Join us

साडी नेसून हेवी वर्कआऊट करणाऱ्या महिलेचा व्हिडिओ व्हायरल; पण त्या आहेत कोण?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2023 18:26 IST

Video of woman doing heavy workout : सुंदर आणि पारंपारिक ड्रेसमध्ये ही महिला जिममध्ये पोहोचली तेव्हा लोकांना आश्चर्याचा धक्का बसला.

आजकाल बरेच लोक आपल्या आरोग्याकडे विशेष लक्ष देऊ लागले आहेत. खाण्यापिण्या व्यतिरिक्त आपल्या डाएटकडेही तितकंच लक्ष देतात. सोशल मीडियावर एका महिलेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. तिचा हा व्हिडिओ पाहून अनेकांनी कौतुक केलं आहे. साडी नेसून चालायलाही अनेकींना जमत नाही.  पण या महिलेनं हेवी वर्कआऊट केला आहे. 

या व्हिडिओमध्ये साडी नेसलेली एक महिला व्यायाम करताना दिसत आहे, जे पाहून सगळेच थक्क झाले आहेत. सुंदर आणि पारंपारिक ड्रेसमध्ये ही महिला जिममध्ये पोहोचली तेव्हा लोकांना आश्चर्याचा धक्का बसला. खरं तर, साडीमध्ये व्यायाम करणे सोपे नाही, कारण त्यात पाय अडकण्याची आणि तोल गमावण्याची मोठी शक्यता असते. अशा स्थितीत महिला गुलाबी रंगाच्या साडीत न डगमगता पूर्ण आत्मविश्वासाने कसरत करताना दिसली.

ती महिला कोण आहे?

या महिलेचं नाव रिना सिंह असून त्या एक फिटनेस ट्रेनर आहेत.   व्यायामाव्यतिरिक्त त्या डान्स, एरोबिक्ससुद्धा शिकवतात.  इंस्टाग्रामवर त्यांचे बरेच व्हिडिओज व्हायरल होत असतात. रिना सिंग नावानं ती एक यु ट्यूब चॅनेल सुद्धा चालवतात. याआधीही त्यांनी साडीवर वर्कआऊट करतानाचा व्हिडिओ शेअर केला होता.

व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, 'ही फक्त सुरुवात आहे.' बेली फॅट घटवण्यासाठी याशिवाय साईड फॅट कमी करण्यासाठी अनेक व्यायामप्रकार त्यांनी आपल्या व्हिडिओजच्या माध्यमातून सुचविले आहेत. 

टॅग्स :हेल्थ टिप्सफिटनेस टिप्स