Lokmat Sakhi >Inspirational > भारतातील पहिल्या दोन महिला योगगुरू, योग शिकवण्यासाठी करावा लागला अफाट संघर्ष

भारतातील पहिल्या दोन महिला योगगुरू, योग शिकवण्यासाठी करावा लागला अफाट संघर्ष

Yoga day 2025, yoga special, Women ,India's first two female yoga gurus had to struggle immensely to teach yoga : योगअभ्यासाचा अधिकार महिलांना मिळवून देणाऱ्या योगगुरु. पाहा कोण आहेत.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2025 16:29 IST2025-06-21T16:28:36+5:302025-06-21T16:29:46+5:30

Yoga day 2025, yoga special, Women ,India's first two female yoga gurus had to struggle immensely to teach yoga : योगअभ्यासाचा अधिकार महिलांना मिळवून देणाऱ्या योगगुरु. पाहा कोण आहेत.

Yoga day 2025, yoga special, Women ,India's first two female yoga gurus had to struggle immensely to teach yoga | भारतातील पहिल्या दोन महिला योगगुरू, योग शिकवण्यासाठी करावा लागला अफाट संघर्ष

भारतातील पहिल्या दोन महिला योगगुरू, योग शिकवण्यासाठी करावा लागला अफाट संघर्ष

भारतात योगाभ्यास फार पूर्वीपासून केला जात आहे. योगासन करणे ही प्राचीन भारतीय व्यायाम पद्धती आहे, जी फक्त शारीरिक आरोग्य चांगले ठेवत नाही तर मन,मानसिक  आरोग्य, आत्मा सगळ्याचा समतोल राखते. (Yoga day 2025, yoga special, Women ,India's first two female yoga gurus had to struggle immensely to teach yoga)योग या शब्दाचा अर्थ 'जोडणे' असा आहे. योगा केल्याने आपण आपल्याच शरीराशी जोडले जातो, असे योगगुरू सांगतात. योगासन करणे आजकाल सगळ्यांसाठी शक्य आहे. लहान मुले, मुली , महिला , पुरुष सगळ्यांसाठीच योगा करणे फार फायद्याचे ठरते. मात्र एकेकाळी महिला असे व्यायाम प्रकार वगैरे करत नसत. काही महिलांच्या कष्टांमुळे आज जगभारातील महिला रोज योगासने करु शकतात. 

भारतात योग प्रसार  करण्यासाठी अनेक पुरुषांनी मेहनत घेतलीच, मात्र योगासनांना नवे अंग देत महिलांसाठी योगासने किती फायद्याची आहेत, आरोग्याची काळजी घेण्याचा अधिकार महिलांनाही आहे. असे विचार रुजवत सीतादेवी आणि इंदिरादेवी या दोघींनी इतिहास रचला. त्यांचे नाव विसरुन चालणार नाही. 

१९१२ साली सीतादेवी योगेंद्र यांचा जन्म झाला. त्यांना पहिला महिला योगगुरू म्हणून ओळखले जाते. योगावर्ग आणि योगशाळा सुरु करणाऱ्या श्री योगेंद्र यांच्याशी सीतादेवींचे लग्न झाल्यावर त्यांचे आयुष्यच बदलून गेले.  लग्नानंतर त्यांनी योगअभ्यास केला. त्यात गुणवत्ता प्राप्त केली आणि योगासनांना नवी दिशा देण्यासाठी प्रयत्न सुरु केले. सीतादेवी फक्त पहिल्या महिला योगगुरू म्हणून ओळखल्या जात नाहीत. त्यांनी योगासनांना वेगळे वळण दिले आहे. महिलांसाठी खास योगस्थिती कशा असाव्यात, याचा अभ्यास त्यांनी केला. पाळीचा त्रास होत असेल तर त्यासाठी काय करावे. गर्भधारणेसाठी, स्त्री अवयवांसाठी उपयुक्त ठरतील अशा स्थिती महिलांना शिकवण्याचे फार मोलाचे काम सीतादेवींनी केले. 

दुसरे नाव म्हणजे इंदिरादेवी. जगभरात योगअभ्यासाचा प्रसार करण्याचे काम इंदीरादेवींनी सुरु केले. त्यांना योगमाता असेही संबोधले जाते. मुळच्या युरोपियन असलेल्या इंदिरादेवी तरुण वयात भारतात आल्या. इथे आल्यानंतर मात्र त्यांच्या आयुष्याचा उद्देशच बदलून गेला. त्यांनी पारंपरिक हठयोग ही विद्या शिकून घेतली. योगअभ्यासात पारंगत झाल्यावर त्यांनी पाश्चिमात्य देशांमध्ये जाऊन योगासने शिकवायला सुरवात केली. आज जगभरातून सगळ्या देशांमध्ये योगासने केली जातात. त्याचे श्रेय इंदिरादेवींनाच जाते.    

Web Title: Yoga day 2025, yoga special, Women ,India's first two female yoga gurus had to struggle immensely to teach yoga

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.