Join us  

रोजच्या टेन्शनचा राग मुलांवर काढणं ठरतं धोकादायक! स्वतःला शांत  ठेवण्यासाठी वापरा 'या' टिप्स

By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2021 5:33 PM

How to stop getting angry with child : जर मुलांचा खूप राग आला असेल तर तुमचे मन शांत ठेवण्याचा प्रयत्न करा. मूल असे का वागत आहे हे जाणून घेण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे.

ठळक मुद्देमुलांचे पालणपोषण करणं खूप कठीण काम आहे. मुलांना त्यांच्या चुकांची जाणीव करून देणे आणि त्याच वेळी त्यांच्यावर आक्रमकता न दाखवणे खूप महत्वाचे आहे.जास्तच राग येत असेल तर वॉकसाठी जाऊ शकता. राग शांत करण्यासाठी पाणी प्या, कोल्डड्रिंक्स किंवा थंड पाणी तुम्ही राग शांत करण्यासाठी पिऊ शकता.

जसजसं आपण मोठं  होत जातो आपल्या विचारातही बदल होत जातो. परिणामी आपल्या भावना सगळ्यांसमोर व्यक्त करणं अडचणीचं ठरतं. कारण जर आपण आपल्या समस्या लोकांना सांगितल्या तर आपण कमकुवत वाटू शकतो. म्हणून अनेक गोष्टी मनात दडवून ठेवल्या जातात. अनेकदा कुठेही राग व्यक्त करता आला नाही तर मुलांवर राग काढला जातो. ऑफिसचं टेंशन, घरचं टेंशन, बाहेरचं टेंशन याचा राग सरळ मुलांवर निघतो. 

कारण घरातील कामाचा लोड, पैशांचे टेंशन यामुळे डोक्यात सतत विचार सुरू असतात. त्याचं फ्रस्ट्रेशन मुलांवर निघतं. 'मुलं खूप हट्टी असल्यानं आम्ही असं वागतो', असं उत्तर पालकांकडून दिलं जातं. पण खरंच हे योग्य आहे का? आई वडीलांच्या अशा वागण्याचा वाईट परिणाम मुलांवर होत असतो. साइकोलॉजिस्ट हेतल जोगी यांनी एका वेबसाईटशी बोलताना याबाबत अधिक माहिती दिली आहे.

मुलांवर  जास्त राग काढणं  धोकादायक ठरू शकतं. 

जर मुलांचा खूप राग आला असेल तर तुमचे मन शांत ठेवण्याचा प्रयत्न करा. मूल असे का वागत आहे हे जाणून घेण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. त्यांच्यावर लक्ष देण्याची गरज आहे का? त्याला काही त्रास आहे का? मुलांच्या कोणत्याही कृतीवर आपण जितक्या लवकर रिएक्ट कराल तेवढं जास्त त्रास होईल. कोणत्याही परिस्थितीत मुलांवर फ्रस्टेशन काढणं चांगलं नाही.  

मुलांचा खूप राग असेल तर काय कराल?

काऊंटिंग टेक्निकचा वापर करून तुम्ही रागावर नियंत्रण मिळवू शकता. राग आल्यानंतर १ ते १० अंक मोजायला सुरूवात करता. हळूहळू श्वास घेत मोजणी सुरू करा. 

रात्री झोपताना असा विचार करा की जर आपण आज राग काढला तर मुलांवर त्याचा काय परिणाम होईल. 

आपल्या वागण्याचे परिक्षण करा. तुमच्या रागाचा त्याच्यांवर कसा परिणाम होतो हे पाहा. आठवढ्यातून मुलं कितीवेळा हट्ट करतात.  त्यांचा हट्टीपणा वाढतोय का? हे पाहा मग रिएक्ट करा. मुलांचा राग शांत करण्याचा प्रयत्न करा. 

जास्तच राग येत असेल तर वॉकसाठी जाऊ शकता. राग शांत करण्यासाठी पाणी प्या, कोल्डड्रिंक्स किंवा थंड पाणी तुम्ही राग शांत करण्यासाठी पिऊ शकता. मुलांच्या चुकांना पाठिशी घालू नका पण जास्त राग रागही करू नका. 

मुलांचे पालणपोषण करणं खूप कठीण काम आहे. मुलांना त्यांच्या चुकांची जाणीव करून देणे आणि त्याच वेळी त्यांच्यावर आक्रमकता न दाखवणे खूप महत्वाचे आहे. तुम्ही मुलांना  समजावून सांगा आणि त्यांना शिक्षा करा. पण आक्रमकपणाने नव्हे. आपल्या मुलांवर हात उगारणं खूप हानिकारक आहे. मुलांना त्यांच्या बाबतीत काय घडले हे बर्‍याचदा आठवते आणि यामुळे भविष्यात एंग्जायटी, अग्रेशनचा सामना करावा लागू शकतो. 

आपल्याला हे समजले पाहिजे की आपल्या छोट्या, छोट्या कृतीचा मुलांवर खूप खोल परिणाम होतो आणि त्यात बर्‍याच समस्या उद्भवू शकतात. मुख्यतः असे पाहिले गेले आहे की कठोर पालकांच्या मुलांमध्ये खोटे बोलणे, राग येणे, चिडचिडेपणा, आज्ञेचं पालन न करणं, त्रास देणे, चुकीच्या गोष्टीकडे लक्ष देणे, निर्णय घेण्यास असमर्थता, बोलत असताना रडणे यासारख्या समस्या उद्भवतात.  आपण मुलांना चूक काय बरोबर काय ते समजावून सांगितले पाहिजे परंतु फ्रस्टेशन काढू नका. 

टॅग्स :हेल्थ टिप्समानसिक आरोग्यपालकत्व