Join us
Daily Top 2Weekly Top 5

अगदी लहान गोष्टीतही चिडचिड रडारड? स्वभाव नाही तर कारण असतं भलतंच, पाहा कसे ओळखावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2026 13:43 IST

Irritable over small things and frequent crying? It’s Not Just Your Nature – Hidden Causes You Must Know : सारखी चिडचिड होण्याची कारणे जाणून घ्या.

अनेकदा माझा स्वभावच चिडका आहे असं म्हणून आपण सतत येणाऱ्या रागाकडे दुर्लक्ष करतो. चिडचिड होणं ही सामान्यच गोष्ट, पण प्रत्यक्षात ही केवळ स्वभावाची बाब नसते. शरीरातील किंवा मनातील काही बदल, ताणतणाव किंवा जीवनशैलीतील चुका यामुळेही सतत चिडचिड होऊ शकते. (Irritable over small things and frequent crying? It’s Not Just Your Nature – Hidden Causes You Must Know)त्यामुळे या लक्षणाकडे दुर्लक्ष न करता त्यामागची कारणं समजून घेणं गरजेचं आहे.

सर्वात आधी लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे झोपेची कमतरता. पुरेशी आणि गाढ झोप न मिळाल्यास मेंदू नीट कार्य करत नाही, त्यामुळे लहानसहान गोष्टींवरही राग येऊ लागतो. सतत थकवा जाणवणे आणि मूड पटकन बदलणे हे याचे संकेत असू शकतात. ताणतणाव आणि मानसिक दबाव ही देखील चिडचिडीमागची मोठी कारणं आहेत. कामाचा ताण, घरातील जबाबदाऱ्या, आर्थिक चिंता किंवा नात्यांमधील तणाव यामुळे मनावर सतत दडपण राहते. हा ताण बाहेर पडत नसल्यास तो चिडचिड स्वरुपात दिसून येतो.

आहारातील त्रुटीही यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावतात. वेळेवर न खाणं, जंक फूड जास्त खाणं किंवा शरीराला आवश्यक पोषकतत्त्वांची कमतरता असल्यास शरीराची ऊर्जा कमी होते आणि मनावरही त्याचा परिणाम होतो. विशेषतः साखर किंवा कॅफिन जास्त घेतल्यास मूड स्विंग्स वाढू शकतात.

हार्मोनल बदलही चिडचिडीमागचं एक महत्त्वाचं कारण असू शकतं. विशेषतः महिलांमध्ये मासिक पाळीच्या आधी किंवा दरम्यान, तसेच काही विशिष्ट वयोगटात हार्मोन्समध्ये होणाऱ्या बदलांमुळे चिडचिड, अस्वस्थता आणि भावनिक चढ-उतार दिसून येतात. कधी कधी शरीरातील एखादी लपलेली समस्या देखील यासाठी कारणीभूत ठरू शकते. उदाहरणार्थ, थायरॉईडचे विकार, रक्तातील साखरेतील चढ-उतार किंवा काही जीवनसत्त्वांची कमतरता यामुळेही मूडवर परिणाम होतो. त्यामुळे सतत चिडचिड होत असेल तर आरोग्य तपासणी करणं उपयोगी ठरू शकतं.

मोबाइल आणि स्क्रीनचा अतिरेकही यामागचं एक आधुनिक कारण आहे. सतत फोन, सोशल मीडियावर राहिल्याने मेंदूवर ताण येतो, लक्ष विचलित होतं आणि नकळत चिडचिड वाढते. म्हणूनच सतत चिडचिड होत असेल तर ती केवळ स्वभावाचा भाग आहे असं मानून दुर्लक्ष करू नये. थोडंसं थांबून स्वतःकडे लक्ष देणं, जीवनशैलीत छोटे बदल करणं, पुरेशी झोप, योग्य आहार आणि मन शांत ठेवण्यासाठी वेळ देणं या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. गरज वाटल्यास तज्ज्ञांचा सल्ला घेणंही तितकंच गरजेचं आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Irritability and tears over small things? It may be a symptom.

Web Summary : Constant irritability isn't just a personality trait. Lack of sleep, stress, poor diet, hormonal changes, or underlying health issues can cause it. Limit screen time and seek expert advice if needed.
टॅग्स :मानसिक आरोग्यहोम रेमेडीआरोग्यहेल्थ टिप्ससोशल व्हायरल