Lokmat Sakhi >Mental Health > How To Reduce Stress: स्ट्रेस इतका की पळून जावंसं वाटतं? रोज करा फक्त 3 गोष्टी, स्ट्रेस आणि डोक्याचा ताप कमी

How To Reduce Stress: स्ट्रेस इतका की पळून जावंसं वाटतं? रोज करा फक्त 3 गोष्टी, स्ट्रेस आणि डोक्याचा ताप कमी

How To Get De- stress: स्ट्रेस किंवा तणाव कमी करण्यासाठी खूप काही वेगळं करण्याची मुळीच गरज नाही... ३ अगदी साध्या- सोप्या गोष्टी... नक्कीच कमी करतील तुमचा ताण.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2022 01:01 PM2022-04-20T13:01:22+5:302022-04-20T13:02:20+5:30

How To Get De- stress: स्ट्रेस किंवा तणाव कमी करण्यासाठी खूप काही वेगळं करण्याची मुळीच गरज नाही... ३ अगदी साध्या- सोप्या गोष्टी... नक्कीच कमी करतील तुमचा ताण.

How To Reduce Stress: 3 Simple steps to reduce your stress, Must follow this routine every day to get de-stress | How To Reduce Stress: स्ट्रेस इतका की पळून जावंसं वाटतं? रोज करा फक्त 3 गोष्टी, स्ट्रेस आणि डोक्याचा ताप कमी

How To Reduce Stress: स्ट्रेस इतका की पळून जावंसं वाटतं? रोज करा फक्त 3 गोष्टी, स्ट्रेस आणि डोक्याचा ताप कमी

Highlightsरोजच्या रुटीनमध्ये काही छोटे- मोठे बदल केले तरी तुमचा ताण भरपूर प्रमाणात हलका होऊ शकतो. त्यासाठी नेमकं काय करायचं आणि काय टाळायचं, याविषयीच्या या काही खास टिप्स..

आज प्रत्येकालाच आपल्या वयानुसार, कामानुसार वेगवेगळ्या गोष्टींचा स्ट्रेस आहे.. हा ताण सहन करणं कधी कधी असह्य वाटू लागतं. मोठ्या माणसांना ऑफिसचा, कामाचा स्ट्रेस तसाच कॉलेजच्या मुलांना अभ्यासाचा, करिअरचा ताण. हा सगळा ताण रोज डोक्यावर घेऊन फिरण्यापेक्षा तो थोडा कमी करा ना.. कोणत्या ना कोणत्या गोष्टीचा भुंगा सतत आपल्या मागे असणारचं पण त्याचा ताण (stress) घेत घेत आपण किती दिवस घालवणार. म्हणूनच डि- स्ट्रेस होण्यासाठी म्हणजेच तणाव (simple steps to get de- stress), स्ट्रेस कमी करण्यासाठी सेलिब्रिटी आहारतज्ज्ञ ऋजुता दिवेकर (Rujuta Divekar) यांनी सोपे ३ उपाय सांगितले आहेत. 

 

स्वत:वरचा तणाव कमी करायचा म्हणजे आपल्याला खूप काही वेगळं करण्याची गरज आहे, असं मुळीच नाही. रोजच्या रुटीनमध्ये काही छोटे- मोठे बदल केले तरी तुमचा ताण भरपूर प्रमाणात हलका होऊ शकतो. त्यासाठी नेमकं काय करायचं आणि काय टाळायचं, याविषयीच्या या काही खास टिप्स.. बदल करून बघा, ताण कमी व्हायला नक्कीच मदत मिळेल. हे बदल सोपे आहोत म्हणूनच ते सस्टेनेबल म्हणजे खूप काळ टिकणारे आहेत, असंही दिवेकर यांनी सांगितलं.

 

१. स्वत:ला वेळ द्या
दररोज कामाचा राडा उरकत उरकत आपण एवढं धावत असतो की या धावपळीतून स्वत:साठी वेळ काढणं अगदी अशक्य होऊन बसतं.. यात वर्किंग वुमनची धावपळ तर पुरुषांपेक्षा कणभर का होईना पण अधिकच असते. घरातलं झालं की ऑफिसचं आणि ऑफिस झालं की पुन्हा घरातलं.. हे सगळं करताना खूप दमछाक होते. पण शक्य तेवढी ही पळापळ कमी करण्याचा प्रयत्न करा आणि स्वत:ला वेळ द्या. फावल्या वेळात स्क्रिन टाईम वाढविण्यासाठी स्वत:कडे लक्ष द्या आणि आपल्याला काय आवडतं, ते शाेधून स्वत:ला रिलॅक्स करा..

 

२. स्वत:वर प्रेम करा
तुम्हाला तुम्ही आता कसे हवे आहात, ते शोधा. आपल्या स्वत:च्या आवडीनुसार स्वत:ला घडवा. बऱ्याचदा आपलं असं होतं की आपण सध्या जसे असतो, तसे स्वत:ला आवडत नसतो. त्यामुळे काय आवडतं ते ठरवा आणि तसे बदल आताच स्वत:मध्ये करा.

 

३. दुपारी अवश्य डुलकी घ्या..
दुपारी जेवण झालं की डोळे जड पडतात, गुंगी येते आणि छान झोपावंसं वाटतं ना? मग अजिबात लाजू नका. शक्य असेल तर १० मिनिटांची छानशी डुलकी नक्की घ्या. कारण तुमचा ताण कमी करण्यासाठी दुपारची नॅप हा खूप चांगला उपाय आहे. यामुळे तुमची पचनशक्ती सुधारते, हार्मोनल इम्बॅलेन्स कमी होतो आणि झोपेची गुणवत्ता सुधारते. 

 

Web Title: How To Reduce Stress: 3 Simple steps to reduce your stress, Must follow this routine every day to get de-stress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.