Join us  

लहान सहान गोष्टींचा खूप राग येतो? राग कंट्रोल करण्यासाठी सद्गुरू सांगतात १ उपाय; आनंदी राहाल

By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2024 11:15 AM

How To Control Anger (Rag Kasa Kami Karaycha) : रागावर नियंत्रण ठेवण्यासाठी सद्गुरू जग्गी वासुदेव यांनी सोपे उपाय सांगितले आहेत.

दैनंदिन जीवनात अशा अनेक गोष्टी घडतात ज्यामुळे चिडचिड होते तर कधी राग अनावर होतो. (Mental Health Tips) एखाद्या ठिकाणी जायला उशीर होणं, जेवण न आवडणं, ऑफिसमध्ये वाद, घरी कोणी काही लागेल असं बोलते अशा अनेक गोष्टींमुळे संताप होतो आणि चिडचिड होते. (How to Deal With Anger) रागाच्या भरात लोक अनेकदा जवळच्या माणसांना दुखावतात तर कधी स्वत:ला त्रास करून घेतात. (Anger Management) रागावर नियंत्रण ठेवण्यासाठी सद्गुरू जग्गी वासुदेव यांनी सोपे उपाय सांगितले आहेत. (Sadhguru Jaggi Vasudev Suggest Seven Ways To Guide To Handling Anger)

सद्गगुरू सांगतात रागामुळे फक्त मानसिक आरोग्यच नाही तर  शारीरिक आरोग्यावरही परिणाम होतो. मेडिकल सायन्सनुसार यामुळे शरीरात हानीकारक रसायने तयार होतात. (How to Control Anger Immediately) सतत राग येणं तुमच्या ओव्हरऑल आरोग्यासाठी नुकसानकारक ठरते म्हणून जास्तीत जास्त शांत राहण्याचा प्रयत्न करा. आपल्या विचार करण्याच्या पद्धतीवर लक्ष ठेवा.  जर तुम्ही आपल्या विचारांवर नियंत्रण ठेवले तर भावनांवरही नियंत्रण ठेवू शकता.'' (How to Manage Anger in The Moment)

एका मुलाखतीत त्यांनी सांगितले होते की सैनिकांनी जर रागाने गोळी मारली तर त्यांचा नेम चुकेल आणि गोळ्या वाया जातील.  नेम साधण्यासाठी तुम्हाला स्थिर, संतुलित मन लागते. अन्यथा तुम्ही नेम साधू शकत नाही. तुम्हाला गोळी मारण्यासाठी चिडण्याची गरज नाही. जर तुम्ही रागवून गोळी चालवली तर नेम चुकेल.

योग्य दिशेने गोळी चालवण्यासाठी तुमचं डोकं जागेवर असायला हवं. तुम्ही कसं कार्य करता याने मोठा फरक पडतो. तुम्ही कुटुंबासोबत असाल किंवा बिझनेस संबंधित काम करत असाल तुमचा मूळ स्वभाव मनुष्य असण्याचा असावा. यामध्येच आपण आपल्या बुद्धीमत्तेचा वापर करू शकता. 

रागावर नियंत्रण कसे ठेवायचे? (How to Manage Anger)

सगळ्यात सोपी पद्धत म्हणजे तुम्हाला का राग येतोय ते लक्षात घ्या आणि रागावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करा. राग करणं किंवा शांत राहणं ही तुमची वैयक्तिक निवड आहे. राग  येण ंहे स्वाभाविक असून अचानक घडते. जर तुमच्या आजूबाजूची सर्व स्थिती उत्तम असेल तर तुम्हाला जास्त राग येणार नाही पण काही मनासारखं झालं नाही तर राग जास्त येतो. म्हणून मनावर आणि डोक्यावरही कंट्रोल ठेवता यायला हवं. रागाचे निगेटिव्ह इफेक्ट्स लक्षात घेता शांततापूर्ण, सुंदर  लाईफसाठी  राग कमीत कमी असावा. 

टॅग्स :हेल्थ टिप्समानसिक आरोग्यआरोग्य