Join us
Daily Top 2Weekly Top 5

बंद करा एकावेळी शंभर कामं करणं, ४० % कमी होतेय तुमची क्षमता- झिजून तुम्ही होताय भंगार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2026 14:50 IST

Effects of Multitasking on Brain : लोक सुद्धा एकाचवेळी इतकी कामे केल्याने स्वत:ची पाठ थोपटून घेतात. पण जरा थांबा...आपण ज्या गोष्टीला मोठं यश मानतो ते मुळात एक 'स्लो सुसाइड' आहे.

Effects of Multitasking on Brain : बऱ्याच लोकांना मल्टीटास्किंग करण्याची म्हणजेच एकाचवेळी वेगवेगळी कामं करण्याची सवय असते. आणखी उकलून सांगायचं तर काही लोक फोनवर बोलता बोलता स्वयंपाक करतात, लॅपटॉपवर काम करतात किंवा घरातील एखादं दुसरं काम करतात. लोक सुद्धा एकाचवेळी इतकी कामे केल्याने स्वत:ची पाठ थोपटून घेतात. पण जरा थांबा...आपण ज्या गोष्टीला मोठं यश मानतो ते मुळात एक 'स्लो सुसाइड' आहे. हे आमचं नाही तर डॉक्टर तरंग कृष्णा यांचं म्हणणं आहे. ते सांगतात की, आपला मेंदू या धावपळीला आणि ओव्हरलोडला पेलू शकत नाही. अशात मल्टीटास्किंगची ही सवय मेंदूच्या आरोग्यासाठी कशी घातक ठरते हे पाहुयात.

काय सांगतो रिसर्च?

स्टॅनफोर्डच्या रिसर्चनुसार, मल्टीटास्किंग आपली काम करण्याची क्षमता ४० टक्क्यांनी कमी करते. आपला मेंदू असा बनला आहे जो एकावेळी एकाच गोष्टीवर फोकस करेल. पण जेव्हा आपण आपला फोकस विभागतो, तेव्हा आपली मेंदूची एनर्जी लीक होते आणि वाया जाते.

मेंदूवर पडतो वाईट प्रभाव

सत्य हे आहे की, मल्टीटास्किंगने आपला मेंदू खूप थकतो आणि ओव्हरलोड होतो. या मानसिक थकव्यामुळे आपलं इम्यून सिस्टीम कमजोर होते. जेव्हा इम्यून सिस्टीमचं संतुलन बिघडू लागतं, तेव्हा शरीरा कॅन्सरसारख्या आजाराचा धोकाही वाढतो. त्यामुळे मल्टीटास्किंगला 'स्लो सुसाइड' म्हटलं जाऊ शकतं. 

२० मिनिटांचा फॉर्मूला

डॉक्टर सांगतात की, या समस्येचं समाधान फारच सोपं आहे. एकावेळी एका कामावर फोकस करा. यासाठी २० मिनिटांचा टायमर सेट करा आणि एक टार्गेट ठरवा.

English
हिंदी सारांश
Web Title : Multitasking Reduces Productivity, Brain Health: Experts Warn Against It

Web Summary : Multitasking decreases work efficiency by 40% and harms brain health. Focus division drains brain energy, weakening the immune system, potentially increasing cancer risk. Doctors advise focusing on one task at a time, using a 20-minute timer for optimal concentration.
टॅग्स :मानसिक आरोग्यहेल्थ टिप्स