How To Stop Overthinking: आजकाल तरुणांमध्ये ओव्हरथिंकिंग म्हणजेत अतिविचार करण्याची समस्या खूपच वाढताना दिसत आहे. सतत विचार करत राहिल्यामुळे ताणतणाव वाढतो, मन अस्वस्थ राहतं आणि ही सवय हळूहळू एखाद्या जाळ्यासारखी बनते. अगदी छोट्या-छोट्या गोष्टींचाही अति विचार केला जातो. एकदा ही सवय लागली की त्यातून बाहेर पडणं खूप कठीण होतं. याचा थेट परिणाम मानसिक आरोग्यावर होतो, चिडचिड वाढते आणि मूडही सतत बदलत राहतो. जर आपल्यालाही ओव्हरथिंकिंगपासून सुटका हवी असेल, तर खाली दिलेल्या टिप्स नक्की उपयोगी ठरू शकतात.
ओव्हरथिंकिंगपासून सुटका कशी मिळवायची?
मेडिटेशन करा
जर आपण एखाद्या गोष्टीचा वारंवार विचार करत असाल, तर दररोज मेडिटेशन करण्याची सवय लावा. ध्यान केल्याने मन शांत होतं आणि विचारांवर नियंत्रण मिळवणं सोपं जातं.
आयुष्य एन्जॉय करा
सतत निराश राहिल्यामुळे नकारात्मक विचार वाढतात. त्यामुळे जुन्या गोष्टी विसरून आयुष्याचा आनंद घ्या. आवडत्या गोष्टी करा, छंद जोपासा. यामुळे मन हलकं होतं आणि आयुष्यात सकारात्मकता येते.
मोठा श्वास घ्या
ताणतणावात असताना काय करावं हे समजत नसेल, तर काही वेळ मोठा श्वास घेणे खूप फायदेशीर ठरतं. यामुळे मन शांत होतं आणि रिलॅक्स वाटायला लागतं. मन हलकं होतं.
मनातलं लिहून काढा
मनात सतत विचारांचा गोंधळ सुरू राहत असेल, तर ते कागदावर लिहून काढा. असं केल्याने मन मोकळं होतं आणि समस्यांकडे वेगळ्या दृष्टीने पाहता येतं.
कुठे फिरून या
ओव्हरथिंकिंगपासून सुटका मिळत नसेल, तर कुटुंबीय किंवा मित्रांसोबत फिरायला जा. नवीन ठिकाणी जाणं, वातावरण बदलणं यामुळे मन प्रसन्न राहतं आणि विचारांवरचा ताण कमी होतो.
