वयाची पन्नाशी ओलांडली की अनेकांना आपण खूपच प्रौढ झालो आहोत, असं वाटायला लागतं. आता काय आपलं वय झालं असं म्हणत ते कित्येक गोष्टींचा आनंद घेणं ते टाळायला लागतात. तिथे नवं काही शिकणं तर खूपच दूरची गोष्ट. पण मुळच्या आंध्र प्रदेशातील अमलापुरम या शहरात राहणाऱ्या आजीबाईंची मात्र गोष्टच वेगळी.. तसं पाहायला गेलं तर त्या बॉटनीच्या प्राध्यापिका. हजारो विद्यार्थ्यांना घडवून त्या रिटायर्ड झाल्या. तोपर्यंत किंवा रिटायर्ड झाल्यानंतरही पुढे कित्येक वर्षे आपण स्विमिंग शिकावं असं त्यांच्या ध्यानीमनीही नव्हतं. पण एक दिवस सहज त्यांच्या नातवाने त्यांना स्विमिंग पूलमध्ये येण्याचा आग्रह केला आणि तेव्हापासून वेंकटा सुब्बालक्ष्मी या आजीबाईंचा स्विमिंगच्या दुनियेतला नवा प्रवास सुरू झाला.(Venkata Subbalaxmi started swimming at the age of 68)
वेंकटा सुब्बालक्ष्मी यांनी जेव्हा स्विमिंग शिकायला सुरुवात केली तेव्हा त्याचं वय ६८ वर्षांचं होतं. पण स्विमिंग शिकण्यात त्यांनी त्यांचं वय कुठेही आडकाठी म्हणून मधे येऊ दिलं नाही. त्या नेटाने शिकल्या. नवनविन गोष्टी त्यांनी चटकन आत्मसात केल्या.
मधाने दात घासा आणि नंतर 'हा' उपाय करा! पिवळे पडलेले दात पांढरेशुभ्र होऊन चमकतील...
स्विमिंगची बरीच कौशल्ये त्यांना काही दिवसांतच येऊ लागली. हे सगळं पाहून त्यांच्या कोचने त्यांना सहजच विचारलं की आता तुम्हाला एवढं सगळं येतंय मग एखाद्या स्पर्धेमध्ये भाग का घेत नाही.. कोचचं हे वाक्य त्यांनी मनावर घेतलं आणि लगेच एका स्पर्धेत त्या सहभागी झाल्या. त्या स्पर्धेत जेव्हा त्यांना विजय मिळाला तेव्हा त्यांचा हुरूप आणखीनच वाढला..
यानंतर मग त्यांनी मागे वळून पाहिलंच नाही. आज त्या ७९ वर्षांच्या असून उत्तमपणे स्विमिंग करत आहेत. आजवर त्यांनी कित्येक स्पर्धांमध्ये भाग घेतला असून तब्बल १७० पेक्षाही अधिक पदकं मिळवली आहेत. स्विमिंगमुळे त्यांचा फिटनेसही उत्तम आहेच..
साडी नेसल्यावर आणखीनच हडकुळ्या दिसता? बारीक महिलांनी साडी नेसताना लक्षात ठेवाव्या ५ टिप्स
आज या आजीबाई त्यांच्या भागात चॅम्पियन दादी म्हणून ओळखल्या जात असून कित्येकांसाठी एक प्रेरणा ठरल्या आहेत. तुम्हालाही एखादी गोष्ट शिकण्यासाठी किंवा वेगळं काही करण्यासाठी आपलं आता वय झालं असं वाटत असेल तर या आजीबाईंचं उदाहरण डोळ्यांसमोर आणा. प्रौढपणाचं ओझं चटकन गळून पडेल आणि नव्या उर्मीने नवं काहीतरी करायला तयार व्हाल..