पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला घेत भारतानेपाकिस्तानवर सर्जिकल स्ट्राइक केला.(Colonel Sofia Qureshi Indian Army) त्या संपूर्ण ऑपरेशन सिंदूरची माहिती माध्यमांना देण्यासाठी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री, कर्नल सोफिया कुरैशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंह या दोन महिला अधिकाऱ्यांचा समावेश होता. (Operation Sindoor India 2025) उत्कृष्ट प्रेस ब्रिफिंग तर त्यांनी दिलेच पण भारतीय महिला किती उत्तुंग कामिगिरी करु शकतात याचे उदाहरणही जगासमोर ठेवले.(Colonel Qureshi press briefing) त्याहून महत्वाचे म्हणजे संकटकाळात भारतीय व्यवस्था, भारतीय सैन्यदलं आणि शासन कुठलाही भेदभाव न करता आपल्या सर्वोत्तम ताकदीसह जगाला सामोरे जातात आणि आपण एक आहोत याचं उदाहरण देतात त्याचंचं एक रुप म्हणजे कर्नल सोफिया कुरैशी!(India’s response to Pahalgam attack)
कौतुकास्पद! परिस्थिती बेताची; आदिवासी पाड्यातील लेक झाली 'एअर होस्टेस', आई-वडिलांच्या कष्टाचं चीज
अत्यंत कणखर आणि तरीही संयत भाषेत बोलणाऱ्या कर्नल सोफिया कुरैशी त्यांच्याविषयी अधिक माहिती शोधली तर समजते की कर्नल सोफिया कुरैशी मूळच्या गुजरातच्या. त्यांचा जन्म १९८१ साली गुजरातमधील वडोदरा या ठिकाणी झाला. बायोकेमिस्ट्रीमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले. सोफियांचे आजोबा हे सैन्य दलात होते. तर वडील काही वर्ष सैन्यात धार्मिक शिक्षक म्हणून काम करत. मेकॅनाइज्ड इन्फंट्रीचे लष्करी अधिकारी मेजर ताजु्द्दीन कुरेशी यांच्याशी त्यांचा विवाह झाला आहे.
#ASEAN Plus multin'l field trg ex in 2016. She was only Woman Officers Contingent Commander among all #ASEAN Plus contingents. #WomensDay#IWD2020#EachforEqual#SheInspiresUspic.twitter.com/CkNipN02mp
— Ministry of Defence, Government of India (@SpokespersonMoD) March 8, 2020 ">२०१६ मध्ये कर्नल सोफिया कुरैशी यांनी पुण्यात झालेल्या बहुराष्ट्रीय लष्करी सराव- एक्सरसाइज फोर्स १८ या भारतीय लष्करी सरावात त्यांच्याकडे पहिल्यांदाच तुकडीचे नेतृत्व करण्याची जबाबदारी देण्यात आली होती. त्या नेतृत्व करणाऱ्या पहिल्या महिला अधिकारी होत्या. या सरावात १८ देशांचा समावेश होता. यावेळी शांतता अभियान आणि मानवतावादी माइन ॲक्शनवर लक्ष केंद्रित करण्यात आले. १८ तुकड्यांपैकी ४० सदस्यांच्या भारतीय तुकडीचे नेतृत्व करणारी ती एकमेव महिला होती.२००६ मध्ये त्यांनी काँगोमधील संयुक्त राष्ट्रांच्या शांतता मोहिमेत लष्करी निरीक्षक म्हणून काम केले. पंजाब सीमेवर ऑपरेशन दरम्यान तिच्या कार्याबद्दल जनरल ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ (जीओसी-इन-सी) यांनी दिला प्रशांसापत्र देऊन सन्मानित करण्यात आले आहे.
सोफिया यांचे सर्जिकल स्ट्राइिक नंतरचे बोलणे, वागणे, नेतृत्व कायमच भारतीय महिलांच्या धिरोदात्त शौर्य आणि कर्तृत्वाची साक्ष देतील.