Lokmat Sakhi >Inspirational > सुनीता विल्यम्स तिसऱ्यांदा अंतराळात, भारतीय लेकीची मोठी गगनभरारी - पाहा अंतराळ यानातील सुंदर व्हिडिओ

सुनीता विल्यम्स तिसऱ्यांदा अंतराळात, भारतीय लेकीची मोठी गगनभरारी - पाहा अंतराळ यानातील सुंदर व्हिडिओ

Sunita Williams Dances Upon Arrival at Space Station : अंतराळात पोहचताच सुनीता विल्यम्स यांनी केला डान्स; व्हिडिओ व्हायरल

By भाग्यश्री कांबळे | Published: June 9, 2024 04:55 PM2024-06-09T16:55:57+5:302024-06-09T16:57:16+5:30

Sunita Williams Dances Upon Arrival at Space Station : अंतराळात पोहचताच सुनीता विल्यम्स यांनी केला डान्स; व्हिडिओ व्हायरल

Sunita Williams Dances Upon Arrival at Space Station | सुनीता विल्यम्स तिसऱ्यांदा अंतराळात, भारतीय लेकीची मोठी गगनभरारी - पाहा अंतराळ यानातील सुंदर व्हिडिओ

सुनीता विल्यम्स तिसऱ्यांदा अंतराळात, भारतीय लेकीची मोठी गगनभरारी - पाहा अंतराळ यानातील सुंदर व्हिडिओ

भाग्यश्री कांबळे

अमेरिकी अंतराळ संस्था नासाने अंतराळात आणखी एक इतिहास रचला आहे (Sunita Williams). याचा अमेरिकेइतकाच आनंद भारतीयांना देखील झाला आहे, आणि या आनंदामागे भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विलियम्स यांचा मोठा वाटा आहे (NASA). त्यांनी आपल्या नावे आणखीन एका विक्रमाची नोंद केली असून, त्यांनी अंतराळासाठीच्या सर्वात पहिल्या संपूर्ण क्रू मिशनच्या बोईंग स्टारलाइनरची पहिली महिला पायलट बनून हा इतिहास घडवला आहे.

५८ वर्षांच्या सुनीता विल्यम्स यांनी ५ जून रोजी फ्लोरिडा येथील केप कॅनाव्हरल येथून नासाचे अंतराळवीर बॅरी “बुच” विल्मोर यांच्यासोबत बोइंगच्या स्टारलाइनर कॅप्सूलमधून उड्डाण केले(Sunita Williams Dances Upon Arrival at Space Station).

ज्या क्षणी त्या स्पेस स्टेशनवर पोहचल्या त्या क्षणी त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला. शिवाय सुनीता विल्यम्स अंतराळात गेल्यावर तिथे त्यांचं घंटा वाजवून स्वागत करण्यात आलं आहे. याचा व्हिडिओ नासाने पोस्ट केला असून, सोशल मीडियात तुफान व्हायरल होत आहे. ज्यावर नेटकऱ्यांनी तिचं तोंड भरून कौतुक केलं आहे.

मुलं स्वत:हून अभ्यासालाच बसत नाहीत? आईबाबा, करा फक्त ४ गोष्टी- न सांगता मुलं करतील अभ्यास

एक आठवडा अंतराळात थांबणार सुनीता विल्यम्स

नासाच्या सांगण्यानुसार, सर्व काही ठीक असेल तर स्टारलायनर हे आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर उतरेल. त्यानंतर सुनीता विल्यम्स आणि सहकारी बुच विल्मोर हे हे दोन्ही अंतराळवीर सुमारे एक आठवडा अंतराळात थांबतील. तेथेही ते त्यांचे अभियान सुरू ठेवतील, स्टारलायनर आणि त्याच्या उपप्रणालीची चाचणी या काळात घेण्यात येईल.

सुनीता यांच्या नावे अनेक विक्रम

सुनीता विल्यम्स यांच्यासाठी हे उड्डाण त्यांच्या कारकिर्दीतील आणखी एक मैलाचा दगड ठरला आहे. यापूर्वी, २०१२ साली आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाच्या प्रवासादरम्यान अंतराळाच ट्रायलथॉन पूर्ण करणाऱ्या सुनिता विल्यम्स या पहिल्या व्यक्ती ठरल्या. यादरम्यान, त्यांनी वेट लिफ्टिंग मशीन वापरून पोहण्याची नक्कल केली आणि हार्नेसला बांधलेल्या ट्रेडमिलवर धावल्या होत्या.

शिवाय २००६ - ०७मध्ये आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावरील मोहिमेदरम्यान एसर्वाधिक स्पेसवॉक (७) आणि स्पेसवॉक टाइम (५० तास, ४० मिनिटे) करण्याचा विक्रम रचला होता.

सुनिता यांच्याबद्दल थोडं..

- सुनिता यांचा जन्म अमेरिकेत झाला. परंतु, वडिलांमुळे त्या भारतीय वंशाच्या आहेत. वडील गुजरातमधील असून, त्यांच्या आई ही स्लोव्हेन वंशाची असल्याचे सुनीताने सांगितलं आहे.

शाळेत जाताना भीतीपोटी मुल रडतं? करा सोप्या ४ गोष्टी; शाळेत रमतील - अभ्यासही करतील

- सुनीता विलियम्स या केवळ एक अंतराळवीर नसून, १९८७ साली ती युनायटेड स्टेट्समध्ये नौदल अधिकारी म्हणूनही कार्यरत होत्या. अनेक उड्डाणं, मोहिमा, परीक्षा आणि प्रशिक्षणानंतर सुनीताची १९९८ साली नासा अंतराळवीर म्हणून त्यांची निवड झाली.

- अतिशय अनुभवी अशा सुनीताच्या नावावर दोन शटल मोहिमांसह तब्ब्ल ३२२ दिवस ऑर्बिटमध्ये असल्याची नोंद आहे.

Web Title: Sunita Williams Dances Upon Arrival at Space Station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.