Lokmat Sakhi >Mental Health > आनंदी राहण्याची सवय लावा, शिल्पा शेट्टी सांगतेय सुखाचा मंत्र! चॉईस इज युअर्स..

आनंदी राहण्याची सवय लावा, शिल्पा शेट्टी सांगतेय सुखाचा मंत्र! चॉईस इज युअर्स..

''शिल्पा का मंत्र'' या माध्यमातून बॉलीवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी नेहमीच तिच्या चाहत्यांशी संवाद साधत असते. आता तिने सगळ्यांसाठी एक सुखाचा मंत्र सांगितला आहे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2021 01:18 PM2021-09-16T13:18:42+5:302021-09-16T13:55:18+5:30

''शिल्पा का मंत्र'' या माध्यमातून बॉलीवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी नेहमीच तिच्या चाहत्यांशी संवाद साधत असते. आता तिने सगळ्यांसाठी एक सुखाचा मंत्र सांगितला आहे.

Get in the habit of being happy, says Shilpa Shetty. Choice is yours .. | आनंदी राहण्याची सवय लावा, शिल्पा शेट्टी सांगतेय सुखाचा मंत्र! चॉईस इज युअर्स..

आनंदी राहण्याची सवय लावा, शिल्पा शेट्टी सांगतेय सुखाचा मंत्र! चॉईस इज युअर्स..

Highlightsसंपूर्ण फिटनेस तेव्हाच मिळू शकतो, जेव्हा तुमच्या शरीरासोबत तुमचे मनही अतिशय तंदुरुस्त असते. शिल्पा सांगते की, दररोज तुमच्या दिवसाची सुरुवात सकारात्मक विचारांनी आणि चांगल्या हेतूने झाली  पाहिजे.

बॉलीवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी नेहमीच तिच्या फिटनेसबाबत ओळखली जाते. ''शिल्पा का मंत्र'' या माध्यमातून ती सोशल मिडियावर शेअर करत असलेल्या पोस्ट तर चाहत्यांना खूपच आवडतात. फिटनेस कसा जपायचा, यासाठी कोणकोणती वेगवेगळी आसने करायची, मेडिटेशन कसे करावे, यासाेबतच डाएट, आहार- विहार याबाबतही शिल्पा प्रत्येकासाठी उपयुक्त ठरणाऱ्या पोस्ट नेहमीच शेअर करत असते. आठवड्याच्या सुरूवातीलाही ती फिटनेसबाबत एखादी पोस्ट शेअर करून तिच्या चाहत्यांना व्यायाम करण्यासाठी मोटीव्हेट करत असते. अशीच एक पोस्ट शिल्पाने सध्या इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे. 

 

दिवसाची सुरुवात उत्तमप्रकारे कशी करता येईल आणि संपूर्ण दिवस सकारात्मक कसे राहता येईल, याविषयी शिल्पाने या पोस्टमध्ये लिहिले आहे. मुळात शिल्पा स्वत:च सध्या अतिशय अवघड परिस्थितीतून जात आहे. पती राज कुंद्रा पोर्नोग्राफी प्रकरणात अडकल्यापासून शिल्पाला अनेक कठीण प्रसंगाला सामोरे जावे लागले आहे. यामध्ये अनेकदा तिच्यावरही शंका घेण्यात आली. मागील दोन महिन्यांपासून शिल्पाला वारंवार बदनामी आणि मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. पण वैयक्तिक आयुष्यात ती एवढ्या कठीण पेचात अडकलेली असली तरीही ती तिचे सामाजिक आयुष्य अतिशय चांगल्याप्रकारे जगत आहे. 

 

फिटनेस आणि योगा या दोन गोष्टी तिने या अवघड काळातही कधीच दुर्लक्षित केलेल्या नाहीत. अशा कठीण प्रसंगात सकारात्मक राहण्यासाठी योगाद्वारेच आपल्याला मदत होत आहे, अशी पोस्टही तिने काही दिवसांपुर्वी शेअर केली होती. शिल्पाने नुकतीच शेअर केलेली पोस्टदेखील अशाच आशयाची आहे. शिल्पाचे हेच सकारात्मक विचार सध्याच्या तिच्या कठीण काळातही तिला सकारात्मक, संतुलित ठेवण्यास मदत करत आहेत. 

या पोस्टमध्ये शिल्पा ध्यानस्थ बसलेली आहे. ध्यान करताना तिची प्रसन्न मुद्रा आणि मंद स्मितहास्य अतिशय लोभस वाटत आहे. यामध्ये शिल्पा म्हणते की "When you focus on the good, the good gets better". जर तुम्ही आयुष्यातल्या चांगल्या, सकारात्मक गोष्टींवर लक्ष केंद्रित केले तर आपोआपच तुमचे आयुष्य अधिक चांगले हाेते, हा सुखाचा मंत्र शिल्पाने या पोस्टद्वारे दिला आहे. सकारात्मक गोष्टींवर लक्ष केंद्रित कसं करायचं हे देखील तिने सांगितलं आहे.

 

शिल्पा सांगते की, दररोज तुमच्या दिवसाची सुरुवात सकारात्मक विचारांनी आणि चांगल्या हेतूने झाली  पाहिजे. एक चांगला हेतू मनात ठेवला आणि आपल्या भोवतालच्या सगळ्या चांगल्या गोष्टींवर लक्ष केंद्रित केले तर निश्चितच आपल्याला आहे ती परिस्थिती उत्तम वाटू लागते. सकाळच्या वेळी मिळालेली ही उर्जा पुढे संपूर्ण दिवस आपल्याला मोटीव्हेट करत असते. त्यामुळे शिल्पाचा सांगितलेला हा सुखाचा मंत्र नक्कीच मनापासून ऐकला पाहिजे आणि आमलातही आणला पाहिजे. या पोस्टद्वारे शिल्पा पुढे सांगते आहे की, एकदा दिवसभराच्या कामाला सुरुवात झाली की अनेक गोष्टी घडत जातात. यापैकी काही चांगल्या असतात तर काही निराशाजनक. या सगळ्या गोष्टींमध्ये चांगले काय झाले किंवा आपण काय चांगले केले, हे शोधा आणि त्याच गोष्टींचा विचार करा. यामुळे आपोआपच तुमचे मन सकारात्मकतेकडे झेप घेऊ लागेल.

 

हा प्रयोग केवळ एखादा दिवस किंवा एखाद्या महिन्यासाठी करू नका. चांगले आणि सकारात्मक शोधण्याची सवयच तुम्हाला लावून घ्या. अशा विचारांतून आलेली सकारात्मक उर्जा हळूहळू तुमच्या मनात येणाऱ्या सर्व शंका, भीती, नकारात्मक विचार यांचे निरसन करू लागते आणि तुम्हाला तणावमुक्त करते. "Be good, do better, and you’ll only get the best back!" असेही शिल्पाने या पोस्टच्या अखेरीस सांगितले आहे आणि तिच्या चाहत्यांचा आत्मविश्वास वाढविला आहे. फिटनेसप्रेमींना ही पोस्ट अतिशय आवडली आहे. कारण संपूर्ण फिटनेस तेव्हाच मिळू शकतो जेव्हा तुमच्या शरीरासोबत तुमचे मनही अतिशय तंदुरुस्त असते. 

 

Web Title: Get in the habit of being happy, says Shilpa Shetty. Choice is yours ..

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.