Lokmat Sakhi >Inspirational > मुत्राशयाचा आजार, वाढही खुंटली! व्हीलचेअर मॉडेलने हिंमत सोडली नाही, तरुणीची प्रेरणादायी गोष्ट!

मुत्राशयाचा आजार, वाढही खुंटली! व्हीलचेअर मॉडेलने हिंमत सोडली नाही, तरुणीची प्रेरणादायी गोष्ट!

Wheelchair Model Inspiring Story Of A Young Woman! : अबोलीच्या संघर्षाची गोष्ट. जाणून घ्या भारताच्या पहिल्या व्हिलचेअर मॉडेलबद्दल .

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2025 18:43 IST2025-01-14T18:38:13+5:302025-01-14T18:43:00+5:30

Wheelchair Model Inspiring Story Of A Young Woman! : अबोलीच्या संघर्षाची गोष्ट. जाणून घ्या भारताच्या पहिल्या व्हिलचेअर मॉडेलबद्दल .

Wheelchair Model Inspiring Story Of A Young Woman! | मुत्राशयाचा आजार, वाढही खुंटली! व्हीलचेअर मॉडेलने हिंमत सोडली नाही, तरुणीची प्रेरणादायी गोष्ट!

मुत्राशयाचा आजार, वाढही खुंटली! व्हीलचेअर मॉडेलने हिंमत सोडली नाही, तरुणीची प्रेरणादायी गोष्ट!

अनेक लोकांचे शरीर खचलेले असते पण मन मात्र कधीच खचत नाही. शरीराने साथ दिली नाही तरी त्यांची जिद्द कायम त्यांना साथ देत असते. ( Wheelchair Model Inspiring Story Of A Young Woman!)अशाच एका मुलीची गोष्ट बीबीसीने हल्लीच  जगासमोर आणली आहे. या मुलीची जिद्द कौतुकास्पदच आहे. तिचे नाव अबोली जरीत आहे. अबोली नागपूरची रहिवासी आहे. तिला गायनाची फार आवड आहे. एवढंच नाही तर ती एक मॉडल आहे.( Wheelchair Model Inspiring Story Of A Young Woman!) ती व्हिलचेअर मॉडल या नावाने प्रसिद्ध झाली आहे. अबोलीची उंची २१व्या वर्षीसुद्धा ३फुट ४इंच आहे. आजारामुळे तिची वाढ खुंटली. किडनीच्या दुखण्यातून सुद्धा स्वत:चे स्वप्न साकारत तिने समाजापुढे एक आदर्श उभा केला आहे.

अबोलीला जन्मापासूनच मूत्राशय नाही. सतत युरीन वाहत राहायचे. त्यासाठी होऊ शकतील त्या शस्त्रक्रिया केल्या. कंबरेच्या दोन्ही बाजूंना भोकं पाडून त्यातून तो प्रवाह वळवण्याखेरीज दुसरा काहीच उपाय नाही. अबोलीचा युरीन प्रवाह २४ तास सुरूच असतो.( Wheelchair Model Inspiring Story Of A Young Woman!) लहानपणी कोणतीही शाळा अबोलीला भरती करून घेत नव्हती. बाकी विद्यार्थ्यांना त्रास होईल, असं त्यांच म्हणणं होतं. पण मग एक शाळा तयार झाली जेथे तिला फारच चांगली वागणूक मिळाली होती. पण आजारामुळे ८वी पर्यंतच ती शिकू शकली.

तिला गायला फार आवडतं. तिने मग गायला आणि मॉडेलिंग करायला सुरुवात केली. २०१९ ला इंडियन आयडल मध्येसुद्धा तिने ऑडिशन दिली होती. तेव्हा सर्वांनी फार कौतुक केले होते. तिला नृत्याची आवड आहे पण पाय साथ देत नाहीत. मग अबोलीने हातवारे आणि हावभावांवरच नृत्य करायला सुरूवात केली. कुठे जाऊ शकत नसल्याने ती गायन, नृत्य, मेकअप सगळं युट्यूबवर बघून शिकली. अबोलीने सर्व पालकांना एक छान संदेश दिला आहे. जर घरात कोणी दिव्यांग असेल तर, त्याला वाऱ्यावर सोडू नका त्याची आवड जपा. अबोलीचा परिवार पावलोपावली तिला मदत करतो. आणि हीच यशाची व आनंदी राहण्याची गुरु किल्ली आहे. अबोलीची गोष्ट नक्कीच सर्वांसाठी प्रेरणादायी आहे.      

Web Title: Wheelchair Model Inspiring Story Of A Young Woman!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.