Join us

नैराश्य-चिंता सतत काळजी वाटते? ‘हा’ व्यायाम ठेवतो मूड आनंदी, पाहा कधी-कसा करायचा..

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2025 19:30 IST

Depression : पुरूषांच्या तुलनेत महिला डिप्रेशननं अधिक प्रभावित होतात, ज्याची कारणं वेगवेगळी असतात.चांगली बाब ही आहे की, डिप्रेशनची लेव्हल कमी असेल तर उपचार घेऊन ते कमी करता येऊ शकतं.

Depression : डिप्रेशन हा एक कॉमन मेंटल डिसऑर्डर (Mental Health) आहे. आजकाल ही समस्या खूप जास्त वाढली आहे. वेगवेगळ्या कारणांनी डिप्रेशनची समस्या होते. जर ही समस्या जास्त दिवस राहिली तर व्यक्तीमध्ये आत्महत्या करण्याची भावना वाढू लागते, ज्यामुळे त्यांचा जीव जाऊ शकतो. WHO म्हणजेच वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननुसार जगभरात ५ टक्के वयस्क लोक डिप्रेशननं (depression) पीडित आहेत. तसेच पुरूषांच्या तुलनेत महिला डिप्रेशननं अधिक प्रभावित होतात, ज्याची कारणं वेगवेगळी असतात. यात चांगली बाब ही आहे की, डिप्रेशनची लेव्हल कमी असेल तर उपचार घेऊन ते कमी करता येऊ शकतं.

डिप्रेशनची लक्षणं कमी करण्यासाठी नियमितपणे व्यायाम करणं एक चांगला पर्याय मानला जातो. व्यायाम केल्यानं मूड चांगलं होतो. अलिकडेच करण्यात आलेल्या एका रिसर्चमध्ये हे सांगण्यात आलं आहे की, किती मिनिटं व्यायाम करून तुम्ही डिप्रेशन दूर करू शकता.

डिप्रेशनमध्ये दूर करतो व्यायाम

रोज व्यायाम करणं एकंदर आरोग्यासाठी फायदेशीर असतो. रोज व्यायाम करून डिप्रेशन दूर करण्यासही मदत मिळते. कारण व्यायामानं शरीरात हॅपी हार्मोन्स वाढतात, ज्यामुळे मूड चांगला होतो आणि स्ट्रेसही कमी होऊ शकतो.

किती मिनिटांचा व्यायाम फायदेशीर

जर तुम्ही डिप्रेशन, स्ट्रेसचे शिकार असाल तर काही मिनिटं व्यायाम करून तुम्हाला आराम मिळू शकतो. यासाठी तुम्हाला ३० ते ६० मिनिटं वेळ देण्याची अजिबात गरज नाही. एका रिसर्चनुसार, डिप्रेशनचा धोका टाळण्यासाठी रोज केवळ २० मिनिटं व्यायाम करणं देखील पुरेसं होईल. 

जर्नल JAMA Network मध्ये प्रकाशित एका रिसर्चमध्ये सांगण्यात आलं आहे की, आठवड्यातील पाच दिवस रोज केवळ २० मिनिटं मीडिअम किंवा स्पीडनं फिजिकल अॅक्टिविटी केल्यास डिप्रेशनची लक्षणं १६ टक्के कमी होतात. तर मेजर डिप्रेशनचा धोका ४३ टक्के कमी होऊ शकतो.

जेवढा जास्त व्यायाम तेवढा जास्त फायदा

या रिसर्चमध्ये पुढे असंही सांगण्यात आलं आहे की, लोक जेवढा जास्त व्यायाम करतील त्यांना तेवढा जास्त फायदा मिळेल. म्हणजे जे लोक नियमितपणे जास्त वेळ व्यायाम करतात, त्यांना डिप्रेशनचा धोका आणखी कमी असतो.

टॅग्स :मानसिक आरोग्यव्यायामहेल्थ टिप्स