Join us  

चित्त थाऱ्यावर नसतं-डोक्यात विचार येतात? १ सुपर टेक्निक; ओव्हर थिंकींग थांबेल आनंदी राहाल

By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2024 12:59 PM

Mental Tricks To Stop Overthinking (Over Thinking Kas Thambayche) : नियमित मेडिटेशन केल्याने तुमच्यातील भिती घाबरटपणा दूर होण्यास मदत होते आणि ओव्हरथिंकींग कमी होते.

घरातल्या आणि बाहेरच्या कामाच्या गडबडीत (Mental Health Tips) आपण कितीही ठरवलं तरी मन शांत राहत नाही सतत कोणत्या ना कोणत्या गोष्टीचा विचार मनात येत असतो. (Mental Tricks To Stop Overthinking) कोणत्याही गोष्टीचा जास्त विचार केल्याने मनात नकारात्मक विचार येत असतात. ओव्हरथिंकींगचा परिणाम असा की त्यामुळे व्यक्ती कधी नकारात्मक विचार करून नैराश्यात जाते हे त्या व्यक्तीलाही कळत नाही. ओव्हरथिंकिंग टाळण्यासाठी तुम्ही सोप्या ट्रिक्स वापरू शकता. (Easy Ways To Stop Overthinking Every Small Thing)

ओव्हरथिंकींग टाळण्यासाठी  सुपर टेक्निक कोणती? (Super Technique To Stop Overthinking)

सगळ्यात आधी एक स्पॉट ठरवा आणि शांतपणे, आरामात बसा. नंतर जीभ फोल्ड करून वरच्या दिशेने न्या.  नंतर डोळे बंद करून शांत बसा, दीर्घ श्वास घ्या आणि हळूहळू श्वास सोडा.  ५ मिनिटं हा व्यायाम केल्याने  चांगला परिणाम दिसून येईल.

ओव्हरथिंकीग टाळण्यासाठी उपाय

नियमित मेडिटेशन केल्याने तुमच्यातील  भिती घाबरटपणा दूर होण्यास मदत होते आणि ओव्हरथिंकींग कमी होते. एक दिवस शांततेत फक्त ५ मिनिटं स्वत:ला वेळ द्या.  मन कायम आनंदीत राहील.

मांड्या-निंतब पसरट, जाड दिसतात? घरीच 5 सोपे व्यायाम करा, झटपट बारीक व्हाल-फिट दिसाल

कोणासाठी काहीतरी करण्याचा  प्रयत्न करा

तुम्ही स्वत:पेक्षा इतरांचा विचार केला तर ओव्हरथिंकींग टाळू शकता. आपल्यापेक्षा जास्त संकटात असलेल्या व्यक्तीची मदत करू शकता. ज्यामुळे तुमच्यावर कोणताही ताण येणार नाही.

स्वत:वर प्रेम करा

कोणत्याही चुकीसाठी स्वत:ला दोष देणं बंद  करा.  तुम्ही जसे आहात तसे स्वत:ला स्विकारा. तुमच्या स्वत:कडून ज्या काही अपेक्षा असतील त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. ज्यामुळे तुम्हाला आनंदी आणि उत्साही वाटेल.

ओटी पोट सुटलंय-मागून कंबर मोठी दिसते? रोज 'हा' पदार्थ खा-झरझर घटेल चरबी, मेटेंन राहाल

भितीशी सामना करा

जर तुम्हाला कोणत्याही गोष्टीची भिती वाटत असेल  किंवा कोणतीही गोष्ट तुमच्या नियंत्रणाबाहेर आहे असं वाटत असेल  तर ती गोष्टी स्वीकार आणि त्यावर ओव्हरथिंक करू नका. सतत चिंतेत राहणं, सतत विचार करणं तुमच्यासाठी नुकसानकारक ठरू शकते. 

आपला ट्रिगर पॉईंट् समजून घ्या

प्रत्येक व्यक्तीचा ट्रिगर पॉईंट असतो. ज्यामुळे लोक ओव्हरथिंकींग करतता. अशावेळी ओव्हरथिंकींग टाळण्यासाठी तुम्ही काही सोपे उपाय  करू शकता.  तर तुम्हाला लोकांकडून कोणताही त्रास होत असेल तर सकारात्मक वातावरणात राहण्याचा प्रयत्न करा. ओव्हरथिंकींग अशी समस्या आहे जी सोडवण्यात तुम्ही स्वत: तुमची मदत करू शकता. 

टॅग्स :मासिक पाळी आणि आरोग्यआरोग्य