्वाची सवय म्हणजे सतत शिकत राहणं आणि स्वतःमध्ये सुधारणा करणं. नवीन गोष्टी शिकणारी, स्वतःच्या चुका मान्य करणारी आणि बदल स्वीकारणारी व्यक्ती अधिक प्रभावी वाटते. अहंकारामुळे माणूस मागे पडतो, तर साधेपणा आणि शिकण्याची वृत्ती लोकांना जवळ आणते.
पाचवी आणि सर्वात महत्त्वाची सवय म्हणजे सकारात्मक आणि शांत राहणं. प्रत्येक वेळी रागावणं, तक्रारी करत राहणं किंवा नकारात्मक बोलणं यामुळे लोक दूर होतात. कठीण परिस्थितीतही शांत राहणारी आणि इतरांना आधार देणारी व्यक्ती लोकांच्या नजरेत वेगळा आदर निर्माण करते.
अजून एक गोष्ट म्हणजे नाही बोलायला शिका. तुम्ही जर प्रत्येक वेळी सगळ्या गोष्टींना हो म्हणत असाल तर लोकं गृहीत धरायला लागतात. त्यामुळे ती असेलच तिला नाही सांगितलं तरी चालेल अशी तुमच्या बद्दल भावना निर्माण होते आणि लोकं तुम्हाला आदर न देता फक्त उपलब्ध असणारी व्यक्ती म्हणून संबोधतात.
Web Summary : Cultivate respect through courteous communication, reliability, attentive listening, continuous learning, positivity, and assertiveness. Implementing these habits will enhance your influence and prevent others from undervaluing you.
Web Summary : विनम्रता, जवाबदेही, ध्यान से सुनना, लगातार सीखना, सकारात्मकता और दृढ़ता से सम्मान प्राप्त करें। इन आदतों को अपनाने से आपका प्रभाव बढ़ेगा और लोग आपको कम आंकना बंद कर देंगे।