Join us

टाइम खराब है, असं म्हणून कुणाला फसवता? राजपाल यादव सांगतात, जगण्याचा सोपा मंत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2025 16:29 IST

Mental Health : वाईट दिवस आलेत असंही आपण सहज म्हणतो. पण खरंच तसं असतं का? सगळं हरलो आपण आणि जगण्यासाठी हातात काहीच नाही, नशिबच वाईट असं म्हणत डोळ्यात पाणी आणून प्रश्न सुटतात का?

Mental Health : काय करणार, हे ही दिवस जातील! फार अवघड आहे काळ, फार टफ आहे परिस्थिती, जीव नको झालाय.. अशी वाक्य आपणही कधीतरी बोलतो, इतर लोकही अवतीभोवती बोलतात. वाईट दिवस आलेत असंही आपण सहज म्हणतो. पण खरंच तसं असतं का? सगळं हरलो आपण आणि जगण्यासाठी हातात काहीच नाही, नशिबच वाईट असं म्हणत डोळ्यात पाणी आणून प्रश्न सुटतात का?

या प्रश्नाचं आपलं उत्तर नकारात्मकच असेल तर राजपाल यादव यांची नुकतीच गाजलेली एक मुलाखत पाहा. मुलाखत घेणारा त्यांना प्रश्न विचारतो की दिवस वाईट होते तेव्हा कसा विचार करायचा तुम्ही, सोसलं तर खूपच असेल!

त्यावर राजपाल यादव यांनी दिलेलं उत्तर मोठं मार्मिक आहे. विनोदी अभिनेता अशी यादव यांची ओळख असली तरी त्यांनी सांगितलेलं जगण्याचं मर्म मात्र गंभीर आहे आणि सहजसोपंही.

राजपाल यादव यांची अलिकडेल 'द लल्लनटॉप'ला या पोर्टलने घेतली. यावेळी त्याला विचारण्यात आलं की, एक वेळ अशी होती जेव्हा टाइम खूप वाईट सुरू होता, तेव्हा कसं निभावलं?

राजपाल यादवच यांनी झटक्यात आपल्या वेगळ्या स्टाइलनं सांगितलं की, 'वेळ कधीच वाईट नव्हती. कारण जर वेळ वाईट आली असती तर आज इथे बसलो नसतो. जी व्यक्ती चालू शकते, जी व्यक्ती बोलू शकते, जी व्यक्ती उभी राहू शकते, विचार करू शकते त्या व्यक्तीची वेळ चांगलीच सुरू असते. वेळ खराब असणं किंवा वाईट असणं याला म्हणतात जेव्हा तुम्ही हॉस्पिटलमध्ये दाखल होत आजाराशी लढत असता! टाईम खराब असणं म्हणजे तुम्ही बाइकनं जात असताना अपघात होऊन दोन्ही पाय मोडतात, टाइम खराब याला म्हणायचं की, तुमचं शरीर जागेवरून हलतच नाहीये. जी व्यक्ती चालू, बोलू शकते त्याची वेळ कधीच खराब नसते. मग ती व्यक्ती तुरूंगात असो वा आणखीही कुठे".

हे सांगताना राजपाल यादव प्रत्येकाला सांगतात की आपण हातीपायी धडधाकट असू तर जगणं सोपंच असतं. आपण आपल्याशी काय बोलतो, किती उमेद देतो स्वत:ला हेच महत्वाचं!

टॅग्स :मानसिक आरोग्यराजपाल यादव