Join us  

Mental health : धोकादायक ठरतेय जास्त विचार करण्याची सवय; मन शांत ठेवण्यासाठी वापरा हे ५ उपाय

By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2021 2:00 PM

Mental health : नैराश्य हा किचकट आजार मानला जातो. त्यावरचे उपचारही दीर्घ असतात. तुमचं नैराश्य कुठल्या पातळीवर आहे, त्यावर ते अवलंबून असतं. 

ठळक मुद्देजर एखादी गोष्ट मनात आहे पण ती तुम्हाला कोणालाही सांगता येत नाहीये. अशावेळी लिहून मन मोकळं करण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला जे काही वाटतंय ते लिहून काढा. महिलांच्या मानसिक आरोग्याकडे तर सर्रास दुर्लक्ष होतं. ते महिला स्वत:ही करतात, आणि मला काय होतंय म्हणत आजार दडवतात. पण नैराश्य हा जगात सर्वात वेगानं पसरणारा हा आजार आहे.

शारीरिक आरोग्याबरोबरच मानसिक आरोग्य चांगलं असेल तरच आपण दीर्घकाळ निरोगी राहू शकतो. जर तुम्ही सतत ताण घेत असाल, कोणत्या ना कोणत्या गोष्टीबाबत विचार करत असाल तर नकळतपणे आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो. अजूनही लोक मनाच्या आजारांबाबत फारचा विचार करत नाहीत.

महिलांच्या मानसिक आरोग्याकडे तर सर्रास दुर्लक्ष होतं. ते महिला स्वत:ही करतात, आणि मला काय होतंय म्हणत आजार दडवतात. पण नैराश्य हा जगात सर्वात वेगानं पसरणारा हा आजार आहे. बऱ्याचदा त्या व्यक्तीची मानसिकताच याला कारण असते. नैराश्य हा किचकट आजार मानला जातो. त्यावरचे उपचारही दीर्घ असतात. तुमचं नैराश्य कुठल्या पातळीवर आहे, त्यावर ते अवलंबून असतं. 

अमेरिकन सायकॉलॉजिकल असोसिएशनच्या मते अमेरिकेत सुमारे दहा टक्के पुरुषांमध्ये डिप्रेशन आढळून येतं. त्यात अतिरिक्त दारू पिण्यामुळे येणाऱ्या नैराश्याचं प्रमाण अधिक आहे. महिलांमध्ये मात्र अशा प्रकारचं डिप्रेशन कमी प्रमाणात आहे. नैराश्य, चिंता, काळजी या गोष्टी फक्त मोठ्यांनाच नाही, तर लहान मुलंही याबाबतीत तितकीच संवेदनशील असतात यावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झालं आहे.  आपलं मन हे कधीच शांत राहू शकत नाही हा एक नैसर्गिक नियमच आहे. सध्या अनेकजण गरजेपेक्षा जास्त विचार करतात. सतत मनाची घालमेल होत राहते. न थांबवता येणारे विचार घातक ठरू शकतात. ताण कमी करण्यासाठी काही गोष्टी लक्षात ठेवल्यास मदत होईल

१) सोशल मीडिया 

सोशल मीडियावर ठेवण्यासाठी स्टेटस शोधायला लोक बराच वेळ घालवतात. त्यापेक्षा स्वतःचं करीयर स्टेटस बनवायला तुम्ही वेळा दिला तर भविष्यात फायदा होईल. जी व्यक्ती तुमच्याशी वाईट वाटते ती स्टेटस पाहून चांगलं वागू लागेल किंवा तिच्या वर्तनात बदल होईल या गैरसमजात राहू नका. सोशल मीडियावरचं देखाव्याचं चित्र पाहून अनेकदा नैराश्य येतं म्हणून गरजेपुरताच मोबाईलचा वापर करा. 

२) नाही म्हणायला शिका

अनेकदा समोरच्या व्यक्तीचा विचार करून आपण इच्छा नसतानाही खूप काम करायला तयार होतो. त्या व्यक्तीला राग येईल,  वाईट वाटेल का याबाबत विचार करून स्पष्ट न बोलता कामासाठी होकार दिला जातो. म्हणूनच जर तुम्ही कर्म्फर्टेबल नसाल तर एखाद्या कामासाठी सरळ नाही म्हणा.

३) माणसांचा ओळखायला शिका

ज्या लोकांसोबत राहिल्यानंतर आपल्याला सकारात्मक वाटतं अशा लोकांसोबत राहा.  जे लोक सतत तुम्हाला  नकारात्मक वाटतात. त्यांच्याशी बोलल्यानंतर उगाच बोललो असं वाटतं, आत्मविश्वास कमी होतो. अशा लोकांपासून लांब राहा. काही लोक फक्त फायद्यासाठी तुमच्याशी चांगला व्यवहार करत असतील तर ते वेळीच ओळखा आणि त्यांना आपल्या आयुष्यातून बाहेर फेका. 

४)  एका वेळी एकच काम करा

अनेकांना एकाचवेळी खूप काम करण्याची सवय असते. याला मल्टिटास्किंग असं म्हणतात. याशिवाय डोक्यात विचारही सुरू असतात.  पण हे सगळ्यांनाच जमत नाही त्यामुळे आपला स्वभाव चिडचिडा होतो. मेंदू थकतो. म्हणून आपली क्षमता लक्षात घेऊन एकाचवेळी एक काम करण्याचा प्रयत्न करा. 

५) लिखाण

जर एखादी गोष्ट मनात आहे पण ती तुम्हाला कोणालाही सांगता येत नाहीये. अशावेळी लिहून मन मोकळं करण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला जे काही वाटतंय ते लिहून काढा. यावेळी व्याकरण, भाषा, वाक्यरचना सगळं काही बाजूला ठेवून फक्त लिहीत जा.  यामुळे तुमचं मन हलकं  होण्यास मदत होईल.  याशिवाय रोज व्यायाम केल्यानं तुम्हाला फ्रेश वाटले, आत्मविश्वास वाढेल, ध्यान केल्यानं मन शांत राहण्यास मदत होईल, मोबाईलचा अतिवापर टाळा, आवडत्या मित्र मैत्रिणींची बोला, त्यांच्याशी मनातलं शेअर करा.

टॅग्स :हेल्थ टिप्सआरोग्यमानसिक आरोग्य