How To Overcome Social Anxiety : आजच्या सोशल मीडियाच्या काळात लोक एकमेकांपासून फार दुरावले आहेत. लोक फोनवर तर एकमेकांसोबत खूप काही बोलतात, पण समोरासमोर आल्यावर बोलण्यास त्यांना अवघडलेपणा वाटतं. अनोळखी लोकांसोबत संवाद साधणं अनेकांसाठी आव्हान ठरतं. सोशल एंझायटीमुळे हे लोक अनेक ठिकाणी बोलणं किंवा आपलं मत मांडणं टाळतात. गर्दीमध्येही त्यांना जास्त एकटेपणा जाणवतो. एखाद्या अनोळखी व्यक्तीसोबत बोलण्यास मन धजावत नाही. ही अनेकांसाठी एक मोठी समस्या बनली आहे.
अशाप्रकारची समस्या आत्मविश्वासाची कमतरता, अपयशाची भीती आणि जास्त विचार करण्याची सवय याकडे इशारा करते. जर आपणही सोशल एंझायटीच्या जाळ्यात अडकले असाल आणि यातून आपल्याला बाहेर पडायचं असेल तर आपण काही सोप्या ट्रिक्स वापरून ही समस्या दूर करू शकता. या गोष्टी फॉलो केल्यास अनोळखी व्यक्तीसोबत संवाद साधण्यात आपल्याला काहीच अडचण येणार नाही.
डोळ्यात बघा
जर आपल्याला अनोळखी लोकांसोबत संवाद साधण्यात संकोच किंवा लाज येत असेल आणि ही समस्या दूर करायची असेल, तर सगळ्यात आधी लोकांच्या डोळ्यात बघून बोलायला शिका. कुणासोबतही बोलायला सुरूवात करण्याआधी चेहऱ्यावर स्माइल असू द्या.
प्रश्न विचारा
जर आपल्याला सोशल एंझायटी घालवायची असेल, तर स्वत:हून लोकांना प्रश्न विचारून संवादाची सुरूवात करा. जर आपण असं कराल तर आपल्याला सुद्धा इतर लोकांप्रमाणे बोलण्यात जास्त सहजपणा वाटू शकतो.
आवडीचा विषय
जर आपल्याला नवीन किंवा अनोळखी लोकांसोबत बोलण्यास संकोच वाटत असेल तर त्यांच्यासोबत आपल्या आवडीच्या गोष्टी शेअर करा. जर आपलं बोलणं समोरच्या व्यक्तीला आवडलं तर आपण त्यांच्यासोबत बोलण्यास कधीच कचरणार नाही. आपल्या गोष्टी ते इंटरेस्ट घेऊन ऐकतील.
ऐकायलाही शिका
जर आपल्याला बिनधास्तपणे कुणासोबत संवाद साधायचा असेल तर त्यासाठी आपण ऐकणंही गरजेचं असतं. केवळ बोलण्यापेक्षा ऐकून घेण्याचीही क्षमता चांगली असेल तर दोन व्यक्तींमध्ये संवाद मोकळेपणाने होतो. त्यांच्या गोष्टीत आपण इंटरेस्ट घेतोय, असं त्यांना वाटतं. याने संवाद आणखी सोपा आणि सहज होतो.
विश्वास दाखवा
जर आपण स्वत:वरच विश्वास ठेवणार नाही, तर समोरची व्यक्ती देखील आपल्याला किंमत देणार नाही. आपला विश्वास आपल्या संवादावर मोठा प्रभाव टाकतो. त्यामुळे सगळ्यात आधी स्वत:वर विश्वास ठेवायला शिका आणि आत्मविश्वास वाढवा.
