Join us
Daily Top 2Weekly Top 5

Gopal Sawant : आईने भाजी विकून शिकवलं, लेकाने कष्टाचं सोनं केलं; CRPF मध्ये निवड, पाया पडला, मिठी मारली

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2026 13:03 IST

Gopal Sawant : सिंधुदुर्गमधील पिंगुळी गावातल्या गोपाळ सावंत या तरुणाची ही प्रेरणादायी गोष्ट आहे. गोपाळची केंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF) मध्ये निवड झाली आहे.

प्रबळ इच्छाशक्ती आणि मेहनतीच्या जोरावर अनेक अशक्य वाटणाऱ्या गोष्टी या सहज शक्य करता येतात. अनेक जण यासाठी खूप कष्ट करतात. त्यांना त्याचं फळ देखील मिळतं. अशीच एक कौतुकास्पद घटना आता समोर आली आहे. एका तरुणाने आपल्या आईच्या कष्टाचं सोनं केलं आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडीओने सर्वांचं मन जिंकलं. 

सिंधुदुर्गमधील पिंगुळी गावातल्या गोपाळ सावंत या तरुणाची ही प्रेरणादायी गोष्ट आहे. गोपाळची केंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF) मध्ये निवड झाली आहे. त्याने त्याच्या आयुष्यातील हा सर्वात मोठा क्षण आपल्या आईसोबत साजरा केला. गोपाळची आई बाजारात भाजी विकते. ही आनंदाची बातमी देण्यासाठी गोपाळ थेट बाजारात गेला. त्याने आईला नमस्कार केला, आनंदाने मिठी मारली. 

गोपाळसह आईलाही अश्रू अनावर झाले. आईने भाजी विकून गोपाळला मोठं केलं, शिकवलं होतं आणि गोपाळने आता त्या कष्टाचं सोनं केलं आहे. सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल होत असून सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. गोपाळचे मित्र आणि नातेवाईकही या महत्त्वाच्या क्षणी बाजारात उपस्थित होते. गुलाल उधळत आनंद साजरा केला. 

"पिंगुळीमधील शेटकर वाडीतील गोपाळ सावंत यांची CRPF साठी देशसेवेसाठी निवड झाली. याची बातमी कुडाळ नगरपंचायत येथील फुटपाथवर व्यवसाय करणाऱ्या आपला आईला देतानाचा हृदयाला स्पर्श करून जाणारा व्हिडीओ" या कॅप्शनसह इन्स्टाग्रामवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. गोपाळचं सर्वत्र भरभरून कौतुक केलं जात आहे. मेहनतीने आपलं ध्येय साध्य करता येतं हे गोपाळने सिद्ध केलं आहे. त्याच्यापासून अनेकांना आता प्रेरणा मिळत आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Mother's sacrifice leads to son's CRPF selection, joyous celebration.

Web Summary : Gopal Sawant, from Sindhudurg, achieved his dream of joining the CRPF. He shared the news with his mother, a vegetable vendor, celebrating her sacrifices with a heartfelt hug. The inspiring video went viral, showcasing the power of perseverance.
टॅग्स :प्रेरणादायक गोष्टीसोशल मीडियाव्हायरल व्हिडिओसोशल व्हायरल