मनासारखी एखादी गोष्ट झाली नाही, अपेक्षा भंग झाला, एखादी दिवस जरा वाईट गेला किंवा आवडत्या व्यक्तीपासून दुरावा वाढला तर आपण लगेच म्हणतो मी डिप्रेशनमध्ये आहे. आता नवीन पिढी प्रत्येक गोष्टीला डिप्रेशन समजते असे दावे जुनी लोकं करत असतात. काही वेळा एखादी व्यक्ती खरंच मानसिक त्रासातून जात असते किंवा कोणाला प्रत्येक गोष्ट डिप्रेशन वाटते. हा ज्याच्या त्याच्या विचारांचा भाग झाला तरी तज्ज्ञ सांगतात प्रत्येक गोष्टीला डिप्रेशन समजण्याचा मानसिकतेवर हळूहळू खरंच परिणाम व्हायला लागतो. प्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ समीर पारीख म्हणतात, "दुःख आणि डिप्रेशन यातील फरक समजून घेणे फारच गरजेचे आहे. डिप्रेशन म्हणजे काही साधी गोष्ट नाही. तो मानसिक आजाराचा एक भाग असतो. त्यामुळे प्रत्येक गोष्टीला डिप्रेशन समजणे मानसिकतेसाठी चांगले नाही."
आई - वडील रागावले, नकार पचवावा लागला, मनासारखी नोकरी मिळाली नाही, परीक्षेत गुण कमी आले या सगळ्या गोष्टी डिप्रेशनशी जोडण्याची वाईट सवय लोकांना लागल्याचे तज्ज्ञ सांगतच असतात. या सगळ्या गोष्टी आयुष्याचा भआग असतात. सगळ्यांनाच त्यांना सामोरं जावं लागतं. ज्या व्यक्तींना खरंच डिप्रेशनचा त्रास असतो त्यांना श्वास घेण्यापासून बोलण्यापर्यंत अनेक सामान्य प्रक्रियांमध्येही अडचणी सहन कराव्या लागतात. मानसिकतेची ही फार वेगळीच पायरी असते. त्या पायरीवर नसताना असल्यासारखे वागण्याचा परिणाम शरीरावर झाला तर खरंच एखादा गंभीर आजार होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
दुःख ही एक सजीव भावना आहे. राग, निराशा, उदास, अशांतता, रडणे या सगळ्या गोष्टी अनुभवणे ही एक सामान्य प्रक्रिया असते. त्याला सामोरे जावेच लागते. त्यातून बाहेर यायला जास्त वेळही लागू शकतो. याचा अर्थ मानसिक खच्चीकरण झाले आहे आणि आयुष्यात आता फक्त नैराश्य उरले आहे असा होत नाही. डिप्रेशनमध्ये एखादी व्यक्ती उशीच जात नाही. लहानपणापासून अत्याचार, एकटेपणा, द्वेश किंवा इतरही कोणत्या गोष्टी सहन कराव्या लागल्या असतील तर त्याचे रुपांतर मानसिक अस्थैर्यात होते. इतरही अनेक कारणे असतात. त्यामुळे प्रत्येक गोष्टीचा बाऊ करण्याची सवय खरंच एखाद्या आजाराला आमंत्रण देऊ शकते. त्यामुळे आनंदी राहण्याचा आणि सत्य स्वीकारण्याचा प्रयत्न करत राहा. हळूहळू सगळ्या समस्या सामान्य आणि सोडवता येणार्या वाटू लागतील .
Web Summary : Confusing sadness with depression is common, but harmful. Depression is a mental illness, not just a bad day. Recognize the difference to protect your mental health.
Web Summary : दुख को डिप्रेशन समझना आम है, पर हानिकारक। डिप्रेशन एक मानसिक रोग है, सिर्फ बुरा दिन नहीं। अपनी मानसिक सेहत की रक्षा के लिए अंतर पहचानें।