Lokmat Sakhi >Mental Health > एन्झायटीचा त्रास- मनात सतत निगेटीव्ह विचार? २ मिनिटांत अस्वस्थ मन शांत करण्याची खास ट्रिक..

एन्झायटीचा त्रास- मनात सतत निगेटीव्ह विचार? २ मिनिटांत अस्वस्थ मन शांत करण्याची खास ट्रिक..

How To Get Rid Of Stress And Negative Thoughts In Mind: मनात सतत निगेटीव्ह विचार येत असतील, मन अजिबात शांत नसेल, खूप ताण आला असेल तर हा उपाय कराच...(simple trick to make our stressful mind calm and relaxed)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2025 09:20 IST2025-06-10T09:12:52+5:302025-06-10T09:20:02+5:30

How To Get Rid Of Stress And Negative Thoughts In Mind: मनात सतत निगेटीव्ह विचार येत असतील, मन अजिबात शांत नसेल, खूप ताण आला असेल तर हा उपाय कराच...(simple trick to make our stressful mind calm and relaxed)

how to get rid of stress and negative thoughts in mind, how to reduce anxiety, simple trick to make our stressful mind calm and relaxed | एन्झायटीचा त्रास- मनात सतत निगेटीव्ह विचार? २ मिनिटांत अस्वस्थ मन शांत करण्याची खास ट्रिक..

एन्झायटीचा त्रास- मनात सतत निगेटीव्ह विचार? २ मिनिटांत अस्वस्थ मन शांत करण्याची खास ट्रिक..

Highlightsजेव्हा खूप निगेटीव्ह वाटू लागेल, मन उदास होईल, मनाची अस्वस्थता वाढेल तेव्हा फक्त २ मिनिटे स्वत:साठी काढा..

हल्ली प्रत्येकाच्याच मागे कामाचा ताण खूप वाढलेला आहे. कोणत्या ना कोणत्या गोष्टीचा स्ट्रेस प्रत्येकालाच असतो. त्यामुळे मग डोक्यात सतत विचारांचा गुंता असतो. यामुळे अनेकांना रात्री शांत झोपही लागत नाही. व्यवस्थित जेवण जात नाही. ज्या गोष्टीचा ताण असतो ती गोष्टी बाजुलाच राहाते आणि आरोग्याच्याच वेगवेगळ्या तक्रारी डोकं वर काढू लागतात. अतिताण, एन्झायटी यामुळे अनेकांची तब्येत पार बिघडते (how to reduce anxiety?). असं तुमच्या बाबतीत होऊ द्यायचं नसेल तर मनावरचा ताण, ओझं अवघ्या २ मिनिटांत कमी करणारा हा एक खास उपाय पाहाच.. जेव्हा खूप निगेटीव्ह वाटू लागेल, मन उदास होईल, मनाची अस्वस्थता वाढेल तेव्हा फक्त २ मिनिटे स्वत:साठी काढा (how to get rid of stress and negative thoughts in mind?). ज्या ठिकाणी आहात त्याच ठिकाणी ताठ बसा आणि हा अगदी सोपा उपाय करा..(simple trick to make our stressful mind calm and relaxed) 

 

स्ट्रेस, एन्झायटीचा त्रास कमी करण्यासाठी काय उपाय करावा?

स्ट्रेस, एन्झायटी, मनाची उदासिनता, अस्वस्थता तसेच निगेटीव्ह विचार कमी करण्यासाठी कोणता उपाय करावा, याविषयी माहिती alok.taunk या इंस्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आली आहे. यामध्ये एकूण ४ उपाय सांगितले असून ते एकानंतर एक यापद्धतीने करा. 

वयाच्या तिशीतच बसता- उठता गुडघ्यातून कट- कट आवाज येतो? ७ पदार्थ खा- गुडघ्यांमध्ये ताकद येईल

१. सगळ्यात आधी कानाच्या सगळ्यात वरच्या कोपऱ्यातला जो थोडासा खोलगट भाग असतो त्यामध्ये तुमचे एक बोट घाला आणि क्लॉकवाईज आणि ॲण्टीक्लॉकवाईज दिशेने प्रत्येकी ५ ते ६ वेळा फिरवा.

२. दुसरा उपाय म्हणजे तुमच्या दोन्ही कानांचा वरपासून ते खालपर्यंतचा भाग हळूहळू दाब देत बाहेरच्या बाजुने ओढा. असं साधारण २ ते ३ वेळा करा.

 

३. यानंतर पहिले बोट आणि मधले बोट कानाच्या मागच्या बाजुने आणि पुढच्या बाजुने ठेवून कानाच्या आजुबाजुने काही सेकंदासाठी मसाज करा. 

केसांसाठी नॅचरल हेअरडाय! पांढरे केस काळे होऊन भराभर वाढतील.. कांद्याच्या टरफलांचा सोपा उपाय

४. चौथा उपाय म्हणजे तुमचा जबडा जेवढा शक्य होईल तेवढा उघडा आणि बंद करा. अशी जबड्याची उघडझाप काही सेकंदासाठी करा. हा उपाय केल्याने vagus आणि parasympathetic नर्व्ह ॲक्टीव होतात आणि मनावरचा ताण कमी होतो. 


 

Web Title: how to get rid of stress and negative thoughts in mind, how to reduce anxiety, simple trick to make our stressful mind calm and relaxed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.