Lokmat Sakhi >Mental Health > स्ट्रेस- टेंशन कमी करण्यासाठी घरात करा 'हे' काही बदल; वाटू लागेल प्रसन्न-नकारात्मकता होईल कमी

स्ट्रेस- टेंशन कमी करण्यासाठी घरात करा 'हे' काही बदल; वाटू लागेल प्रसन्न-नकारात्मकता होईल कमी

Mental Health Tips : मानसिक आरोग्य चांगलं नसेल किंवा मन शांत नसेल तर शारीरिक आरोग्यही चांगलं राहू शकत नाही. त्यामुळेच आज भरपूर लोक डिप्रेशन आणि तणावाचे शिकार असतात.

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2025 16:18 IST2025-05-12T13:52:15+5:302025-05-12T16:18:06+5:30

Mental Health Tips : मानसिक आरोग्य चांगलं नसेल किंवा मन शांत नसेल तर शारीरिक आरोग्यही चांगलं राहू शकत नाही. त्यामुळेच आज भरपूर लोक डिप्रेशन आणि तणावाचे शिकार असतात.

Mental Health Tips : Make these 4 changes in your room to boost mental health | स्ट्रेस- टेंशन कमी करण्यासाठी घरात करा 'हे' काही बदल; वाटू लागेल प्रसन्न-नकारात्मकता होईल कमी

स्ट्रेस- टेंशन कमी करण्यासाठी घरात करा 'हे' काही बदल; वाटू लागेल प्रसन्न-नकारात्मकता होईल कमी

Mental Health Tips : सामान्यपणे जास्तीत जास्त लोक हे त्यांच्या शारीरिक आरोग्याची खूप जास्त काळजी घेतात. फिटनेससाठी वेगवेगळ्या एक्सरसाईज, पौष्टिक आहारावर अधिक भर दिला जातो. शरीराची भरपूर काळजी घेतली जाते. पण भरपूर लोक आपल्या मानसिक आरोग्याची फारशी काळजी घेताना दिसत नाही. शारीरिक आरोग्यासोबतच मानसिक आरोग्याची काळजी घेणंही तेवढंच गरजेचं असतं. कारण मानसिक आरोग्य चांगलं नसेल किंवा मन शांत नसेल तर शारीरिक आरोग्यही चांगलं राहू शकत नाही. त्यामुळेच आज भरपूर लोक डिप्रेशन आणि तणावाचे शिकार असतात.

डिप्रेशन एक मूड डिसऑर्डर आहे ज्यात व्यक्ती निराश असते आणि तिचा कोणत्याही गोष्टींमध्ये रस नसतो. तुम्ही ज्या वातावरणात राहता त्याचाही तुमचा मूड आणि स्ट्रेस लेव्हलवर प्रभाव पडत असतो. आपल्या आजूबाजूचं वातावरण थेट आपल्या मानसिक आरोग्याला प्रभावित करत असतं.

बरेच लोक मन शांत करण्यासाठी किंवा तणाव दूर करण्यासाठी वेगवेगळ्या शांत ठिकाणांवर जसे की, डोंगर, जगलांमध्ये शहरांपासून दूर जातात. पण मन शांत करण्यासाठी किंवा स्ट्रेस घालवण्यासाठी तुम्ही अशा एखाद्या ठिकाणीच गेलं पाहिजे असं काही नाही. तुम्ही राहता त्या ठिकाणी काही बदल करून तुम्ही मानसिक आरोग्य चांगलं ठेवू शकता.

रूममध्ये करा काही बदल

ऑफिस किंवा बाहेरची कामं यामुळे भलेही तुम्ही घरात कमी वेळ घालवता. मात्र, तुमची खोली अशी असायला हवी जिथे तुमचं मन शांत होईल आणि तुम्हाला आराम मिळेल. जर तुम्ही तुमच्या खोलीमध्ये खालील काही बदल केले तर तुम्हाला नक्कीच फरक दिसून येईल आणि मनाला शांत वाटेल.

रूममध्ये लावा झाडं

झाडांमुळे केवळ आपलं घर किंवा रूमची सुंदरता वाढते असं नाही तर तुमचा मूडही चांगला ठेवतात. रूममधील झाडांमुळे मानसिक आरोग्यावर सकारात्मक प्रभाव पडतो. एका शोधातून समोर आलं आहे की, इनडोर प्लांटसोबतच अॅक्टिव इंटरॅक्शन शारीरिक आणि मानसिक तणाव कमी करतात. या झाडांमुळे मनाला आराम मिळतो, शांतता मिळते, ज्यामुळे स्ट्रेस कमी होतो.

सुगंधित कॅंडल्स

ऑफिसमधून किंवा बाहेरचं काम करून सायंकाळी घरात आल्यावर रूममध्ये सुगंधित कॅंडल्स लावू शकता. यानं तुमचा मूड चांगला होईल आणि तुमचा थकवा सुद्धा दूर होईल. नॅशनल कॅंडल असोसिएशननुसार, गंध किंवा सुगंधाच्या आधारावर मेणबत्त्यांची निवड केल्यास तुमचा मूड चांगला होऊ शकतो, चिंता कमी होऊ शकते आणि थकवाही दूर होतो.

साफ-सफाई ठेवा

जर खोलीमध्ये किंवा आजूबाजूला कचरा किंवा पसारा असेल तर खोलीत तुमचंही मन लागणार नाही. यानं तुमचा स्ट्रेस, एंझायटी आणि डिप्रेशन वाढण्याचा धोका वाढतो. शोधातून समोर आलं आहे की, हे नकारात्मक वातावरण कार्टिसोलचं प्रमाण वाढतं. त्यामुळे रूममध्ये साफ-सफाई ठेवा.

म्यूझिक

म्युझिक हे मनावर एखाद्या थेरपीसारखं काम करतं. म्युझिक आपल्या भावनांना प्रभावित करतं. अशात योग्य म्युझिक किंवा गाण्यांची निवड महत्वाची ठरते. जर खोलीमध्ये एक साउंड मशीन लावाल तर तुम्हाला मानसिक शांतता मिळण्यास मदत मिळू शकते.

Web Title: Mental Health Tips : Make these 4 changes in your room to boost mental health

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.